Skip to content

खरेच ऑनलाईन अभ्यासाची लहान मुलांना गरज आहे का…?

खरेच ऑनलाईन अभ्यासाची लहान मुलांना गरज आहे का…?


आशा भालेकर

(MA. B.Ed. MPhil)


माफ करा पण शिक्षक आहे म्हणून बोलावेसे वाटते……

खरेच ऑनलाईन अभ्यासाची लहान मुलांना गरज आहे का…?????
मला असे वाटत नाही..

बऱ्याच शाळा ऑनलाईन सुरु झाल्या. ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन छंदवर्ग, ऑनलाईन स्पेशल ट्युशन वगैरे वगैरे…..

पण यात तुमच्या लक्षात येते आहे का की मुले बरेच तास स्क्रीन समोर आहेत…. आणि याच स्क्रीन साठी ते पॅनिक होत आहेत… तुमचे खरेच आहे की लॉकडाऊन मुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे…. पण काही पालकांना ही याचे अप्रूप आहे. आमची मुले ऑनलाईन अभ्यास करतात… याचे समाजमाध्यमावर फोटोही टाकले…. छान…. पण यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांचे काय????? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहे…. मुलांना शिक्षकांची गरजच वाटेनाशी होत आहे. आता काय सगळेच यूट्यूब वर आहे… कशाला माहिती डोक्यात साठवा.. असेही मुलं सहज म्हणतात… मी या शिक्षणाच्या विरोधात नाही आहे…. पण लहान मुलांच्या डोक्यात इतक्या झपाट्याने आदळतंय की ती मुलं बिचारी कावरीबावरी झाली आहेत. त्यात आता परिस्थिती मुळे मुलं 24तास घरात आहेत मग मनोरंजना साठी टीव्ही, मोबाईल ओघाने आलेच…. बापरे…..

मुलांच्या कल्पकतेला, सृजनतेला आपण वेळ देत आहोत का????( आपण मध्ये सगळेच आलो )

अनेक तत्ववाद्यांचे, शिक्षण तज्ज्ञांचे असे मत आहे की “शांततेत सृजनता फुलते..”

मुलांना शांतता द्या.. त्यांना रिकामा वेळ द्या. ती मुले स्वतः च आपले खेळ निर्माण करतात, नवीन कल्पना प्रत्यक्ष उतरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ती जेव्हा खेळ निर्माण करतात तेव्हा ते अभ्यासच करत असतात. शिकवण्यापेक्षा स्वतः च्या चुकांतून, अनुभवातून शिकण खूप मोलाचे आहे. रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे, महात्मा गांधी यांचे फक्त गोडवे न गाता त्यांची शिक्षण पद्धती अमलात आणण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे….. काय माहिती आज पालकांना ऑनलाईन अभ्यासाची गरज भासऊन त्यांना पॅनिक करून, ऑनलाईन अभ्यास नाही केला तर मुलं ‘ढ’ राहतील असा बिनबुडाचा धोका निर्माण करून काही लोक करोडो कमवत नसतील ना????? …. याचा विचार करा….

आपण सुजाण पालक आहोत सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहोत… आई आणि बाबा म्हणून वेळ देऊया मुलांना… माझ्यात व्यक्ती म्हणून जे चांगले आहे ते देऊया ना आपण मुलांना. महेश काळे यांची पहिली संगीताची गुरु त्यांची आईच आहे इथे खूप उदाहरणे देता येतील विज्ञान क्षेत्रात, कला क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे आहेत की त्यांच्या उत्कर्षाचा पाया त्यांच्या आई वडिलांनी उभा केला आहे.. वडील तबला वादक आहेत मुलाला शिकवा, आई छान स्वयंपाक करते शिकवा, अक्षर सुंदर असणे, रांगोळी छान काढणे, कपाट नेटके लावणे, अवांतर वाचन करणे, खेळ खेळणे, बुद्धिबळ, नवा व्यापार, शिकवणे. मुलांना मनाचे श्लोक, गीतापठण, निबंध लेखन, गणित, तुमची मातृभाषा शिकवा फार गरज आहे आता…..गाणी, नृत्य, कविता लिहिणे.., गोष्ट सांगने आणि तयार करणे इत्यादी…….

एक माझ्या ओळखीतले गणिततज्ञ आहेत एकदा त्यांना विचारले कशी काय गणितात आवड निर्माण झाली… तर ते म्हणाले, की माझे बाबा रोज एक गणित फळ्यावर मी उठायच्या आत लिहून ठेवत आणि ते सोडवल्यावरच खाली खेळायला सोडत असत, रोज वेगळा विचार वेगळं गणित मज्जा येत असे…यातच गोडी लागली… जेवना आधी रोज पाढे….

बऱ्याच गोष्टी आहेत हो ज्या आपण मुलांना शिकवू शकतो आपल्या भावनांचा स्पर्श असतो तिथे. आपले मातृत्व आणि पितृत्व आपण देत असतो. थोडक्यात संस्कारांची शिदोरी आपण या शिकवण्यातून देत असतो….

सोपे सांगायचं तर quality time द्या मुलांना. आपण स्वतः जे काही शिकवतो त्याद्वारे आपण नसल्यावरही आपण त्याच्या बरोबर असू…..सतत….त्यांच्या सुंदर आठवणीत….विचार करा आणि या ऑनलाईन च्या गुदमरुन टाकणाऱ्या, ताण देणाऱ्या शिक्षणापेक्षा आपला वेळ, सहवास त्याना देऊया कारण नोकरी मुळे आई बाबांना मुलांसाठी वेळच नसतो….ही चांगली संधी आहे मुलांना समजून घेण्याची आणि आईबाबा काय आहेत हे कळवून देण्याची…..मुलांशी बोला, गप्पा मारा, त्यांचे मित्र बना…..

“मुलं फार लवकर मोठी होतात हो….. ” वेळ नाही देत आपल्याला……………


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

10 thoughts on “खरेच ऑनलाईन अभ्यासाची लहान मुलांना गरज आहे का…?”

  1. बर मी तुमच्या मताशी सहमत आहे माजा मुलगा ७वी इयत्ते शिकतो जर त्याला या सगळ्या गोष्टी पासुन लांब ठेवल नाही केल त्यानी ऑनलाइन शिक्षण हा जो काळ संपल्यावर त्याला परत पुर्व पदावर कसे आननार का शाळाच ईथ थांबवायची

  2. Khup chaan
    Ya lekhamule nakki palak ani mul yancyaat matrich naat nirmaan honyaas madat hoil

  3. लेख विचार करायला लावणारा आहे पण कारवाई कोणी व कुणावर करायची ?

  4. खूप छान माहिती दिली आहे परंतु शाळांनी अॉनलाईन क्लास सुरू केले आहे

  5. Very nice ..Our education system take meticulous effort to ruin pupil.every child cries “we born intelligent but today’s education system ruin us”online education is the flop show.parents must give some time to shape future of pupil… Online study during lockdown is only point of view of making money and attract admission..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!