Skip to content

घरी राहून-राहून ‘तणाव’ वाढलाय ना…मग उपाय समजून घेऊया!

साथीच्या रोगतील तणावाला सामोरे कसे जावे.


भूषण सुकेशनी वामनराव


आज कोरोनामुळे सर्वत्र तणावजन्य वातावरण झाले आहे.कोरोनाला WHO ने Pandemic म्हणून घोषित केले आहे. Pandemic म्हणजे साथीचा रोग देशभर किंवा खंडभर पसरणे.

Pandemic परिस्थितीचा इतिहास.

-यापूर्वी मानवी इतिहासात आपण 3 वेळेस साथीच्या रोगांना सामोरे गेलो आहोत.त्यावेळेस एवढे तंत्रज्ञान प्रगतसुध्दा नव्हते.
1)1720: प्लेगची साथ
2)1820: काँलाराची साथ
3)1920:स्पॅनिश फ्ल्यू (50 कोटी लोकांना लागण झाली होती.यात 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.भारतात 1 कोटीच्या आसपास लोक मृत्यूमुखी पडले होते.)

साथीच्या रोगामुळे निर्माण होणाऱ्या प्रमुख समस्या

1) साथीच्या रोगाचा प्रसार- यात रोगाची लागण होते आणि कमी जास्त होते.

2) अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम- कोरोनामुळे $1-2 ट्रिलीयन डॉलरचा फटका आर्थिक व्यवस्थेला बसेल.यामुळे नोकऱ्या कमी होतील.

3) आरोग्य यंत्रणेवर पडणार अतिरिक्त तणाव-अचानक वाढलेल्या रोग्यमुळे सर्वाना उपचार करणे शक्य होत नाही.भलेही तुमची आरोग्य यंत्रणा कितीही सक्षम असली तरिही.

4) सामाजिक-आर्थिक समस्या – यात गरीब वर्ग सर्वात जास्त भरडला जातो.यांच्याकडे कुठलेही आर्थिक पर्याय उपलब्ध नसतात.

– साथीच्या रोगाला नियंत्रित करण्यासाठी 4 उपाय आहेत

1) Risk Communication – साथीच्या रोगामुळे सर्वत्र रोगाबद्दल चुकीची माहिती पसरवली जाते.याकाळात सरकार मार्फत योग्य ती माहिती सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचणे गरजेचे असते.

2) Pharmocological Tratments-
यात संबंधित आजाराविषयी लस आणि औषधोपचाराचा समावेश होतो.या उपायात लस भेटणे कठीण आहे.

3) Hygiene Practices –
यात व्यक्तिगत आणि सार्वजनीक स्वच्छतेचा समावेश होतो.हात धुणे, शिकतांना रुमाल वापरणे, घरात आणि परिसरात स्वछता ठेवणे.हे ही जर आपण नाही केले तर हा आजार पसरण्यास प्रमुख कारण ठरते.

4) Social Distance- हा या आजारावरील सर्वात प्रभावी आणि शेवटचा उपाय आहे.निरोगी व्यक्तीने बाधित व्यक्तीच्या संपर्कात न जाणे.भारतातील 21 दिवसाचे lockdown याच अनुषंगाने करण्यात आले आहे.
यात पण अशी समस्या आहे की लोक नियम पाळत नाहीत.बाधित व्यक्तीची माहिती लपवतात.

हे सगळे उपाय तेव्हाच काम करतील ज्यावेळेस याचे प्रत्येक व्यक्ती काटेकोरपणे पालन करेल.

तणावासाठी खालील उपाय.

1) टोकाची नकारात्मकता आणि सकारात्मकता टाळा.

-उदभवलेल्या परिस्थिती बद्दल आपण जर अतिरीक्त तणाव घेतला तर त्याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.त्यामुळे सतत नकरात्मक होणे टाळा.

-टीव्हीवरील आणि सोशल मीडियावरील बातम्या सतत पाहिल्यामुळे नकारात्मक आणि ताण वाढतो.मग मनात शंका निर्माण होतात.साधा सर्दी ताप जरी आली तरी लोक पॅनिक होतात.कोणी कोणी अतिरिक्त राशन भरून ठेवतो.त्यामुळे शक्यतो फक्त अपडेट पाहण्यासाठी बातम्या पाहा.

2) इतरांना दोष देऊ नका.

-उदभवलेल्या परिस्थितीमुळे आपण आलेला ताण घालवण्यासाठी दोष द्यायला लागतो.मग तो कोण्या देशाला असेल, काही विशिष्ट समूहाला असेल किंवा सरकारला.बाधित व्यक्ती सोबत जर आपण चांगला व्यवहार आपण नाही केला तर इतर लोक ते बाधित असल्याचे सांगण्यास भितात.

3) आत्मविश्वास बाळगा घाबरून जाऊ नका.

-बरेच जण घाबरून जाऊन सॅनिटाइझर, मास्क आणि राशनचा अतिरिक्त साठा करताना दिसून येत आहे.तसे करू नका.असे केल्याने गरजू लोकांना वस्तू मिळत नाहीत.

-फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.शासकीय नियमाचे पालन करा.कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.

-या परिस्थितीत तुमची भूमिका खूप महत्वपूर्ण आहे.नियम पाळा.जबाबदारी ओळखा.

-जसा एक सडका कांदा सगळ्या चांगल्या कांद्याना सोडवतो.तसाच एक बाधित व्यक्ती अनेक निरोगी लोकांना बाधित करू शकतो.

-आलेल्या संकटाचा आपण निश्चितच सामना करू आणि त्यावर विजय मिळवू.मानवी इतिहासात यापेक्षा भयंकर परिस्थितीवर आपण विजय मिळविला आहे.

धीर धरा.सुरक्षित राहा.

टीप-या लेखासाठी The Psychology of Pandemic -Steven Taylor या पुस्तकाचा आधार घेतला आहे.


सदर लेख हा Stress Management या कोर्स मधील आहे.कोर्सच्या आधीक माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करून संपर्क साधा.

क्लिक करा!


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “घरी राहून-राहून ‘तणाव’ वाढलाय ना…मग उपाय समजून घेऊया!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!