पालकांनो, खरंच रिझल्टची घाई करणं योग्य आहे का??
(समुपदेशक, स्पिच थेरपिस्ट)
काल माझ्या मुलाच्या शाळेतील पालकांच्या ग्रुपवरुन एक मेसेज आला, तो वाचून खूप हसायला आलं…. पण या नंतर थोडं टेन्शनही आलं, तो मेसेज असा होता….
“मुलांचे रिझल्ट, आम्हाला व्हाॅटस्अॅप तरी करायला पाहिजे, हार्ड काॅपी हवी तर नंतर दया….(मुलगा सिनिअर केजीत आहे.)
मेसेज वाचून आणि मुलाची इयत्ता वाचून तुम्हालाही हसू आलं ना…
सद्या लाॅकडाऊन आहे.आणि मुलाचा रिझल्ट, तोही सिनिअर केजीचा, जाणून ते पॅरेंट्स काय करणार आहेत कोणास ठाऊक …
जमाना किती बदलला आहे ना! आपल्या लहानपणी आपल्या आईवडीलांनी कधीच आपल्या रिझल्टचे टेन्शन घेतले न्हवते पण मग आज आपण आपल्या मुलांच्या बाबतीत इतके भावनिक का? खरं तर ही भावनिकता नसून भिती आहे, जगाच्या स्पर्धेत उतरल्यावर माझ मुल जिंकेल की हारेल?
किंवा टिकेल तरी ना! ही चिंता सतत आपल्याला सतावत असते…
आपल्या लहानपणी आपल्याला ज्या ज्या गोष्टी करता येत होत्या त्या आज आपल्या मुलांना करता येत आहेत का? याचा जरा विचार करूया, उदा – भोवरा भिरवणे, विट्टी दांडू ,गोट्या, टायर पळवणे, चल्लस आठ, दुकान दुकान खेळणे, मातीच्या वस्तू, भांडी, फळे इ.बनवणे, दोरीच्या उड्या मारणे, छप्पी-पानी खेळणे, भातुकली, सागरगोटे इ.
याही पलीकडे जाऊन स्वतःचे आवरणे, स्वतःचे कपडे धुणे, कपड्यांना साबण लावणे, फर्निचर पुसणे, कपड्यांच्या घड्या करून ठेवणे, बटाटे, लसूण, भाजीपाला निवडणे, इ. गोष्टी आपण करत होतो. पण आपल्या मुलांना करण्यासाठी वाव देतो काहो???
ह्या गोष्टींनी मुलांचे काय होणार आहे? असे आपल्याला वाटते. परंतु ह्याच गोष्टी मुलांमध्ये आत्मविश्वास व आत्मसन्मान निर्माण करणाऱ्या आहेत.
आपण मुलांचे बालपण हिरावून घेत आहोत. कारण त्यांच्या अश्या (वरिल प्रमाणे) खेळण्याने पसारा होतो आणि तो आपल्याला उचलावा लागणार, त्यामुळे बाबांनो हा मोबाईल घ्या, नाहितर टिव्हीवर कार्टून लावून बसा उगीच पसारा करू नका… ही अशी आपली वाक्ये असतात..
पण या वरही उपाय आहे. मुलांनी केलेला पसारा तुमच्या मदतीने मुलांना उचलण्याची सवय लावा तुमचे कामही हलके होईल आणि मुलांना चांगले वळणही लागेल. मुले लहान आहेत म्हणून त्यांना गोंजारत बसण्यापेक्षा त्यांना सक्षम बनवूया, म्हणजे जगाच्या स्पर्धेत त्याचे कसे होईल याची चिंताच राहणार नाही.
चिंताच करायची असेल तर मुलांमधील सुप्त गुण जाणून घेऊया, मुलांना सक्षम बनवूया, सृर्जनशील बनवूया, लाॅकडाऊनचा सद्उपयोग करुन घेऊया.
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
क्लिक करून सामील व्हा!
??

