Skip to content

‘नावं ठेवणं’ याने आपली प्रगती खुंटली… पण आपल्या मुलांचं काय??

‘नावं ठेवणं’ याने आपली प्रगती खुंटली… पण आपल्या मुलांचं काय??


सौ. सुलभा घोरपडे

नीता लहानपणापासून शाळेत हुशार होती , वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा , . कब्बडी , खो-खो ची कॕप्टन होती , लांब उडी , उंच उडी , गोळा फेक , भाला फेक यामध्ये तर तीला कोणीच हरवू शकत नसे.
घरची परिस्थिती बेताचीच होती त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत आईबरोबर भुईमूग उपटायला , शेंगा तोडायला दुसऱ्याच्या शेतात जात असे. आपण जेवढ्या शेंगा तोडल्या आहेत त्याचे आठ ढीग शेतमालक करायचा तेव्हा शेंगाचा आठवा वाटा मिळायचा… असे एक वर्षभर शेंगा पुरतील येवढ्या एक पोतभर शेंगा मायलेकी तयार करायच्या ….

उन्हाळ्याच्या सुट्टीत दररोज रानात जाऊन रस्त्याने जात जात जळण , काटक्या गोळा करायच्या , शेणकूट गोळा करायची . पावसाळभर जळण पुरेल येवढं साठवणूक करून ठेवायची .

नीता आईवडीलांची लाडकी तर होतीच पण शाळेत हुशार असल्यामुळे शिक्षकांची पण लाडकी होती .

दहावीत असताना जिल्हास्तरीय स्पर्धा विविध खेळाच्या स्पर्धा होत्या त्यामध्ये गोळाफेक आणि भालाफेक मध्ये नीताचे नाव देण्यात आले होते. पांढरा हाफ शर्ट आणि खाकी हाफ चड्डी घालून स्पर्धेसाठी जायचे होते . विविध गावागावातून स्पर्धेत भाग घेतलेले खेळाडू येणार होते . ही स्पर्धा सातारमध्ये होती .

सकाळी आठ च्या एसटी ने जायचे होते ….पण नीताच्या घरातील चुलतेमालते आईवडील नीताला पाठवायला तयार नव्हते कारण हाफ चड्डी घालून जाणे म्हणजे पाय आणि मांड्या उघड्या दिसणे हे त्यांना पटत नव्हते मग समाज काय म्हणेल …शिवाय घरातील बुजूर्ग मंडळीचा विरोध पत्करण आईवडीलांना जड जाणार होते…त्यात त्यांचीही चूक नव्हती म्हणा ….काळच तसा होता …गावाकडं हे सर्व चालतच नव्हत…. नीताची तर खूप इच्छा होती जाण्याची, तीने आईवडीलांना तसं बोलूनही दाखवलं पण घरातील सर्वजण नाही म्हटल्यावर नीताला तर काय कराव हे कळत नव्हत …शिक्षकांना तीच्याबद्दल खात्री होती ती नक्कीच या स्पर्धेत नीता जिंकणार आणि आंतरराष्ट्रीय खेळातून ती पुढे जाणार….

सकाळी आठ ची एसटी आली. मुले, शिक्षक सर्वजण एसटी च्या भोवती जमले …पण सरांच लक्ष नीता कधी येतेय याकडे होते…नीताला काय कराव काहीच समजत नव्हतं …नीताचे वडील एसटीकडे गेले आणि शिक्षकांना सांगितले …मी नीताला मागून दुसऱ्या एसटीने घेऊन येतो , तुम्ही पुढे जा …. शिक्षक म्हणाले चालेल …आणि सर्वजण एसटीतून निघून पुढे गेले….नीता मात्र गेलेल्या एसटी कडे लांबूनच पाण्याने भरलेल्या डोळ्याने पाहात राहिली ….

समाजाच्या भीतीने वडील तर तिला घेऊन गेलेच नाहीत ….

अशा कितीतरी नीता असतील ज्या समाजाच्या भीतीने आपली स्वप्ने पूर्ण करू शकल्या नाहीत आणि असे कितीतरी आईवडील असतील जे ‘ लोकं काय म्हणतील’ या भीतीने मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण होऊ देण्यापासून विरोध करत असतील….

आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर…किंवा कोणतीही समस्या सोडवायची असेल तर समाजाला घाबरून कसं चालेल….आपलं आयुष्य आपल्याला जगायचं म्हटल्यावर त्यासाठी समाजाचा विचार करत बसलो तर आपली समस्या आपण सोडवू शकणार नाही आणि आपले ध्येय आपण गाठू शकणार नाही …

नीताचेच बघा जर त्यावेळी तीने आणि तीच्या आईवडीलांनी जर समाजाचा विचार न करता तीने स्पर्धेत भाग घेतला असता तर आज ती किती पुढे गेली असती आणि समजा ज्या लोकांनी तीला नावे ठेवली असती त्याच लोकांनी तीचे कौतुकही केले असते …अशा कितीतरी नीता असतील ज्यांची लोकांच्या भीतीपायी स्वतःची स्वप्ने , ध्येये अपूर्ण राहिली असतील….


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

1 thought on “‘नावं ठेवणं’ याने आपली प्रगती खुंटली… पण आपल्या मुलांचं काय??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!