मी आनंदी आहे ……!!!
मधुरा धायगुडे
एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले,
“तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का?”
तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला. त्याला पूर्ण खात्री होती, की ती ‘हो’ असंच म्हणेल. कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती.
पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं, “नाही.”
ती म्हणाली, “माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात!”
तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. तेवढ्यात ती पुढे म्हणाली, “मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही, मी स्वत:च आनंदात राहते.”
“मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही. माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे.”
“कुठल्याही परिस्थितीत, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते. जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर, एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल.”
“आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते… माणसं, संबंध, आपलं शरीर, हवामान, आपले ऑफिसातले बॉस, सहकारी, मित्र, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य… ही यादी न संपणारी आहे.
“त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं हे मीच ठरवायला हवं ना. माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय… मी आनंदीच असते!”
“मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय, मी आनंदीच राहीन!
मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय, मी आनंदीच असेन!”
माझं लग्न झालेलं असलं तरी लग्ना आधीही मी आनंदीच होते.
कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळेच !!
“माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा जास्त चांगलं आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही, तर आनंदात राहायचं हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे.”
“माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही. त्यामुळे माझ्याशी बोलता-वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो.”
“…आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले. तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका
वातावरण चांगलं नसलं तरी आनंदी राहा… आजारी असलात तरी आनंदी राहा… कठीण परिस्थितीत, पैसे नसले तरी आनंदी राहा… कुणी तुम्हाला दुखावलं, कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं, अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात, तरी आनंदी राहा कुणी तुम्हाला तुमची गरज नाही असे सांगून टाळत असेल तरी आनंदी राहा आनंद वस्तूमुळे सिद्ध होत असला तरी मन ही संकल्पना व्यक्ती परत्वे बदलत असते अन् आनंद ही ..
तुम्ही स्त्री, पुरुष- कुणीही, कितीही वयाचे असा… असाच विचार करायला हवा; नाही का?
आनंदी राहा, आनंदात जगा! कुणी म्हणेल सांगण सोपय हो पण …तरी आनंदी राहा …
मी चांगली आहे माझे चांगलेच होणार “ही सकारत्मकता अशक्य ही शक्य करुन दाखवते मग आनंद ही त्यातच आहे आनंदी राहा .आनंदी मनामुळे शरीरही आनंदी राहील..हे सांगणारी “मी” ही याच आनंदाच्या शोधातील यात्रीच या निष्कर्षपर्यत पोहचलेली …म्हटलं बघूया असे व्यक्त होवून ही काही आनंद मिळतो का ??
तर कुणी विचार करेल आनंदी आहे हे ढोल पिटवून सांगायची गरज काय …या विधानातही आनंदच दडलाय .असा ही विचार आनंदच देवून जातो …व्यक्ती परत्वे व्यक्त होण्याचे मार्ग वेगळे इतकेच …..
“मी आनंदी आहे मी आनंदच देणार “ही स्वयंसूचना सतत देत राहणं ही आनंदी राहण्याची उत्तम योजनाच.,,…
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??




Chotya Chotya goshti khup kahi shikavun jatat…. Kharach ayusha khup surekh aahe……. Mg te hasat ani anandatch jagayla haav ?
खूपच छान उत्तर दिले
खुप छान उत्तर दिलं आहे. यातुन हाच संदेश दिला आहे की आनंद हा तुम्ही कुठेही विकत घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः सकारात्मक विचार करा यातच आनंद सामावलेला आहे.
Be positive ????
खूपच छान
धन्यवाद