Skip to content

मानसिक आजार व समुपदेशन

(क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट)
मानसिक आजार म्हणताच लोकांना काहीतरी भयंकर समस्या आहे असे वाटू लागते आणि त्यातूनच समाजाचे, मानसिक आजारांबद्दलचे समज गैरसमज व अंधश्रद्धा वृद्धिंगत होत जातात.याच अंधश्रद्धा व गैरसमजांमुळे लोक डॉक्टरकडे जाणे टाळतात. इतर प्रगत देशांमध्ये फॅमिली डॉक्टर सारखाच फॅमिली सायकोलॉजिस्ट असतो, परंतु दुर्दैवाने आपल्या देशात मानसिक आजारांबद्दल जनजागृति झालेली नसल्याने आजार असणाऱ्या व्यक्तींकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. मानसिक अजारांबद्दलचा गैरसमज दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या लेखाद्वारे करीत आहे.
कोणत्याही प्रकारचे मानसिक आजार हे मेंदूतील असलेल्या रसायनांच्या कमी जास्त प्रमाणामुळे होतात. त्याचबरोबर मानसिक आजार हे जन्मतःच मनुष्य बरोबर घेऊन आलेला असतो; परंतु त्याची लक्षणे काहींना लवकर जाणवतात तर काहींना उशीरा. ज्या प्रमाणे मातीमध्ये एखादे ‘बी’ पेरले असता, आपण त्याला अनेक वर्षे जर खत पाणीच दिले नाही तर, ते बीज तसेच पडून राहिल परंतु, जर अचानक त्या ‘बी’ला खतपाणी मिळाले तर त्या बीजाचे रोपटे तयार होते. अगदी त्याचप्रमाणे मानसिक आजार देखील जन्मातःच असले तरीही ज्यावेळी त्यांना पोषक वातावरण मिळते; जसे की, परीक्षेत नापास झाल्यास जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यास, घरातील वातावरण नकारात्मक असल्यास तसेच कोणतेही निमित्त घडल्यास मानसिक आजार आपले डोके वर काढतात.

अशावेळी मानसिक आजार आटोक्यात आणण्याचे काम मानसोपचार तज्ञांनी दिलेली गोळ्या औषधे करतात. त्यामुळे माणसोपचार तज्ञ सांगेपर्यंत ही औषधे घेणे अत्यावश्यक असते. मानसिक आजार हे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह या आजारांसारखे असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर औषधे घेणे बंद केले की, त्याचा शरीरावर घातक परिणाम होतो अगदी त्याच प्रमाणे मानसिक आजरांवरील औषधे देखील डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद केल्यास आजाराचे स्वरुप वाढू शकते. 

मानसिक आजार आटोक्यात आणण्यासाठी गोळ्या औषधांबरोबरच समुपदेशनाचीही नितांत आवश्यकता असते. जसे की, कोणतेही दुचाकी वाहन चालण्यासाठी त्या वाहनाची दोन्ही चाके समान गरजेची असतात, अगदी त्याचप्रमाणे मानसिक आजार आटोक्यात आणण्याकरीता औषधे व समुपदेशन या दोहोंची समान आवश्यकता असते. 
बऱ्याचवेळा आजारी व्यक्तींचे पालक म्हणतात की, दवाखान्यात उपचार सुरु असल्याने आम्हाला समुपदेशानची गरज नाही. त्यांच्याकडून येथे नकळत चूक घडते. गोळ्या औषधे हे मेंदूतील केमिकल इमबॅलन्स कमी करण्याचे काम करतात, तर समुपदेशनामुळे व्यक्तीमधील मानसिक, वैचारिक,भावनिक व वर्तनिक बदल आटोक्यात येतात. त्याचबरोबर आजारी व्यक्तिला त्याला असलेल्या आजाराची जाणीव करुन देण्यासाठी देखील समुपदेशन अत्यंत फायद्याचे ठरते.
‘समुपदेशन म्हणजे समोरच्या व्यक्तिला सल्ला देणे नसून; त्या व्यक्तीच्या भाव भावना, विचार व समस्या समजून घेऊन त्यावर केलेली दुतर्फा चर्चा असते. समुपदेशानत समस्याग्रस्त व्यक्तीला स्वतःच्या समस्या स्वतः सोडविण्यासाठी मदत केली जाते.
मानसिक आजार कसे ओळखावेत?
• व्यक्ती नेहमीपेक्षा वेगळी वागत असल्यास 
• भास, भ्रम, अती चिडचिडेपणा, हिंसक वर्तन इ. लक्षणे दिसत असल्यास
• अती झोपणे अथवा निद्रा नाश होणे 
• सतत एकटे रहाणे 
• आत्महत्येचे विचार येणे 
• एखाद्या गोष्टीची अवास्तव भीती वाटत राहणे

वरील लक्षणांपैकी कोणतेही लक्षण अथवा इतर कोणतीही नकारात्मक लक्षणे व्यक्तीमध्ये सतत सहा महीने जाणवत असल्यास समस्याग्रस्त व्यक्तीला त्वरित मानसोपचार तज्ञांकडे नेणे गरजेचे असते. 
अशा परिस्थितीत बरेचवेळा लोक आधी तांत्रिक-मांत्रिक, बाबा, बुवा यांची मदत घेतात, परंतु त्यावेळात आजाराचे स्वरुप खूप वाढलेले असते.

मानसिक आजार आटोक्यात ठेवण्यासाठी घ्यावयाची दक्षता 
• गोळ्या औषधे नियमित घेणे 
• समुपदेशन नियमित घेणे 
• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तीच तीच औषधे घेऊ नयेत 
• चालू औषधांचे साइड इफेक्ट्स जाणवत असल्यास, स्वतःच्या मनाने औषधे बंद 
   करू नयेत. अशा परिस्थितीत उपचार सुरु असणाऱ्या तज्ञांचा सल्ला घ्यावा. 
• एक नोंद वही करावी व त्यात रुग्णाला होणारे भास, भ्रम किंवा होणारे इतर त्रास याबद्दलच्या नोंदी करुन ठेवाव्यात व त्या डॉक्टरांना दखावाव्यात. त्यामुळे डॉक्टरांना आजाराचे व त्याच्या कमी जास्त प्रमाणाचे अचूक निदान करता येते. 

वरील गोष्टी आचरणात आणल्यास मानसिक आजार आटोक्यात राहण्यास मदत होते.
***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!