Skip to content

काही आठवणी….कधीही पुसल्या न जाणाऱ्या..

मनातले माझ्या


सौ सुप्रिया शैलेश हळबे
५/५/२०२०


आठवणी…. गोडच

तुमच्या बाबतीत असे कधी होते का, की आपण कोणत्यातरी कामात असतो आणि अचानक मन भूतकाळाचा वेध घेऊ लागते. काहीही संदर्भ नसताना अचानक काही ठेवणीतल्या आठवणी , आपणहूनच मन आणि बुद्धी ह्यांची उजळणी करायला लागतात…आणि मग आपण पण हातातले काम टाकून कुठेतरी शून्यात रममाण होतो आणि मनाचा मागोवा घेत थेट आठवणीत रमतो.

आठवणी, कधीही पुसल्या न जाणाऱ्या आठवणी.

हृदयाचे जसे चार कप्पे असतात ना तसेच बहुदा प्रत्येकाच्या मनाचे देखील, स्वतःच्या स्पेशल आठवणींचे नक्कीच कप्पे असणार. आणि मग त्या मनाचे आपण अलगद पणें भाग करून ठेवतो, स्वतःच्या त्या कडू – गोड आठवणी साठी.

ह्या आठवणी जर कडू असल्या तर मन अनेकदा दुःखीच होते, आणि जर अश्या कडू आठवणींनी मनाचा ताबा घेतला तर चिंता, निराशा आणि दुःख च वाट्याला येते. मग त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर, बोलण्यावर, रोजच्या व्यवहारात होतो. आपण उगीच चिडचिड करू लागतो. खरंतर आपण खूपच खेळकर असतो, हसरे असतो पण ह्या कडू आठवणींचा परिणाम काही काळापुरता का होईना आपल्या व्यक्तिमत्वावर होतो, आणि नकळतपणे ह्या कडू आठवणी आपल्या शरीरावर कब्जा करतात. काहीही कारण नसताना देखील छोट्या मोठ्या शारीरिक व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. इतरांच्या दृष्टीने आपण सतत आजारी असतो, पण खरंतर ह्या आजारांचे मूळ कुठेतरी बाह्य परिस्थितीत नसून आपल्या अंतर्मनात म्हणजेच मनातल्या कडू कप्प्याच्या आठवणीच असतात की काय कोण जाणे…

मग आपणच ठरवून जर , ह्या कडू आठवणींना मनाचा ताबाच घेऊ दिला नाही तर……. …..?

म्हणजे मनात नावडती आठवण आली रे आली की लगेच काहीतरी पटकन, मनातल्या छान कप्प्यात साठवलेले आठवण्याचा प्रयत्न करायचा .

अशी काही माणसे आपल्या मनात असतात ज्यांच्या निव्वळ आठवणींनी ओठांवर हसू येते किंवा अशा काही घटना ज्यांचा अनुभव आपल्याला पुन्हा पुन्हा घ्यायला आवडेल अश्याच छान गोष्टींना आठवत मनाला सांगायचे …….’अरे बाबा मना’, “बघ ह्या गोड आठवणी मी किती छान जपून ठेवल्या आहेत.”
मनातल्या मनातच बुध्दीचे देखील आभार मानायचे , कारण तिनेच तर इतके दिवस, महिने किंवा वर्ष ह्या गोड आठवणींची जपणूक आपल्या नकळत केलेली असते.

आणि मग ह्या गोड आठवणींनी स्वतः ला उजळवून टाकायचे अन् रममाण व्हायचे त्या सुरेख आठवणीत. मग बघाचं, ह्या गोड आठवणींच्या हिंदोळ्यावर मन नक्कीच सुरेल गीत गाऊ लागेल. प्रसन्नता , आनंद , समाधान हे सारे तुमचे सखे सोबती होतील आणि मग मात्र तुमच्या मनाचे सारेच कप्पे गोड आठवणींनी बहरून जातील ,आशेची शिळ घालू लागतील . तुमचे मनपाखरू उंच भरारी घेऊ लागेलं नव्याने आसमंतात. अजून काही गोड आठवणींनी मनाचा अजून एक कप्पा नव्याने भरण्यास.

मग मन सतत म्हणेल…

तुझ्या गोड आठवणीच्या पावलांवर पडतंय माझ अलगद पाऊल….
आणि तो क्षणच देऊन जातो , येणाऱ्या नवीन आनंदाची चाहूल………


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!