“कोरोना आणि सकारात्मक जीवन”
किरण संजय कुरणे
( मानसशास्त्र अभ्यासक )
कोरोना व्हायरस विरुद्ध आपण जो काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या लढा देतोय, त्यासाठी आपले सर्वांचे उत्तम प्रयत्न चालू आहेत. खरतर डॉक्टर्स,नर्स, सफाई कामगार यांपासून आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री यांसारखे अनेक व्यक्ती ज्याप्रमाणे काम करतायेत त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत.
सलग ४० ते ४५ दिवस घरी बसून राहिलेला सामान्य नागरिकही या लढ्याला प्रतिसाद देतोय त्याचही कौतुक आहेच, खरतर हा जो काही वेळ मिळाला आहे तो म्हणजे आपल्या आयुष्यात घडलेली एक अशक्य गोष्ट आहे, याकडे आपण सकारात्मकतेने बघितलं पाहिजे. कुटुंबासाठी इतका सलग वेळ आपण देऊ शकलो हे आपलं भाग्य म्हंटल पाहिजे यातून आपलं नातं सुधारायला आणि ते अधिक बळकट करायला एक संधी मिळालीय किंवा आपल्यामध्ये असणारे सुप्त गुण, कौशल्य ओळखण्यासाठी मिळालेली संधी सक्तीने काहोईना आपल्याला मिळालीये याकडे आपण बघितलं पाहिजे व या संधीच सोन कस करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे.
खरतर या लॉकडाऊन नंतर आपण जीवन सुस्थितीत होण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. त्याचबरोबर येणाऱ्या समस्यांकडेही सकारात्मकतेने बघितलं पाहिजे, यासाठी आपलं मनस्वास्थ उत्तम असणं गरजेचं आहे. त्यासाठी आतापासूनच काळजी घेतली पाहिजे.
लॉकडाऊन नंतर येणारी प्रमुख समस्या म्हणजे आर्थिक मंदी पण या समस्येला घाबरून न जात कस तोंड देता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आर्थिक मंदी थांबवणे आपल्या हातात नाही पण या आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी आपल्या हातात आहेत त्या आपण केल्या पाहिजेत याला आपण व्यवस्थापण असं म्हणूया यासाठी आपल्याला अनावश्यक गोष्टींकडे वाहवून न देता समतोल कसा राखता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवला पाहिजे. प्राथमिक गरजांवरच आपला खर्च होईल यावर लक्ष दिल पाहिजे.
नोकरी करणार्यांनाही काही समस्या येऊ शकतात. इतके दिवस रखडलेल्या कामामुळे कामाचा लोड वाढू शकतो. किंवा काहीवेळा पगार वेळेवर मिळेल कि नाही असाही विचार येऊ शकतो पण यामुळे खचून न जाता आपण आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणं गरजेचं ठरेल, या लॉकडाऊन च्या काळात तयार झालेली सकारात्मक ऊर्जा आपण तेव्हा उपयोगात आणू शकतो. यासाठी योग आणि ध्यानधारणा यांचा आतापासून सराव ठेवला तर एक सकारात्मक ऊर्जा व उत्साही वातावरण निर्माण करता येऊ शकते. आणि प्रत्येक गोष्टीसाठी अवास्तव विचार न करता वास्तव विचार आणि सकारात्मक विचार कसा करता येईल हे बघितलं पाहिजे तो म्हणजे असा कि आपल्याकडे नोकरी तरी आहे, पण ज्यांच्याकडे नोकरी नाही ज्यांचं हातावर पोट आहे. ते कस जगत असतील. आणि राहिला प्रश्न पगाराचा तो आज नाही तर उद्या होणारच आहे. यासारखाच सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन आपलं मनस्वास्थ्य टिकविण्यास मदत करेल.
विद्यार्थ्यांपुढे काही समस्या असतील त्याम्हणजे प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळेलच याची खात्री नसणारे म्हणजे या लॉकडाऊन मुले पुस्तक छपाई थांबली असू शकते त्यामुळे पुस्तके वेळेवर मिळणार नाही यासाठी पर्यायी व्यवस्था वापरू शकता इंटरनेट वर हि पुस्तके उपलब्ध असतात याचा आधार घेऊन आतापासूनच पुढील वर्षाचा अभ्यांसाचा सराव ठेवला तर पुढे सरावासाठी वेळ मिळू शकतो. व याचा परिणाम नक्कीच उत्तम गुणांवर होऊ शकतो.
पदवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे त्यांना मिळणारी पदवी हि लांबली आहे. पण हा जो वेळ मिळाला आहे तो मोबाईल मध्ये न घालवता तो वेळ अभ्यासामध्ये घालवला तर मिळणारे गुण हे नक्कीच अपेक्षेप्रमाणे असतील. वर्षभरात आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, अभ्यास वेळेवर झाला नसेल किंवा अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं असेल तर आताच वेळ नक्कीच अभ्यासासाठी मिळालाय असं समजा व आतापासूनच तयारीला लागा. पुढे काहीजण नोकरीच्या शोधात असतील त्यांना लवकर नोकरी मिळेलच याची शाश्वती देता येईल असं नाही. हि समस्या भारतातच नाही तर इतर देशातही असणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे.
नोकरी नसणारे तुम्ही एकटे नसणार तुमच्यासारखे कित्त्येक जणांना हि समस्या भेडसावणार आहे पण या सगळ्यात आपण कसे वेगळे ठरू यासाठी प्रयत्न केले पाहिजे हा लॉकडाऊन चा वेळ स्वतःला समृद्ध करण्यासाठी उपयोगात आणा , आपल्या माहितीमध्ये भर घालण्यासाठी आपल्या विषयाची पुस्तके वाचा यामुळे एक नवा आत्मविश्वास आपल्याला मिळू शकतो.
गृहिणींना लॉकडाऊन नंतर एकटेपणा वाटू शकतो इतके दिवस भरलेलं असणार घर रिकामं वाटू शकत. आता मिळणारा किंवा या काळात सवयीचा झालेला आपल्या माणसांचा सहवास तितक्या प्रमाणात मिळणार नाही त्यामुळे आतापसूनच मनाची तयारी ठेवली पाहिजे कि आताची परिस्थिती जी आहे, ती पुढे असेलच असं नाही. काही दिवसांनी पुन्हा सगळं सुरळीत होईल असा वास्तव विचार केला तर पुढे वाटणारी एकटेपणाची भावना निर्माण होणार नाही.
यापरिस्थितीत कोरोनाला घाबरून न जाता या काळात नियमित व्यायाम, योगा, ध्यानधारणा आणि सकस आहार घेऊया आणि घरी राहून या संकटाला धीराने तोंड देऊया व आपल्या कुटुंबियांना शारीरिक व मानसिक आधार देऊया. त्याच बरोबर परिस्थिती कशीही असुद्या आपण कोरोनाला हरवणारच असा निर्धार करूया.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



