Skip to content

भारतात छातीवर हात फिरवणं बायांना माहितच नाही.

भारतात छातीवर हात फिरवणं बायांना माहितच नाही.


नम्रता देसाई


भारतात छातीवर हात फिरवणं बायांना माहितच नाही. स्वतःच्या शरीराला कशाला हात लावायचा ना? ती तर पुरुषाच्या सुखाची गोष्ट! म्हणजे नवऱ्यासाठी राखायला स्तन कारण नवरा असेल तर मुल होणार आणि नवरा असेल तर शासकीय सामाजिक आर्थिक राजकीय वैचारिक अशा सगळ्या वर्तुळात अधिकारीक सत्ता मिळणार!
पण..
…………….
बाई ही एक माणूस आहे.
पाणी वापरून शरीर धुताना शरीराच्या प्रत्येक अवयवाला बोटांनी चोळलं पाहिजे. मग ती योनी असो की स्तन किंवा मनगट किंवा दंड किंवा पोटरी किंवा कंबर. हलका स्पर्श होऊन कातडीवर झालेला सहज स्पर्श तुम्हाला शरीरात होणारे बदल अनुभवण्यासाठी एकमेव उपाय असतो.
……………
हो. शरीरावर साचलेला मातीचा थर धुण्यासाठी आपण साबण लावतो. दिवसभर काम केल्यावर आधीच्या काळात संध्याकाळी जेवणाआधी आंघोळ केली जायची. मग बनवलेलं जेवण धुनीवर तसंच गरम रहायचं ते वाढून द्यायचं आणि मग स्वयंपाक खोली आवरून जेवायला बसायचं. गप्पाटप्पा करत जेवून भांडी धुवून मग झाडलोट करून झोपायला जायचं. असा बाईच्या कामाचा तामझाम काही केल्या इथे संपायचा नाही. पोरं नवरा म्हातारेकोतारे सगळे जे सांगतील ते करत सगळे गप झाले की झोपायचं.
…………..
काळ बदलला. आपण तिथेच. बैठं किचन आता अत्याधुनिक झालं. पण प्रकार तोच.
…………..
आंघोळ करताना शरीरावर भसाभसा पाणी ओतून घ्यायचं, वाईच फेस बोटांवर घेऊन इथे तिथे लावायचा किंवा साबणाची कपळी तशीच भोवडून पाणी ओतलं की झाली आंघोळ. तसंच कापडानी अंग पुसल्यासारखं केलं की निकर, ब्रेसियर, परकर किंवा सलवार यात आवळून घ्यायचं. घामानी निथळून निघत तसाच गाऊन किंवा ड्रेस किंवा ब्लाऊज साडी नेसून पुढे काम सुरू.
………….
जितकं शरीर कोरडं तितकंच रोग दूर हे साधं गणित म्हणे. पण ते तर स्वप्नच.
…………..
मोरी बनवताना कुठेही कँपच्या घरात मला लग्न करू म्हणून मागणी घालणाऱ्या नारंगने आता बंदिस्त मोरी ठेवली नाही. आजूबाजूला छत ठेवलं आहे. मोकळी हवा पाहिजेच. पावसापासून आडोसा करायला सोपं छत आहेच फळकुटाचं पण पाऊस नसेल तेव्हा तिथे बांबूचं जाळीदार छत राहिल अशी रचना केली आहे. का? कारण गरम पाण्याने घाम येऊन जो त्रास होतो त्याला मोकळी हवा हाच एकमेव पर्याय आहे. ?
…………
सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री अशा किमान चार वेळा शरीराचे वळकट्या असणारे सगळे भाग कोरड्या फडक्याने पुसून घेऊन नंतर ओलसर कापडाने किमान पुसता येईल अशी सोय तुम्ही दिवसभर असता अशा ठिकाणी आहे का?
नसेल तर अशी जागा तयार करायला जमेल तितका संघर्ष करा.
कारण हे केलं नाही तर बुरशीजन्य त्वचेचे आजार, कातडं निघून जाऊन होणारे छोटे वाटणारे त्रास कायम मागे लागतील.
………….
आता म्हणाल याचा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेसशी संबंध काय?
………….
मुळात शरीर कुठल्याही इन्फेक्शनपासून दूर असेल तर तुम्ही तिथे हात लावून पाहू शकता. रोज हात लागत असेल तर हलकीशी गाठ तयार होताना तुम्हाला जाणवेल. कुठल्याही आरोग्य केंद्रात १० रुपयात आजारांचं निदान करणारी शासकीय यंत्रणा शहर आणि गावात उपलब्ध आहे. जाऊन या.
………….
कॅन्सर गाठ कुठेही असू शकते.
योनीच्या बाजूला जांघेत किंवा योनीच्या आत कुठेतरी किंवा स्तनांच्या बाजूला कुठेही किंवा पोट मान किंवा अगदी कुठेही.
साधा उठाव किंवा ठसठसत राहणं हेही अनावश्यक आहेच की. ती कॅन्सरची गाठ नसेलही. पण पुढे जाऊन गुंतागुंत वाढण्यापेक्षा किफायतशीर दरात निदान तर पाहून या.
………….
फक्त त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा नंतर तो रिपोर्ट आणि केसपेपरसह फॅमिली फिजिशियनला दाखवा. फिजिशियन सांगेल अशा डॉक्टरकडे किंवा तपासणी लॅबमध्ये जाऊन या. तुमचा वेळ जाऊन तपासणी निगेटिव्ह आली तर खूश व्हा. नाहीतर वेळीच निदान होऊन उपचार पूर्ण करा. ते वेळेत सुरू केल्यामुळे डॉक्टरला उपलब्ध पर्याय पाहून तुम्हाला योग्य ते उपचार द्यायला उसंत मिळते. आपल्याला काही कळत नाही हेच लक्षात घ्या. भलेही कितीही शिकलेले तज्ज्ञ डॉक्टर असोत ते रुग्ण म्हणून दाखल झाले तरी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या उपचारावर भरवसा ठेवून औषधं घेतात. पुन्हा त्याच डॉक्टरला दाखवून आपण पूर्ण बरे झाल्याचं लिखित मिळत नाही तोवर उपचार घेतले पाहिजेत. नंतर दर आठवडा पंधरवड्यात बोलवलं तरी जाऊन आलं पाहिजे.
……….
पेय किंवा खाद्य म्हणून कधीतरी अमली पदार्थ वापरत असाल तर ती एकदम थांबवू नका. त्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. अतिशय नियोजित पद्धतीने प्रमाण ठरवत शेवटचा टप्पा गाठा.
मी दारू पिते पण महिन्यात एखादा दिवस तीही एक ग्लास किंवा त्याहून कमी. पण त्याआधी व नंतर किमान दीड तास सलग चालते.
………..
रिचवण्याची क्षमता असलेलाच आहार घेतला पाहिजे. रोज एसीत बैठं काम करताना मासे भात खाल तर स्थूलता येणारच. त्याच जागी रोज उष्ण दमट हवामानात दिवसभर पायी चालून माहिती संकलन करून काम करत असाल तर बौद्धिक शारीरिक व मानसिक आरोग्य जपत आहार ठरवा.
……………..
निरोगी जगण्यासाठी दमल्यावर झोपणं, अंग न ठणकता उठणं, न थकता चालणं, उचकी न लागता सलग चार घोट पाणी पिता येणं आणि धाप न लागता किमान दहा पायऱ्या असलेले दोन मजले चढता येणं या गोष्टी व्यवस्थित करता येत असतील तर निरोगी जगण्याची निम्मी लढाई तुम्ही लढली.
……………..
बाकी फॅमिली फिजिशियन कुटुंबाला नसेल तर ती आजच्या काळात काळजी करण्याचे कारण आहे. तुम्ही कितीही वर्षांनी गेलात तरी तू काजू घेऊन आली नाहीस म्हणणारे फॅमिली डॉक्टर तुम्हाला आवश्यक असतात. पुण्यात बालगोपाळांपासून सगळ्या कुटुंबाला ओळखणारे माझ्या पूर्ण आजोळ व आताच्या घरापर्यंत सगळ्यांना ओळखणारे दोन डॉक्टर आहेत.
……………
गावी रहायला आल्यावर इथले डॉक्टरही बाबांचं घर आणि घरच्यांच्या hereditary बद्दल माहिती असणारे आहेत. त्यामुळे उपचार करण्यात सुलभता येते.
…………..
दात डोळे सर्दी ताप कान नाक घसा यावर उपचार करण्यासाठी शक्यतो माहिती असणाऱ्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घ्या. मोठ्यात मोठे आजारांवर उपचारासाठी नेटवर्क मधले विश्वसनीय उपचार तज्ज्ञ यांची भेट ते सुलभरित्या घडवून आणतात. अमक्याच्या तमक्याला तमक्या तमक्या गोष्टीत अमकीचे उपचार गुणकारक ठरले होते याचा तुमच्या टिंब टिंब आजारात उपयोग शून्य असतो.
……………
त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचली तर उद्या आंघोळीला जाताना किमान दोन सुके कापड घेऊन आंघोळीला जाल. काय ब्याद आहे असं नाही. एकदा अंग नीट सुकवलं तरी ओलसरपणा लगेच धरतो. तेव्हा हवा येऊन शरीर सुकायला दोनच मिनिटे लागतात. तितका वेळ तुम्ही वाट पाहू शकताच.

मग सुकं कापड वापरून शरीर सुकवून मगच कपडे घाला. किमान त्वचा ज्ञान जागृत राहिल यासाठी तरी शरीराला हात लावा. तुमचंच अंग आहे! ?


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

2 thoughts on “भारतात छातीवर हात फिरवणं बायांना माहितच नाही.”

  1. विषय खूप छान आहे आणि मांडला देखील उत्तम…मनात कधीतरी आलेल्या काही शंकांचे बऱ्यापैकी निरसण झाले…

  2. दिनकर हिरे

    नमस्कार नम्रता ताई,
    तुमचा लेख आणि त्यातल्या त्यात स्त्री आणि तिचे आरोग्यासाठी लहान सहान गोष्टी किती महत्वाच्या असतात हे कळलं.. आणि जर शारीरिक स्वच्छता पाळली नाही तर भविष्यात ब्रेस्ट, ओव्हरी कॅन्सर, त्वचा रोग आणि शरीर फुलत जाणे इत्यादी बाबींची ची छान माहिती दिली आहे.
    हा लेख मनापासून वाचून त्यात दिलेल्या बाबी वर अंमलबजावणी करण्यासाठी आजच्या स्रियांना वेळ मात्र मिळाला पाहिजे नाही त्यांनी तो आवर्जून काढला पाहिजे असे मला वाटले…
    सुंदर लेख आहे धन्यवाद… मला वाटतं आपण स्त्री रोग तज्ञ किंवा डॉक्टर असाव्यात.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!