जेथे पैसा सुद्धा चालत नाही.
(समुपदेशक)
नमस्कार मित्रांनो आज आपण अशा काही व्यक्तींबद्दल बोलणार आहोत की ते पैशाच्या जोरावर सर्वकाही करू शकत होते. पण एक परिस्थिती अशी आली की करोडो रुपयांची रक्कम खात्यात शिल्लक असून सुद्धा ती फक्त नाममात्र राहिली आहे. कोणताच पैसा, कोणतेच डॉक्टर, कोणतेच तंत्रज्ञान, कोणतेच विज्ञान या व्यक्तींना काहीच मदत करू शकले नाही. शेवटी सर्वकाही येथेच सोडून शरीराचा त्याग करावा लागला आणि मृत्यूचा स्वीकार करावा लागला. त्याचे मुख्य कारण हे फक्त कॅन्सर होते.
मागील दोन दिवसात दोन अत्यंत उत्कृष्ट अभिनेत्याचा मृत्यू झाला ते म्हणजे इरफान खान आणि ऋषी कपूर, विशेष बाब म्हणजे दोघांचा मृत्यू हा कॅन्सर मुळे झाला. यापूर्वीही काही प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू हा कॅन्सर मुळे झाला आहे यामध्ये विनोद खन्ना, नर्गिस दत्त, फिरोझ खान यांचा समावेश होतो. तर अजूनही काही कलाकार कॅन्सर मुळे मृत्यूशी झुंज देत आहे, जसे की मनीषा कोईराला आणि सोनाली बेंद्रे .
याठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यांनी स्वतःहून कॅन्सर स्वीकारला नव्हता तर तो त्यांना अजाणतेपणे झाला होता. पण आजही आपल्या समाजात असे काही लोकं आहेत की जे स्वतःहून कॅन्सर चा स्वीकार करतात यामध्ये प्रामुख्याने तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर यासारख्या कॅन्सर चा समावेश होता याचे प्रमुख कारण म्हणजे धूम्रपान करणे जसे की बिडी, सिगरेट, गांजा या पदार्थाचे सेवन करणे आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे जसे की गुटखा, मावा, खर्रा, खैनी, पानमसाला यासारख्या पदार्थाचे सेवन करणे.
आज आपल्या डोळ्यासमोर काही प्रसिद्ध उदाहरण आहेत की ज्याद्वारे आपण समजू शकतो की आजच्या काळात सुद्धा संपूर्ण जग कॅन्सर सारख्या आजारापुढे हतबल आहे. एक परिस्थिती अशी येते की ज्या ठिकाणी डॉक्टर, पैसा, तंत्रज्ञान, विज्ञान काहीच करू शकत नाही. अशा परस्थितीमध्ये आपल्या मनात नसताना सुद्धा आपल्याला वेळेच्या आधीच मृत्यूचा स्वीकार करावा लागतो.
व्यसन कुठलेही असो त्याचा अतिरेक मृत्यूच्या दारात घेऊन जाणारच असतो. व्यासणामुळे आपल्याला मिळालेले अनमोल शरीर हे आतमधून पोखरत जाते आणि एक वेळ अशी येते की आपल्या हातात पश्चाताप करण्या पलीकडे काहीच उरत नाही.
मित्रांनो धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारी व्यक्ती स्वतःला कॅन्सर होण्यापासून थांबवू शकतात, थोडेसे प्रयत्न केले तर आपली ही सवय नक्कीच सुटू शकते, या सवयी बरोबर आपण कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून सुद्धा स्वतःची सुटका करून घेऊ शकतो.
तंबाखू, गुटखा, मावा, खर्रा, बिडी, सिगरेट किंवा कोणतेही तंबाखू जन्य पदार्थ सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
??
क्लिक करा
आपणही तज्ञ समुपदेशक असाल आणि आपल्याला सुद्धा अशी जाहिरात करायची असल्यास,
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
क्लिक करून सामील व्हा!
??


