Skip to content

‘Sex Chat’ करताय!! जरा सांभाळून !!!

‘Sex Chat’ करताय!! जरा सांभाळून !!!


सुजाता बजाज


मुलगा किंवा मुलगी वयात आले की अनेक हार्मोनल बदल घडत असतात. अनेक विचार मनात येऊन जातात.खूप गोष्टी आकर्षित करतात. घरातून योग्य मार्गदर्शन हवे. काहीजण चुकीच्या मित्रांच्या संगतीत जातात, कुठेतरी गुंतात,वाईट मार्गाला जातात. यात mobile हातात आहे प्रत्येकाच्या, इंटरनेट बरीच माध्यमातून अनेक विषय हाताळले जातात. त्यातलाच एक प्रभावी विषय लिहते आहे. खुपजनांना प्रश्न पडला आहे आता मी काय लिहणार एवढा sensitive विषय ,नको लिहू बरेचजण inbox गाठला. काहीजण रागावले ही. पण मला काही सांगू वाटते आहे म्हणून लिहते आहे कारण या वयातून आणि अनेक प्रश्न डोक्यात घेऊन मी ही गेली आहे. नशीब इतकेच की आई ने खूप छान समाजवले सगळं योग्य वयात काय चूक ,काय बरोबर ते. त्यामुळे चूक कधी घडली नाही आणि अजून ही काही चुकीचे करावे वाटत नाही.

माझा आजचा विषय आहे सेक्स चाट . हा विषय वाचून अर्धे लोक अस्वस्थ झाली, अर्धे लोक उच्छुक झाली. बरेचजण माझ्यबद्दल वेगळा विचार ही करू लागली असतील. पण एक लक्षात घ्या fb वापरणारे प्रत्येकाला या विषयाला रोज सामोरे जावे लागते. अगदी साजूक आणि अडाणी कोणी नाही इथे. मला हा विषयात काहीच नावीन्य वाटत नाही आहे.

लोक लग्न का करतात याचे उत्तर माहीत आहे का ? अनेक उत्तर येतील. निसर्गाने स्त्री आणि पुरुष दोन वेगळे मानव बनवले आहेत. या दोघांमध्ये नैसर्गिक बदल घडत असतात जसे जिवंत राहण्यासाठी जेवण लागते तसेच माणसाची शारीरिक गरज ही असते. ती गरज पूर्ण होणे ही महत्वाचे असते. ही गरज भागविण्यासाठी लग्न करणे गरजेचे नाही . पण लग्न करून मान्यता दिली जाते की तुम्ही आता एकत्र राहू शकता. समाजात या कारणासाठी लग्न हा विधी आहे.

सेक्स विषयावर लोक जास्त इच्छुक आहेत कारण जग ही बदलत जात आहे. Tv, media, net या माध्यमातून अनेक गोष्टी लहान वयात सामोरे येतात. मग मुले नकळत सगळे जाणून घेतात त्यांना ही त्याचे आकर्षण असते. काहीजण प्रेमात ही पडलेले असतात. प्रेमात पडणे,gf, bf असणे ही खूप साधी गोस्ट आहे. कोणी ही कोणच्या ही प्रेमात पडतो आहे याचे कारण आकर्षण, अतृप्त असणे असे अनेक कारणे आहेत. मला fb वर खुपजण ब्रेकअप झालेलं दिसतात.काहीजण online, काही real life मध्ये.

या गोष्टी का घडत आहेत कारण घरी लोकांना एकमेकांना देण्यासाठी वेळ नाही. मग बरेच गोष्टी आपण मित्र, मैत्रिणीशी बोलतो काहीजण इतके गुंतात की प्रेमात पडतात, अगदी वाहवत जातात. अचानकपणे समोरची व्यक्ती गायब झाली की जीवनात एक पोकळी निर्माण होते मग बेचैन,अस्वस्थ होणे, मिस करणे, मग आपोआप मानसिकरित्या व्यक्ती कमजोर होत जातो. त्याला कोणाचीतरी गरज भासू लागते. मग नवीन व्यक्तीचा शोध चालू होतो. असे खूप प्रकार आहेत आजकाल. काहीजण मनोरुग्ण ही झाले आहेत यातून,भयानक आहे हे सगळे.

सेक्स चाट म्हणजे काय ?

हा प्रश्न मला ही पडला होता मी एकदा चाट रूम join केली 8 दिवस तिकडे होते आपली identity दिसत नाही ,मुलगा ,मुलगी काही कळत नाही. तिकडे बोलला जाणार विषय म्हणजे sex. यात सुरवात शरीराचे भाग , त्यांचा आकार ect मधून चालू होते. मग खूप खोलवर चर्चा केली जाते. समोरच व्यक्ती मानसिकदृष्ट्या हानिकारक आहे. मला आधी समजत नव्हते हा काय प्रकार आहे. मी बघत बसायचे काही शब्द ही समजत नव्हते मग google वर अर्थ शोधून मग समजायचे. 4 दिवसांनी लक्षात आले काय चालू आहे. मी कधी असले प्रकार केले नाही आणि आवडत ही नाही. नंतर मला किळस येऊ लागली. मी लेफ्ट केली चाट रूम. परत कधीच गेली नाही. मग मी विचार केला काय केले आपण या 5,6 दिवसात? काहीच केले नाही फक्त जो विषय महत्वाचा नाही त्यावर जास्त अभ्यास केला. यातून मनात विचारांचे काहूर माजले, बेचैन झाले. यातून मिळाले काही नाही फक्त काय असते हे समजले. हा विषय शास्त्रीय दृष्टीने किंवा शैक्षणीक पातळीवर घेतला तर बोलता येतो पण त्याचा दृष्टीकोन आणि हेतू ही तसा हवा maturity levle ही हवी. हा विषय चर्चा करणे किंवा चाट करणे याची गरज का भासते याची कारणे

1)लहान वयात आकर्षण
2)सारखे sex आणि porno video बघणे
3)ब्रेकअप
4)घरी आपला जोडीदार आपली शारीरिक गरज भागवू शकत नसेल.
5)नोकरीमुळे दोघांचे वेळ जमत नाही एकमेकांना वेळ देता येत नाही.
6)साधारण 23 to 29 वयातील मुले याबाबतीत जास्त exited असतात त्याचे कारण आहे शारीरिक बदल. हार्मोनल लेव्हल बदल होत असते.
7)काहीजण timpass म्हणून करतात आणि व्यसनी बनतात.

अश्या अनेक प्रकारच्या करणामधून याचा जन्म होतो. मला एक गोस्ट समजते जो विषय आपण जगापासून लपवून करतो किंवा चर्चा केली तरी लाज वाटते. हा विषयावर अनोळखी लोकांशी बोलून काय मिळणार आहे. फक्त exitement याने आपल्या मनावर आणि शरीरावर ही परिणाम होतो. शारीरिक गरज भागत नाही तर मानसिक समतोल आणि हर्मोनल लेव्हल बिघडते. पण हे सांगणार कोण? कारण हा विषय आमचा नाही बाबा ,आम्ही असे वाटतो का ,काहीपण विचारता तुम्ही अनेक शंका मनात घेऊन व्यक्ती जगत असतात. चूक किंवा बरोबर हे आपले आपणच ठरवत असतो. परिस्थिती आणि गरज या दोन्ही गोष्टीची सांगड घालून व्यक्ती वागतो. हे पण कडू सत्य आहे. मग आता यावर उपाय काय करावे ?

1) योग्य वाटेल आणि स्पष्ट मनमोकळे बोलता येईल अशा व्यक्तीशी या विषयी बोलावे.
2)असे कोणी सापडत नसले तर आपल्या फॅमिली डॉक्टर सोबत बोलून घ्यावे.
3) meditation म्हणजे ध्यान योग याने ही खूप फरक पडतो.
4)आपल्याला या गोष्टीसाठी प्रवृत्त करणारे व्हिडीओ बघणे टाळावे.
5)आपल्या जीवनसाथी हा विषय बलावा माझी ही गरज आहे मला एवढे पुरत नाही काय करता येईल यावर मार्ग काढावा.
6)हार्मोनल inbalnce ही एक मोठी समस्या आहे याचा योग्य तो उपाय करावा.

एकंदरीत आणि थोडक्यात म्हणजे जी गोष्ट लग्नानंतर चार भिंतीत केली जाते . त्या गोष्टीची चर्चा करणे म्हणजे सेक्स चाट. जे लोक आधीच करतात या गोष्टी त्यांना त्याची चव नसते. लग्नानंतर केली जाणारी गोष्टी ही लग्नानंतरच सुंदर असते. आता या वाक्यावर हसतील खुपजण. इथे असे हि नाही आहे की लग्न झाले नाही म्हणून हा विषयावर बोलतात उलट आहे लग्न झालेले लोक जास्त बोलतात. वर कारणे दिली आहेत आणि उपाय ही दिले आहेत. सेक्स चाट स्त्रिया ही करतात आणि पुरुष ही.

एक मानसिक विकृती म्हणजे सेक्स चाट आहे बाकी काही नाही. माझं मत असे आहे जी गोस्ट अनुभवायची असते त्याचा आनंद घ्याचा असतो ती बोलून किंवा चर्चा करून त्याची चव घालवतात लोक. तुम्ही यातून लवकर बाहेर पडावे आणि चांगले जीवन जगावे एवढीच इच्छा आहे.

मला जेवढे समजले किंवा माहीत आहे त्यावरून मी लिहले आहे योग्य ,अयोग्य माहीत नाही. अजून काही मुद्दे असतील तर नक्की कंमेंट्स करा मला ही माहीत होईल. फक्त एक विनंती आहे पोस्टला वेगळे वळण देऊ नका. साकारण जे लिहायचे ते तुम्ही लिहा. मी विषय लिहला म्हणजे मला आवड आहे असे नाही. मला या विषयाची किळस येते. मी चर्चा ही करत नाही पण गेले 2 महिने मध्ये असे प्रसंग समोर आले की मला लिहल्याशिवाय राहवले नाही.

धन्यवाद एवढी मोठी पोस्ट वाचली म्हणून आणि मला समजून घेतले म्हणून. काळजी घ्या आणि सुखी,आनंदी रहा बस इतकेच. ?


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

16 thoughts on “‘Sex Chat’ करताय!! जरा सांभाळून !!!”

  1. Kunal Sainath Kasar

    बजाज mam,
    माझी आपणास विनंती आहे, या लेखाचा भाग 2 याच लेखन करावे.
    तुम्ही please संपर्क करा kunalkasar44@gmail.com

    या लेखाची दुसरी आवृत्ती मध्ये कोणत्या मुद्द्या वर लिहावं Discussion करू शकतो

    Please bajaj mam

  2. Kunal Sainath Kasar

    काहि लोकाना शारीरिक गरजा भागवता येत नाही ,
    काहि स्त्रियाच हवे तसे समाधान होत नाही कारण वया मुळे पुरुषात आलेली शारीरिक कमजोरी ,
    मग नाही शारिरिक दृष्टया तर मानसिक का होईना ती पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात.
    मला तरी वाटत आहे यात वावग काहीच नाही .
    सेक्स चाट हे त्यातलाच एक माध्यम आहे .

    तसेच पुरुषानं बद्दल , कमी वयातले मुल ( १६ – २५ ) हे पण समाधानी होण्याचा पर्यंत करतात , आपल्या लैंगिक गरजा बघवन्याचा एक माध्यम शोधतात त्यात मग पोर्न व्हिडिओ आणि सेक्स चाट हे काही माध्यम वापरतात .

    अप्रत्यक्ष पणे ते लैंगिक शिक्षण पण घेतात आणि
    एकमेकांची मदत देखील करतात असे मला वाटते , हवं तर १० – १५ ओळखीच्या आसलेल्या पैकी वर संभाषणातून प्रयोग करून बघा ,
    n comments मधे आपले अनुभव सांगू शकता .
    ( अनुभवाचे बोल )
    आणि हो अजून एक बजाज mam ने तर मानसिक विकृती म्हटल आहे असू पण शकत, पण मला तर तस काही वाटत नाही कारण मी जेव्हा अनुभवलं तेव्हा तसे काही जाणवले नाही.
    मित्रान सोबत देखील यावर बोलणं झालं होत, ते पण म्हणत होते कधी ना कधी कोणी ना कोणी हे अनुभवत त्यात काही विशेष नाही

    चुकीचे वाटत असल्यास माफी असावी

    कुणाल कासार
    ११th १२th मानसशास्त्र विद्यार्थी

  3. प्रथम ता धन्यवाद खूपच संवेदनशील विषय आहे या विषयावर खूपच कमी लेख येतात. तरुण पिढीला या विषयी योग्य मार्गदर्शन खूपच कमी मिळते. तुमचा या लेखामूळे तरूण पिढीला खूप छान मार्गदर्शन मिळणार आहे. खूप-खूप धन्यवाद

  4. नामदेव कदम

    मस्त वाटतंय वाचून समाधान वाटलं

  5. Sex chat म्हणजे नक्की काय? तर खरंच चुकीच्या वयात बघीतलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी केलेला Google research आणि नंतर आकर्षक वाटल्याने चुकीच्या पण चर्चा करणाऱ्या मुला मुलींमध्ये मिसळून एकतर क्षणीक आनंद घेणे किंवा व्यसनाला बळी पडून आयुष्य उध्वस्त करून घेणे. कारण, नुसतं बोलून अशा समुहात चाचपडलं जातं नाजूक मासा कोणता नंतर गळाला लावायचा आणि खेळ संपला. काही जण सावधपणे बाहेर पडतात तर काहीजण शिकार होतात. कारण, हा पालकांकडून स्पष्टपणे समजून घ्यायचा विषय आहे. कट्ट्यावर जाऊन चहा दारू आणि सिगार चे छल्ले बनवत चघळायचा विषय नाही.
    पहिले कट्टा असायचा आता Whatsapp आहे.

  6. खूपच छान आहे सुंदर माहिती लिहिली आहे???

  7. Rohit Kishor Landge

    सेक्स संबंधी इच्छा पुर्ण करण्याचे अनेक प्रकार असु शकतात

    त्यात सेक्स चॅट हा प्रकार पण असु शकतो किवा पोर्नोग्राफि सुद्धा … त्यात गैर काहीही नाही … ज्याची त्याची आवड

    ज्याला जे करावेसे वाटते ते करु द्या
    आपण भारतीय लोकांनी दुसऱ्याला जज करणे व दुसऱ्याच्या जिवनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे सोडुन दिले पाहिजे

  8. Mi tase khup chat kelo aahe aani the pan fully matured tyamule mala kadhi adchan aali nahi

  9. अप्रतिम…. तुम्ही यावर लिखाण करणे थांबऊ नका… छाध वाटल वाचून

  10. मनःपुर्वक आभार ताई लॉकडाउन मुळे हे प्रमाण वाढले आहे. तुमचा लेख अनेक जणांना मार्गदर्शक ठरेल असाच आहे.

  11. Khup chan ani agdi barobar bolat tumhi partekachi mansikta badlat chali ahe mg ti shree asel kivha purush..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!