ढासळते वैवाहिक संबंध
आजकाल ब-याच प्रमाणात वैवाहिक संबंध परीपूर्ण व दिर्घकाळ टिकत नाही अशी परिस्थिती आहे. काय कारणं असावीत! प्रमुख कारणं वयोवृद्ध आईबाप अडचण वाटने मी आणि माझं ही संकुचित विचारप्रवृत्ती ,थोरामोठ्यांची शिकवण अनुभव शिदोरी हा जाच वाटतो .
आपली कर्तव्य पार न पाडने , कष्ट नको , फक्त मौजमजा आणि स्वछंदीपणा , सामाजिक भान नाही , भल्याबु-याची जाण नाही.
बदलती लाईफस्टाईल , स्वकेंद्रित वृत्ती ,दूरदृष्टीचा अभाव , मी पणा , उद्धटपणा , बेजबाबदारपणा , लवचिकता , समंजसपणा , कर्तव्यनिष्ठा , नात्यांची कदर ,आदर आणि भावनिक जिव्हाळा या आणि अशा ब-याच गोष्टींची पायमल्ली होताना दिसते . त्यामुळे नात्यांची वीण घट्ट होण्याऐवजी कमजोर व पोकळ झालेली बघावयास मिळते .
कुणीही या गोष्टींचा विचार करताना दिसत नाही ….
फक्त मी / मीच …कशी / कसा बरोबर हे सिध्दता देण्याची मनोवृत्ती …
पण स्वकेंद्रित होऊन कुठे अन काय चुकते लक्षात घेत नाहीत . दोष एकमेकावर ढकलून मोकळे होतात …. आजकालची तरुण पिढी खूप बिनधास्त आणि बेफिकीर वर्तणूक करते .कार्पोरेट जगात वावरताना सर्व सुख तूम्हाला मिळू शकेल पण खंबीर साथ , खरी माया , खात्रीचा आधार आणि मनशांती फक्त एकसंघ कुटुंबातचं मिळेल यात शंका नकोचं.
संसार दोघांनी मिळून फुलवायचा असतो .संसारात स्रीची प्रमुख भुमिका असते स्रीच्या अंगी कुटुंब बांधून ठेवण्याचे कसब असते आणि तिने ते वापरायलाही हवं तिच्या वागण्याबोलण्यावर ब-याच गोष्टीं अवलंबून असतात …. आजूबाजूच्या नात्यांची जपणूक करायची असते त्यांचे आदर्श , विचार , प्रेरणा आणि अनुभव खूप मोलाचे असतात .कारण त्यामुळेच तुमचा भावी संसार यशस्वी अन भरभक्कम होतो .सर्व नात्यांना बरोबर घेऊन वाटचाल केली तर ती सुकर आणि वंदनीय होते .आणि ती स्रीही .
पण ….हल्ली काय होते लग्न होऊन सासरी आलेल्या मुली काही दिवस अलबेल वाटतात ,नतंर त्यांना स्वतंत्र कुटुंब म्हणजे फक्त नवरा अन बायको एवढेच आपले मर्यादित विश्व त्यात बाकीची नाती अडगळ वाटतात .मग त्या काही न काही कारणाने सतत नव-याला टाँर्चर करणे ,त्याच्या आईवडिलाविरुध्द गैरसमज निर्माण करून घरातला एकोपा व महत्त्वाच्या नात्यात फूट पाडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असतो त्यात मुलगी जर कमावती असेल तर तिचा अजून अँटिट्युड असतो ती सर्वांना यासाठी वेठीस धरून मनमानी करते ….. सर्वच मुली / महिला अशा असतात असे मी अजिबात म्हणणार नाही पण….ब-याच अंशी मुली त्यांच्याप्रती असणारी जबाबदारी झटकतात.
तिथेच सुरुंग लागतो नात्यात .आणि असे घडताना काही ठीकाणी माहेरची लोकही परिस्थिती समजून न घेता आ विचारांना खतपाणी घालून मोठ करताना दिसतात अस व्हायला नको तूम्ही मुलीला व्यवस्थित गाईड केले तर ती सुधारणा करेल व पुढील बरेच मानसिक त्रासाचे क्षण टळतील …(दोन्ही कुटुंबातील ) कधी कधी कायद्याचा धाक दाखवून अशा मनोवृत्ती आपले साध्य साधून घेतात.
मुलगा सर्व खरखोट समजत असूनही मूग गिळून गप्प बसतो …,तिथेच स्वतंत्रेचा स्वैराचार रूजतो आणि नात्याला भेरुड लागते .आईवडिलांना मुलाची ओढाताण पाहवत नाही ते स्वतःहून त्याला विभक्त रहायचा सल्ला देतात .मोठ्या कष्टानं उभ केलेली वास्तु विखूरते , मन हळहळत ,सैरवैर होते उतारवयातली सुखाची वाट काटेरी होते …आपल्यामुळे नवराबायकोत विदुष्ट नको म्हणून दूर होतात. मुलगा मनातून खूप हर्ट झालेला असतो कुठेतरी रक्ताच्या नात्यापासून दुरावल्याची अपराधी भावना घेऊन बाजूला जातो.
नवरा बायकोला समजून सांगण्यात अपयशी ठरतो व बायको त्याची मानसिकता समजून घेण्यास असमर्थ .
राजाराणीचा संसार सुरू होतो ,आईबापाच्या कष्टाच्या इस्टेटतून…. ते चालत बरं यांना !अजिबात गैर वाट नाही भौतिक गोष्टी पैसाअडका सर्व हव असतं फक्त हाडामासाची जिवंत माणस नको .. थोडेच दिवसात एकमेकांच्या चुका दिसतात त्या समजून ,सुधरून घेण्याऐवजी हे एकमेकावर कुरघोडी करायला लागतात . स्वछंदीपणा , लहरीपणा ,मीच का ? हा निरर्थक अंहमभाव . मुलाच्या मनात कुठेतरी सल असतेचं घर कुटुंब सोडल्याची तोही छुप्या पध्दतीने डावपेच खेळतो. आणि ….उदयास येते सूडभावना तिथेच नात न रहाता व्यवहारीपणा येतो …..तु वागते / वागतोस म्हणून मी ही ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा समजून जा अशी जोडपी
विश्वास गमावून बसलेली असतात अन ना
एकमेकाप्रती प्रेम ,माया ,आपलेपण लयाच्या वाटेवर चालू लागते .मानसिक विकलांगता येते .
बिनधोक वागणं कुणाचा कुणाला पायपोस नाही बेबंधपणा यात वाहत जातात …एक दिवस नशेच्या आहारी जाऊन मनाचा संयम हरवून बसतात ….
एकमेकाप्रती प्रेमभाव , भावनिक ओलावा अँटेचमेंट अजिबात उरत नाही ….त्यातून रोज वाद कटकटी घायाळ करणारे अपशब्द कधीकधी मारहाणीपर्यंत मजल जाते . नाते बहरण्याएवजी खुरटत जाते अन उध्वस्त होते.!
जेव्हा दोन व्यक्ती लग्नबंधनात बांधल्या जातात ,तेव्हा अनेक धाग्यांची ती गुफंन माळ असते आणी त्यात अजून भर घालून ती भरभक्कम करण्यासाठी आजकालच्या मुलामुलींनो थोडे स्वतःला तपासून बघा , आपले काही चुकत तर नाही न हे सर्वांगाने तपासून बघा मग कुठलाही निर्णय घ्या , सुक्षीशीत मुलामुलींनो तुम्हाला तुमचे कुटुंबच सांभाळता येत नसेल तर काय उपयोग पुस्तकी ज्ञानाचा अन डिग्रीचा अन त्या अमाप पैशाचा जिथे भावबंधच नाही तिथे सर्व निर्फळ …
दोन जनरेशनमधे वैचारिक गँप असू शकतो पण आपल्याला तो खुबीने भरुन काढता आला पाहिजे यातचं तुमचं बुध्दीकौशल्य दिसून येईल अन जरी मागच्या पिढीकडून काही चुकतयं असे तुम्हास वाटत असेल तर तुम्ही चुका करु नका स्वतःची कर्तव्य , जबाबदारी याचे भान असू द्या ….कारण मागच्या पिढीने या गोष्टींचे भान ठेवून तुम्हाला इथपर्यंत आणलेले , यापुढे तुम्ही त्यांना घेऊन चला चांगल्या परंपराच पिढी दरपिढी सुदृढ आणि निकोप व्यक्तीमत्व घडवतात.कायम लक्षात असू द्या.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??




नमस्कार सर,
आपला लेख खूप सुंदर आणि आजच्या घडीला आणि पिढीला धरून वास्तविक दर्शन आहे. खरच जर दोघांनी मिळून संसार सुखाचा आणि आनंदाने करायचा असेल तर एकमेकांना समजून आणि सामंजस्याने संसाराचा गाडा हकायचा असतो, यात फक्त ती किंवा तो जिम्मेदार नसून त्याच्यातील वैचारिक सामंजस्य तुन ह्या कौटुंबिक समस्या उद्भवतात असे मला वाटते…
धन्यवाद सर आपला लेख आवडला नुसतं वर वर वाचन करून हा लेख समजणार नाही तर त्यावर सखोल मनन केल्यावरच ही परिस्थिती प्रत्येक जण समजू शकतो..पुन्हा एकदा धन्यवाद
Lahan mulansarkh lekhn ahe je swatachya budhitun nahi aal Ani nanyala don baju astat he bahutek lekhakala mahit nahi
Eaktrfi vichardharnetun nirman zalele saty ahe…kashprakre muli chukichya astata he dakhwalay….
लेखकाचे विचार बरेचसे एककल्ली वाटतात…….
हल्लीच्या तरूण वर्गाच्या priorities वेगळ्या आहेत…….
त्यांना आपण आपल्या मापात मोजून कसे चालेल ?
घरातील वृद्ध व्यक्तींनी सुध्दा कालमानाप्रमाणे काही बदल स्वत: मध्ये करून घेतले तर अडचणी नक्कीच कमी होतील……
शेवटी काय…..तर नातं काय किंवा कुटुंब काय किंवा वैवाहिक संबंध काय….सगळे टिकतात ते परस्पर सामंजस्याने ….. एकमेकांना समजून घेण्याने….!
दोष कुणा एकाचा कधीच नसतो