Skip to content

भविष्याची चिंता थांबवायची असेल तर…हे करून बघा!

उद्याची चिंता थांबवायची असेल तर.. हे करून बघा!


योगेश चव्हाण


आपल्याला उद्या काय काय हवय.. हा विचार सगळेच..
अगदी न चुकता…नित्यनियमाने करत असतात…
तशी सगळ्यांची यादी पण मग वाढत जाते… नवनवीन
टेक्नाँलाँजी च्या गोष्टी..कॉम्पुटर…सुखसोयीच्या वस्तु…वगैरे ..वगैरे.. जोपासायचे छंद …

असं सगळंच आपण विचार करून
ठेवतो आणि आपल्या स्वप्नांचा अर्ध्याहून जास्त वाटा..
या भविष्यातल्या विचारांच्या हवाले करतो… मग आपण
नुसतं धावत असतो..एखाद्या कुत्र्यासारखं..कुठल्यातरी गाडीमागे….कधी गाडीला गाठतो…तर कधी गाडी धुळ चारून पसार होते….

तरी आपण मात्र दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेत पुन्हा उभेच …..भविष्याची वाट बघत …..

कधी कधी भूतकाळामध्येही रमण्याची मजा…लय भारी..
आठवड्यातून एक दिवस बागेमध्ये..नाहीतर शांत
झाडाखाली निवांत बसावं आणि आपल्याला पुन्हा काय
काय करायला आवडेल…हे विचार करून बघावं. ..मग कळून
चुकतं..की भविष्यापेक्षा भूतकाळातच आपण सगळी सुखं
हरवून बसलो.. एका अनोळख्या जगातल्या सुखांसाठी..आपण ती ओळखीची सुखंच मागे ठेवून आलो आणि किती केल्या ती मग पुन्हा येत नाहीत… पण समजा.. अशी संधी तुम्हाला मिळाली तर काय काय करायला आवडेल ???

मला ….

गावी जावून आंब्याच्या झाडाखाली..नारळाच्या झाडाखाली.. शांत पडून रहायचय ….. त्याच झाडाला मिळेल तो दोर बांधून..
त्यावर गोणपाट टाकून झोका करायचाय आणि अगदी सूर्य मावळेपर्यंत खेळत रहायचय ……पुन्हा एकदा शाळेचा युनिफोर्म घालून..मित्रांबरोबर बाकावर बसायचय …..आईच्या फाटक्या साड्यांनी आणि चिंध्यांनी तयार झालेली गोधडी अंगावर घेवून शांत झोपायचय …….

२५ पैशाचं सॉरेट आणि त्यातून मिळालेलं सचिन आणि बाकी क्रीकेटरचे फोटो….स्टीकर ..कंपासपेटीत..चिकटवायचेत..बैलगाडीतून सैर करायचीय…गुरांना माळरानावर चरायला घेवून जायचय ……पुन्हा एकदा हातात बँट ..बाँल व स्टंप घ्यायचेत…तो क्रीकेटचा वीस रुपयाचा बाँल घेण्यासाठी आईने दीलेल्या खाउच्या पैशात काटकसर करायचीय…आणि ..रस्त्यावर…घरासमोरील अंगणात गोट्या खेळायच्यात…

गुळाचा खडा आणि शेंगदाणे खिशात घालून जंगलभर फिरायचय..हातात दगडं घेवून लोणच करण्यासाठी कैऱ्या पाडायच्यात..पतंगांची कण्णी…बदामी मांजा ..आणि हातात फिरकी हवीय…
दिवाळीला..साधाच पण घरी बनवलेला कंदील हवाय ……..
शाळेची मधली सुट्टी आणि मधल्या सुट्टीतला गोपाळकाला हवाय ……असं बरंच आहे यादीत. सगळच नाही मिळालं तरी चालेल,
पण थोडंसं …..मनाला शांत करण्याएवढं …..

निखळ खदखदून हसण्याएवढं …….


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “भविष्याची चिंता थांबवायची असेल तर…हे करून बघा!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!