स्त्री समाधानी केव्हा असते??
पुष्पा राजेश राऊत
स्त्रियांना नेहमी ऐकवलं जातं, कितीही करा तुझं मन काही भरत नाही.
तुझं आपलं नेहमी चालूच असतं, माझ्यासाठी कधी हे केलं का?
ते केलं का?
तू कधीच समाधानी नसते.
पण,
अस नाही होे….
स्त्री समाधानी असते जेव्हा तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतो….
स्त्री समाधानी असते,
जेव्हा रात्री बाळ जागे होते, रडू लागते आणि तेवढ्यात नवरा म्हणतो दे मी घेतो ,त्याला तू झोप….
स्त्री समाधानी असते, जेव्हा तिची मुलं शाळेत निबंध लिहताना
my best friend’s _ my mom and dad असे लिहतात.
स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा चार लोकांसमोर तीच कौतुक नवरा मोठ्या अभिमानाने करतो….
स्त्री समाधानी असते तेव्हा , जेव्हा तिचा नवरा त्याच्या प्रत्येक यशात तिला सहभागी करून घेतो…
स्त्री समाधानी असते तेव्हा ,
जेव्हा तिचा नवरा म्हणतो, व्वा !
काय चव आहे तुझ्या हाताला…..मुलं जेव्हा म्हणतात मम्मा तुझ्या सारख जेवण कुणीच बनवत नाही ग…..
स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा संसारच्या या घाईगडबडीत
सुद्धा नवरा तिला एक गुलाब देऊन हळूच कानात येऊन म्हणतो
Happy valentine day
स्त्री समाधानी असते तेव्हा ,
जेव्हा सासुसासरे अभिमानाने सांगतात हया आमच्या सुनबाई आहेत
छे! सुनबाई नाहीच हो,
ही तर आमची लेक हो!!!
स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा सून म्हणते आई छान दिसतेय ही साडी तुम्हाला..
स्त्री समाधानी असते,
तेव्हा,
जेव्हा नातवंड आजी आजोबांनाही आपल्या बरोबर फिरायला घेऊन चला असा आईबाबांकडे लाडिक हट्ट करतात.
स्त्री समाधानी असते तेव्हा ,
जेव्हा मुलगा जाता-येता आई जेवलीस का?
बाबा कुठे आहेत ग,
जेवले का ? असे विचारतो.
स्त्री समाधानी असते तेव्हा
जेव्हा कुटूंबात आई बाबांना महत्वाचं स्थान असतं…
स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा तिला घरातील प्रत्येक गोष्टीत सहभागी केलं जातं….
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्री समाधानी जेव्हा होते तिला तिच्या नवरयाचे हवे तसे प्रेम मिळते…….
स्त्री मग ती कोणत्याही वयाची असू दे तिच्यात प्रेम,माया,क्षमा सगळं असतं तिला दुर्लक्षित करू नका….
तिला तीच स्थान द्या…
तिला दुर्लक्षित केले की ,ती भांडायला उठते म्हनून ती कजाग, उद्धट होते पण,
जेव्हा जेव्हा तिच्या मनाविरुद्ध आणि चुकीचे घडत आहे त्या- त्या वेळी तिच्या आतील शक्तीने जन्म घेतला आहे….
छोट्या छोट्या गोष्टीत पण सुख मानणारी ही एक निसर्गाची सुदंर कलाकृती आहे….
ती तुमच्या आयुष्याच्या रथाच एक चाक आहे….
सर्व सुखी होऊ पाहणाऱ्या कुंटूबासाठी……
???????
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??




कृपया आपला संपर्क क्रमांक द्या.
नमस्कार,
मी सौ.पुष्पा राजेश राऊत
सदर लेख माझा स्वलिखित आहे.शिवाय कॉपीराईट आहे.
तुमच्या ब्लॉगवर आज माझा लेख माझ्या वाचनात आला.त्यामुळे साहजिकच मला आनंद झाला आहे.कृपा करून माझ्या लेखाला माझे नाव द्यावे ही विनंती…..जेणे करून असेच उत्तमोत्तम लेख माझ्या हातून नव्याने लिहण्यात येतील.
धन्यवाद..
खुप छान
ती कर्तृत्व वाण स्त्रीला हा अभिप्राय आपोआप मिळतो . सुन्यातून विशव निर्माण करणाऱ्या नवर्याला खड्यात घालायचा विचार करणाऱ्या स्त्रीला काय ते सांगा