Skip to content

सायकल चालवून दूध विकायचा…आता तो चक्क कार चालवतो!

सायकल चालवून दूध विकायचा…आता तो चक्क कार चालवतो!


श्री. महादेव गायकवाड


गरिबीची जाणीव… एकदा वाचाच ……..

9वीमध्ये नापास झाल्यावर आजोबांना म्हणाला- मोठा माणुस बनायचय, उत्तर मिळाले- घरातली सायकल घे आणि आधी दुध विकून ये, त्यानंतर केली अशी मेहनत की, आज आहे तीन फॅक्टरींचे मालक.

आज राजवीर जॅगूवार कार सोबत बाळगतात ती सायकल, ज्यावरून कधीकाळी दुध विकायचे.

भिवाडी/अलवर(राजस्थान)- 18 वर्षांपूर्वी भिवाडीचा एक मुलगा 9वीत नापास झाला. त्यानंतर घरच्यांनी खूप रागवले, त्याने ते चुपचाप ऐकले. संध्याकाळी तो आपल्या आजोबांकडे गेला आणि म्हणाला- मला मोठा माणुस बनायचयं. आजोबा जगलाराम यांनी आधी त्याच्या डोळ्यात पाहीले आणि नंतर म्हणाले- घरातली सायकल घे आणि दुध विकून ये, पण त्या दुधाचा बंदोबस्त तू स्वत: करायचा. त्यानंतर राजवीरने उधारीने दुध घेऊन घरो-घरी विकले. पहिल्या दिवशी 5 लिटर दुध विकल्या गेले, त्या दुधाने राजवीरला एक नवीन आशा दिली, त्याला उत्स्फुर्त केले. आज राजवीर पॅक्टट्रींचा मालक आहे आणि त्याने 500 लोकांना कामावर ठेऊन त्यांच्या रोजगाराची सोय केली आहे.

ही पहिल्या दिवशीची 5 लिटर दुधाची विक्री 2014 पर्यंत 22 हजार लिटरवर पोहचली. राजवीर जिल्ह्यातील दुध डेअरीचा सगळ्यात मोठा व्यावसायीक बनला आणि नंतर त्याच्या डोक्यात नवीन आयडिया आली. काही पैसे जमा करून त्याने इंडस्ट्रीयल एरीयात प्लॉट विकत घेतला.

दोन महिने कठीण परिश्रम करून त्याने लोन पास करून घेतले आणि 2015 मध्ये त्याने श्रीश्याम कृपा नावाची इंगट बनावणारी फॅक्ट्री सुरू केली. सुरूवातीला त्याने 10 लोकांना रोजगार दिला. त्यानंतर कंपनी अशी नावारूपाला आली की, देशातील मोठ्या कंपन्या एलीगंस टीएमटी, आशियाना इस्पात, कॅपिटल इस्पात, राठी टीएमटी इत्यादी कंपन्या राजवीरकडून माल घेऊ लागल्या. पण राजवीर इतक्यावर थांबला नाही. त्यानंतर त्याने कारचे गिअर पार्ट बनवणाऱ्या दोन कंपन्या विश्वकर्मा आणि धर्मेंद्रा इंडस्ट्री सुरू केल्या. राजवीरला आजही स्वत:ला 9वी नापास म्हणण्यात लाज वाटत नाही. आज राजवीरकडे 500 लोक काम करतात शिवाय त्याने तीन सीएदेखील कामाला ठेवलेत.

ज्या सायकलवरून राजवीरने दुध विकण्याचे काम सुरू केले होते, ती सायकल त्याने आजही आपल्या घरात संभाळून ठेवली आहे. जेव्हा कधी मन होते, तेव्हा राजवीर या सायकलवरून फेरफटका मारतो. आज राजवीरकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत, पण त्याला सायकल समोर त्या गाड्यांची चमक फिक्की वाटते.


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!