जगू आनंदे…
डॉ.प्रविण तांबे
आनंद हा आतून अनुभवायचा असतो ..कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहता यायलाच हवं ..
आहे तो वर्तमान जसाच्या तसा भुतकाळासोबत स्वीकारला कि भविष्यकाळ जास्त उज्वल असतो..
जगण्याची कला आपोआप अवगत होते ..
सोबत हवी ती फक्त जिद्द …
जिद्द जगण्याची ..
जिद्द जिंकन्याची..
जिद्द संघर्षाची..
जिद्द काही करण्याची ..
आणि जिद्द सदैव आनंदी राहण्याची .
आपण बऱ्याचदा आपला आनंद ..दुःख ..राग ..लोभ..प्रेम आणि सर्वच भावना ह्या इतरांवर किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून ठेवतो …
जरा रोजच्या पेक्षा लेट झालो कि चिडचिड होते ..
नाआवडती भाजी असली तर खायचा मुड चेंज होतो..
मुलांनी मनासारखे नाही वागले ते ऐकत नाही म्हणून चिडचिड होते ..
आपल्या मनाविरुध्द काही घडले तर राग येतो ..
मित्र ..शेजारी ..नातेवाईक यांच्याशी नकळत आपण प्रत्येक गोष्टींची तुलना करतो आणि अजूनच जास्त दुःख आपल्या पदरी पाडून घेतो ..
बायको जवळ आली कि प्रेम उतु येते पण तीच जेव्हा फ्रीजमधील बॉटल रिकामी परत ठेवली म्हणून बडबड करते तेव्हा या शूल्लक कारणासाठी तिचाही राग येतो ..
समोरचा अमूक असा वागला ..असा बोलला म्हणून मला राग आला ..
किंवा तो छान बोलतो ..गोड बोलला म्हणून मला चांगले वाटते इ..
थोडक्यात काही न काही कारणांनी आपण आपल्या सर्व भावनांचे अॉन अॉफ चे स्विच हे समोरच्या व्यक्ती ..वस्तू व परिस्थिती यांच्या हातात देतो व नकळत त्यावरच अवलंबून राहतो..
तिकडून जो स्विच दाबल्याजाईल फक्त तसे रिअॕक्ट आपण होतो ..
पण आतून जेव्हा तुम्ही शांत आणि समाधानी असता तेव्हा या बाहेरील गोष्टींचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे आपल्याला ठरवता यायला हवं ..
विनाकारण काळजी चिंता मनात घर करुन असते ..
मग त्या चिंतेतून चांगला आणि वाईट दोन्ही विचार किंवा कुठलाही एक विचार मनात घोगांवतो ..
मग तो त्याच्यासारखेच विचार सतत तेवत ठेवतो ..
म्हणजे एक निगेटिव्ह विचार त्याच्यासारख्याच विचारांची लाईन एकामागून एक लावतो..
तसेच पॉझिटिव्ह विचारांचे ही आहे..
पण फक्त पॉझिटिव्ह विचारसरणी ठेवली ..सतत सकारात्मक गोष्टी ऐकल्या ..बोलल्या .पाहिल्या की आपण आनंदी होऊ असे नसते ..
या गोष्टींनी तुम्हाला थोड्यावेळाकरता छान वाटते ..मन प्रफुल्लीत होते ..पण हे छान वाटणे म्हणजे आंनद नव्हे ..
इथेही सकारात्मकता ही ऐकने बघणे यावर डिपेंड आहे ..
या सर्वांपेक्षा आनंदीराहणे ही एक वृत्ती आहे ..
ती स्वतःला आत मधून जाणवने हे गरजेचे आहे ..त्यासाठी समाधान असणे सर्वात महत्त्वाचे ..
जिथे समाधान आले तिथे हव्यास इर्षा ..व्देष उरत नाही ..
इच्छा’
ही सर्वात मुळ कारण आहे सर्व दुःखांचे.
एकदा का इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली कि तिला पुर्ण करण्यासाठी आपण आपल्या बुद्धीला कामाला लावतो .
जो तो आपआपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाने ती इच्छा पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो, नवे प्रयोग सुरु करतो ..मग इथेच अंहकाराचा जन्म होतो
मी पणा जन्माला घालण्याच काम इच्छा आणि बुध्दीच.
मग मी करु शकतो हा अंहकार आणि बुद्धी हे मिळून इतर इद्रींयांना कामाला लावता .
इद्रींय आपआपल्या कार्यप्रणाली प्रमाणे काम करायला सुरु करतात
मग इच्छा होणाऱ्या मोहाला सोबत घेवून स्वतःला जे हवं ते इद्रींयाकरवी करुन घेते .
हे जे झालेले कर्म आहे ते चांगले कि वाईट हे न ठरवता आपण सतत फक्त इच्छा पुर्ण होण्यासाठी धावतच असतो ..ती एक पूर्ण झाली कि दुसरी उत्पन्न होते ..मग नंतर अजून हे सुरुच राहते कारन आपण समाधान मानत नाही ..
समाधान मानले तर आनंद आहे .
हे सर्व चक्र मनाला एकदा समजले ही आपण आनंदाने जगू शकतो ..
सुरवात करायला काय हरकत आहे …
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??




लेख खुप छान आहे