Skip to content

ती दोघे जादुगार….हे आजी-आजोबा तुम्हाला कोठेही दिसू शकतात !

संचालक, आपलं मानसशास्त्र
पुष्कळदा आपल्याला आपल्या दोघांमधल्या काही गोष्टी ओळखायला संसाराचा अर्धा प्रवास पूर्ण झालेला असतो. त्याला किंवा तिला काय हवंय, एका विशिष्ट परिस्थितीत त्याची किंवा तिची मानसिकता काय असेल बरं, याचा अजूनही अर्थ काही लागलेला नसतो. या अर्थ न लागलेल्या मानसिकतेतूनच मग आरोप-प्रत्यारोप, प्रतिकार, वाद, रुसवे-फुगवे बाहेर येतात.
अशा परिस्थितीत अचानक मग एका संध्याकाळी, होय संध्याकाळीच, कारण त्याच वेळी ती दोघं जादूगार ओढ लावून जातात. ती दोघं म्हणजे रस्त्यावर हातात हात घालून सोबत बाजार करणारे आजी-आजोबा. (खरंतर तारुण्य प्रेम मी म्हणेन) ते कधी बाजारात दिसतात, कधी ट्रेन, कधी बस, कधी चित्रपट गृहात, कधी ट्रॅकिंगला, कधी पाणीपुरी गाडीवर, कधी समुद्र किनारी आणि कधी तर गार्डनमध्ये सुद्धा ! असे असंख्य जादूगार आजी-आजोबा एका क्षणात ओढ लावून जातात. त्यांना पाहून आपणच आपल्या जोडीदाराबद्दल फुगवून ठेवलेला अहमचा फुगा तत्काळ विरळून जातो, आणि चेहऱ्यावर एक छान smile येते.
हे सर्व एका क्षणात घडतं. आणि हो, हा चमत्कारीक अनुभव घेण्यासाठी जाणिवांचं दार उघडं हवं, आणि दुसरं सर्वात महत्वाचं, हा क्षणिक अनुभव असल्यामुळे आपलं ‘ये रे माझ्या मागल्या’ पुन्हा सुरू होतं. तुमचं काही वेगळं होत असेल तर जरूर कळवा. पण तरीही,
बाहेर कुठेही जर हे जादूगार तुम्हाला दिसले, तर तात्काळ जाणिवांचं दार उघडून चेहऱ्यावर एक छान smile आणण्याची संधी मात्र गमावू नका, मग क्षणासाठी का असेना !
***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!