Skip to content

प्रेमात वयाचे अंतर महत्त्वाचं असतं का?

प्रेमात वयाचे अंतर महत्त्वाचं असतं का?


तुषार अदमाने


तुला कसे कळतं नाही पवन आपले लग्न नाही होऊ शकत, आपल्या वयाच्या मध्ये ८ वर्षाचा फरक आहे. तुला हे चांगलेच माहीत आहे तरीसुद्धा तू का लग्नासाठी पाठी लागला आहेस माझ्या? हे बघ जिया मी तुला आधीच सांगितले आहे आणि आताही सांगतोय. मी जेव्हा तुझ्यावर प्रेम केलं तेव्हा तुझे वय पाहून तर केलं नव्हतं ना प्रेम? मग आता कशाला ही वयाची अडचण काढतेस? मलाही काहीच प्रोब्लेम नाहीये, तर तू का एवढी विचार करतेस?

हे बघ पवन मला तू हवा आहेस, पण तुझे वय अजुन लहान आहे रे, आपण जेव्हा लग्न करू तेव्हा लोक तुला बोलतील की किती मोठी बायको आहे तुझी? मित्रही तुला नेहमी चिडवतील, एक दिवस तुलाही मग वाटेल की तुझा निर्णय चुकीचा होता आणि जसजसे आपले वय वाढेल तसतसे तू तरुण दिसशील आणि मी म्हातारी दिसायला लागेल. मग तुला अजुन तुझ्या निर्णयाचा पच्छाताप होईल. म्हणून आताच हे सर्व थांबवले तर बरं आहे.

जिया किती विचार करतेस तू हे? हा विचार तर मी सुद्धा नाही केला. कल किसने देखा हैं? मला तू आवडतेस, तुझा स्वभाव आवडतो म्हणून मी तुझ्या प्रेमात आहे. तुझा चेहरा बघून आणि वय पाहून नाही प्रेम केलं मी तुझ्यावर. जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा तो संपूर्ण आठवडा तू माझ्यासोबत हॉस्पिटल मध्ये होतीस, माझी काळजी घेत होतीस. अग एवढच काय तर मला थोड बर नाही वाटले तर हजार वेळा फोन करून हे खा, हे खाऊ नकोस असे सल्ले देत असतेस.

अग तुझ्या एवढी काळजी करणारे,माझ्यावर प्रेम करणारे मला कुणी भेटूच शकत नाही. राहिला प्रश्न तुझा वयाचा तर ते कधी ना कधी वाढणार ते थोडीच थांबून राहणार आहे. तुझे वाढेल माझेही वाढेल. चेहरा आज सुंदर दिसतोय वयोमानाप्रमाने चेहऱ्यात बदल होणार की पण तुझ्या मनात कधी बदल होणार आहे का? तू जेवढं आज माझ्यावर प्रेम करतेस तेवढेच प्रेम वयाच्या वृद्घकाळात सुद्धा करशील मला माहित आहे. आणि म्हणूनच मला माझी धर्मपत्नी म्हणून तूच हवीस.

तूं ना पवन खरंच खूप वेडा आहेस रे, तुझ्या ह्याच स्वभावाच्या तर मी प्रेमात आहे. रडवलेस बघ मला. अरे माझी जीयू रडली. ये इकडे मिठीत ये पाहू. आणि हो एक लक्षात ठेव आपली भांडणे झाली लग्नानंतर किंवा तुला मला काही सांगायचे असल्यास तू मोठ्या तोऱ्यात सांगू शकते स की मी मोठी आहे तुझ्यापेक्षा मग माझे ऐकायलाच हवं तू (दोघंही जोर जोरात हसू लागतात)

कसे आहे ना मित्रानो वय हे फक्त अंतर आहे, जर तुम्ही मनापासून कुणावर प्रेम करत आहात ना तर त्याला कधीच सोडून जाऊ नका. मग जात, वय, भूतकाळ अशा कोणत्याच गोष्टी मध्ये आल्या तरीही. जर तुम्ही ह्या कारणांनी तुमच्या जोडीदाराला सोडून जाता तर तुमचं प्रेम कधीच खरं नव्हत.

धन्यवाद…

TC….


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

6 thoughts on “प्रेमात वयाचे अंतर महत्त्वाचं असतं का?”

  1. खरच खूप ह सुंदर लिहिले वायाच अन प्रेमच काही सम्बध नाही प्रेम हे केंव्हा ही होऊ शकतं

  2. श ज वाघमारे

    लेख वाचून मनाला भुरळ घातली आठवणींना उजाळा मिळाला कारण माझ्या वयात व माझ्या पत्नीच्या वयात नऊ वर्षां अंतर आहे . प्रेम म्हणजे प्रेम च जादू आहे वय नातं जात धर्म पंथ काहीच पाहात नाही बस प्यार हो जाता है

  3. दिनकर हिरे

    नमस्कार सर,
    माझ्या मित्राने सहज मला वाचनाचा छंद आहे म्हणून मला आपली लिंक शेअर केली होती, पण आज मी आपल्या या ब्लॉग च्या प्रेमात पडलोय आणि नियमित वाचन करतोय. सुंदर आणि छान लिखाण आणि उद्बोधन देणारे लेख असतात.
    हा लेख सुद्धा सुंदर आहे आणि माझ्या मते खऱ्या प्रेमात वय, जात, धर्म ह्या साऱ्या गोष्टी गौण ठरतात.
    धन्यवाद आणि अभिनंदन सर आपण आजच्या लेखातून खऱ्या प्रेमाची महती उद्धृत केली.

  4. हा लेख आहे आणि खरं पण आहे. तरी सुद्धा आपला समाज आणि परिवार याला मान्यता नाही देत.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!