प्रत्येक जोडीदार एकमेकांविषयी भलत्याच अपेक्षा ठेवत असतात.
मध्ये माझी एक मैत्रीण मला म्हणाली, तिला कोणी एक मुलगा आवडत होता. त्याला देखील ती आवडत होती. परंतु भरपूर विचार करून तिने त्या मुलाला नाही सांगितले. कारण काय? तर तो कमवतो पण फारसे नाही. तो अशा बिजनेस मध्ये आहे की एखाद्या महिन्यात त्याला चांगले पैसे मिळतात तर दुसऱ्या महिन्यात जास्त मिळतीलच असे नाही.
मी तिला म्हणालो कि तू जेवढे कमी होते तेवढे तुला पुरतात का? ती म्हणाली हो मी माझ्यापुरते बरोबर कमवते. मग माझ्या मनात काही प्रश्न आले.
जर का तू तुझ्या साठी पुरतील इतके पैसे कमावते आहेस. तो मुलगा जितके कमावतोय ते त्याला पुरत आहे. मग तुम्हाला एकत्र येण्यास प्रॉब्लेम काय आहे? आपापले पैसे स्वतःसाठीच वापरा जसे आज वापरता आहात. मग कसले घंटा प्रेम होते किंवा तुला तो आवडत होता हे सांगतेस मला. ?
पण नाही मुलींना सेक्युरिटी आणि कम्फर्ट झोन ही फार महत्त्वाची वाटते. मग त्या स्वतः कितीही कमवत असल्या तरी. आणि जर या सेक्युरिटी साठी त्यांना कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत असेल तर मी त्याला कुठल्याही पद्धतीत स्त्री सुधारते आहे असे म्हणणार नाही. फक्त पैसे मिळवले आणि शिक्षण मिळवले पण मानसिकता तीच बुरसटलेले ठेवली तर कसले काय? स्वतःचे पैसे मिळवून देखील एखाद्या स्त्रीला त्यामध्ये इनसेक्युरिटी वाटत असेल तर फारच कठीण आहे.
आपल्याकडे काय किंवा बाहेर देखील मी आतापर्यंत अशा मुलीबाबत ऐकलेले नाही की जी मुलगी चांगला जॉब करते आहे पैसे कमावते आहे, ती मुलगी हे म्हणेल की माझं त्याच्यावर प्रेम आहे किंवा जो मला आवडतो त्याने फारसा पैसा कमावला नाही तरी चालेल. साथ असणे महत्त्वाचे आहे. अशी फार कमी उदाहरणे असतात.
आपल्याकडे अजून देखील खूप वेळा मुलांची अपेक्षा अशी असते की मुलगी नोकरी करणारे नको. परंतु ज्या दिवशी मुलीची अशी अपेक्षा तयार होईल ही मुलगा नोकरी करणाऱ्या नसला तरी चालेल. त्यावेळेला मला पटेल की खरोखर मुली आता इंडिपेंडंट झालेल्या आहेत. अर्थात यामध्ये मुलांची मानसिकता ही बदलणे आवश्यक आहे. परंतु सर्व काही विचित्र आहे इतकेच कळते.
आणि अर्थातच या सगळ्या अपेक्षा खास करून पैसे, पगार, नोकरी, घर असणे या सगळ्यांमध्ये मला प्रेम किंवा भावनिक गुंतवणूक कुठेच दिसत नाही. हा सगळा बिझनेस आणि व्यवहार आहे. ज्या पद्धतीने आपण एखाद्या कंपनीबरोबर बॉंड तयार करतो तसाच हा बॉंड.
हे मी सर्व मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गिय वर्गाबाबत सांगत आहे त्यामुळे जे गरीब व खालच्या वर्गातील जगत आहेत त्यांच्याबाबत नाही हे लक्षात ठेवावे. याची दुसरी बाजूही असेलच. जसे की पुरुषांना आपल्या बायकोने कमावलेले व आपण स्वतः घरी बसलेले आवडत नाही. परंतु त्याच्या मूळ आत जायचा प्रयत्न केला तर कारण हेच दिसते की मुलाबाबत त्या पद्धतीच्या अपेक्षा तयारच केलेल्या असतात समाजाने.
मी समजा पुन्हा मुलीबरोबर राहिलो असतो तर मी बिनधास्त सांगितले असते की मी घरी बसतो भांडीकुंडी करतो. माझे जे काही हॉबी आणि इंटरेस्ट आहेत ते सांभाळतो. तू पैसे कमव… मला अजिबात लाज वाटले नसती.
आजूबाजूला जवळपास 80 ते 90 टक्के लोक याच पद्धतीचे बघत असतो. त्यामुळे मला माझ्या निर्णयावर प्रचंड अभिमान आणि समाधान आहे.
??????
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



