प्रेम
सांगली
8459730502
प्रेम! शब्द जरी उच्चारला तरी रोम रोम पुलकित होऊन जातो.खर तर साऱ्या सृष्टीला बांधून ठेवण्याचं सामर्थ्य या अडीच अक्षरात आहे.प्रत्येक मानव जातीचा जन्म आपल्या आईच्या उदरातून होत असतो.आपण जन्माला आल्या आल्या टोहो फोडत असतो.परंतू आईने तिच्या छातीला बिलगून घेताच आपण जणू स्वर्गीय आनंद अनुभवतो.आणि तिथेच प्रेमाचा जन्म होतो.आईच्या उबदार स्पर्शात अफाट प्रेम आहे याची ती पहिली जाणीव आपणास होते.प्रेमाला शब्द लागतच नाहीत.एका स्पर्शातचं त्याची क्षमता अफाट असते.म्हणजे प्रेमाचं उगमस्थान जणू स्पर्शच!
त्यानंतर आपणास ओळख होते ती इतर नातेवाईकांची.त्यांच्या प्रेमाची!प्रेम एक दिव्य अनुभूती,दिव्य शक्ती आहे.याला व्यवहार जोडला गेला की,यात डोकावतात मतभेद आणि कलह.पण जिथे खरं प्रेम असतं तिथं असतं सामंजस्य! अर्थात हे दोन्ही कडून असावं लागतं.एकांगी कोणतीच गोष्ट यशस्वी होत नाही.
सुधा मूर्ती म्हणतात, सचोटी रक्तात असावी लागते.अगदी तसंच प्रेम ही भावना हृदयात असावी लागते.म्हणूनच म्हणतात की,प्रेम लाभे प्रेमळाला! मूळात खरं प्रेम, खोटं प्रेम असं काही नसतंच.एक तर प्रेम असतं किंवा नसतं.प्रेम ही भावना मनात असावी लागते.ती जोपासावी लागते.प्रेमात जपणं असतं,जोपासणं असतं.प्रेमाचंच दुसरं नाव त्याग असतं.प्रेमात आपल्या माणसांचा आहे तसा स्विकार असतो.इथे मला मोहब्बते या फिल्ममधील ओळी आठवतात….
“कोई प्यार करे तो तुमसे करे, जैसा हो वैसा करे,कोई तुम्हें बदलके प्यार करे,तो वो प्यार नहीं सौदा करे!”
या ओळी खूप काही सांगून जातात. खरं तर प्रेम ही भावना सर्वच नात्यांसाठी तितकीच महत्त्वाची आहे.परंतू आपल्या मानव जातीत ‘प्रेम’हा शब्द जरी उच्चारला तरी सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहतात ते केवळ प्रियकर आणि प्रेयसी!
प्रेम हे फक्त त्यांचीच मक्तेदारी नसते.मानव प्राणी जगतो ते याच दिव्य भावनेवर!दु:खाच्या क्षणी मनावर आपल्या आप्तजणांची फुंकर ही लाखमोलाचा आधार असते.हे आप्तजण रक्ताचेच असतील असं नाही.जिथे व्यवहाराविना प्रेम असतं, जपणं असतं,जाणिवा असतात ते खरं नातं!
पण आजकाल सर्वांचीच तक्रार असते की, असं प्रेम दुर्मिळच आहे.पण आपण इतरांकडून अशा प्रेमाची अपेक्षा करताना आपणही आधी असं अटींविना प्रेम करायचं असतं हेच विसरून जातो.खरं तर जिथे तक्रारीच जास्त असतात तिथे प्रेम नसतंच.प्रेमाच्या दिव्यत्वाची प्रचिती येणारे तसे दुर्मिळच असतील.कारण खुपदा यात समोरची व्यक्ती तशी नाही अशाच तक्रारी जास्त असतात.पण जिथे दोन्ही बाजूला प्रेम उमगलेलं असतं, समजलेलं असतं तिथेच या दिव्य भावनेची प्रचिती घेता येते.प्रेमाच्या अभिव्यक्तीच स्वरुप हे वेगवेगळ्या नात्यांनुसार भिन्न असेल, परंतु त्याचा मूळ भाव सर्वाठायी एकच असतो.इथे एक इंग्रजी कविता सांगाविशी वाटते…
That’s Real Love
I love you; because
I need you; it’s negative.
I need you; because
I love you; it’s positive.
But I love you because
It’s without a because.
That’s why I love you
All the good and bad
As it is in you.
I love you;I need you
I love you;I want you
That’s real love.
वरील ओळींचा अर्थ ज्याचा त्याने समजून घ्यायचा असतो.आपणा सर्वांना माहीत आहे की, प्रेम हे निरपेक्ष असतं.प्रेमात जपणं असतं.आणि ते जपणं पोकळ शब्दांतून नाही तर ते कृतीतून दाखवून द्यायचं असतं.पण आपण सारेच अडकतो ते केवळ शब्दात! मग आम्हाला हवे असतात चंद्र तारे अन् प्रेमाचे वारे! वास्तव जीवनात जगताना दोन आपुलकीचे शब्द, कधीकधी नि: शब्द असा स्पर्श मनाला उभारी देत असतो.आणि हेच ते प्रेम असतं.
नातं कोणतही असो त्याचा बेसंच मुळी प्रेम आहे.आणि ते ज्याला उमगतं तिथं निश्र्चितच प्रेम रुजतं.खरं तर प्रेमाचं बीजं हृदयात असावं लागतं.ज्याला प्रेम देता येत त्यालाच ते घेताही येतं.सतत नात्यात व्यवहार पाहणाऱ्यांना प्रेम उमगावं ते कसं?
व.पु.म्हणतात,प्रेम केवळ सहवासाने निर्माण होतंच नाही.तसं असतं तर, अगदी लहानपणापासून एकत्र राहणाऱ्या भावाबहिणीत ते अपार दिसलं असतं.कधी कधी वर्षानुवर्षे एकत्र राहूनही माणसं अनोळखी आणि प्रेमाचा लवलेशही नसणारी दिसतात.पण कधी कधी मैलोनमैल असणाऱ्या मनांमध्ये ते प्रेम जीवंत दिसतं.
याचाच अर्थ प्रेम ही दिव्य भावना रुजायला मनं जुळावी लागतात.प्रेमात हक्क नसतो,पण आपलेपणा असतो.प्रेमात आहे तसा स्वीकार केला जातो.तिथे वाद कमी पण सुसंवाद जास्त प्रमाणात दिसून येतो.प्रेम वास्तवात जगतं.अपेक्षा विरहीत देणं हे प्रेमातंच असतं.प्रेमाचा अंकुर तिथेच रुजतो जिथे तशी मनं असतात.प्रेमाची भाषा शब्दांपेक्षा स्पर्शावर जास्त आधारलेली असते.म्हणूनच डोळ्यांची भाषा, खांद्यावरील हात, उबदार मिठी माणसाला दहा हात्तींचं बळ देतात.
प्रेम माणसाला जगणं शिकवतं.जगायचं बळ देतं.शेवटी ज्याचा त्याचा दृष्टीकोन!
पण प्रेम म्हणजे दैवी शक्ती! माणुसकीचा आधार आणि मानवी जीवनाची शक्ती आहे. पण ही दिव्य भावना समजून घेणारे आणि वागणारे असावे लागतात.तसे खूपजण आपल्या आजूबाजूला असतातही.ते प्रेमाला आपली शक्ती बनवून जीवन सुंदर बनवतात.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



