Skip to content

त्याच्या आयुष्यातली ती एक घटना….मनाची एक अद्भुत ओळख…वाचायलाच हवी !

अंबरीश
काल माझ्या आजीला गावाकडे सोडून सेनगाव हुन हिंगोली मार्गे नांदेडला परत येत असताना private वाहनाने (काळी पिवळी ने) प्रवास करण्याची चूक मला मोठ्या प्रमाणावर भोवली. संध्याकाळी 6 वाजता असणारी शेगांव गाडी 7 वाजत आले तरीही आली नव्हती, म्हणून मग स्थानिक लोकांचा सल्ला ऐकून हिंगोली पर्यन्त jeep ने येण्याचा मी निर्णय घेतला. परंतु येत असताना मी प्रवास करत असलेली jeep पुसेगाव च्या जवळपास कुठेतरी 15 फूट खोल खड्यात पडली. जीप मध्ये साधारण 12 ते 15 जण होते.
मी आपला नेहमी प्रमाणे डोळे बंद करून स्वतःचेच मन वाचण्याचा त्याची बडबड ऐकण्याचा त्याला वर्तमान क्षणाशी जोडून ठेवण्याचा श्वासासोबत राहण्याचा सराव करत होतो अचानक कुणीतरी ओरडले आणि त्याच क्षणी अगदी शिथिल पडलेल्या माझ्या शरीरावर गुरुत्वाकर्षनाच्या विरोधात काहीतरी होतंय असे मला जाणवले. एखाद्या चेंडू सारखे माझे शरीर गाडीच्या टपरा वर सीट वर आदळत होते. पण प्रत्येक क्षणात जगण्याची वर्तमान क्षण स्वीकारण्याची मी स्वतःला लावत असलेली सवय! या सवयीने मी त्या क्षणाला कसलाही विरोध न करता जे घडतंय त्याच्या पूर्ण पणे सोबत राहिलो. 
4-5 सेकंदाच्या त्या कालखंडात माझा शरीराप्रति असलेला साक्षीभाव एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोचला होता. त्या 4-5 सेकंदात माझे शरीर गुरुत्वीय अनुभवाशिवाय असलेले त्याचे अस्तित्व अनुभवत होते. गाडी रोड सोडून 15 फूट खड्यात पडली.
सर्वांचा एकच गोंधळ आरडाओरडा सुरू झाला मी मात्र अगदी शांत पणे मागचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करायला सुरुवात केली काट्याच्या झाडात मागचा दरवाजा अडकलेला असल्याने तो निघत नसावा कदाचित. कशी ते माहिती नाही मी दरवाजा वर जोरात लाथ मारली आणि दरवाजा निघाला. सावकाश काट्यातून वाचत वाचत मी जीप बाहेर आलो. मागच्या सीट वर माझ्यासोबत बसलेल्या 3 जणांना बाहेर येण्यासाठी मदत केली. ते तीन जण बाहेर येताच त्यांनी driver वर आई-बहिणीचा उद्धार करत शिव्या द्यायला सुरुवात केली. 
नेहमी शांत असणारा मी त्यांच्यावर कसा रागावलो माहिती नाही पण त्या क्षणात driver ला रागावून काही ही फायदा नाहीये ही गोष्ट त्यांनाही पटली असावी. आम्हि खड्यात पडलेल्या गाडीला पहायला सुरुवात केली मधल्या सीट वर बसलेल्या 4 ladies आरडाओरडा करत होत्या. पण जीप डाव्या बाजूला पूर्णपणे पलटी झालेली असल्याने त्यांना बाहेर येणे जमत नव्हते. ड्राइवर उजव्या बाजूला असल्याने त्यालाही गाडीबाहेर येणे जमत नव्हते. मग आम्ही चौघांनी ती पलटी झालेली जीप उचलून तिला सरळ करण्याचा निर्णय घेतला. 
आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली आणि रोडवरून जाणारे 3-4 जण त्यांच्या गाड्या बाजूला लावून धावत मदतीला आले(शिकवण: तू प्रयत्न करायला सुरुवात तर कर मदत नेहमीच तयार असते) ती जीप थोडी उचलताच मधल्या सीट वर बसलेल्या 4 ladies पैकी एक स्त्री गाडीतून खाली पडली आणि ती बेशुद्ध पडलेली असल्याचे आढळून आले. जीप आदलल्यानें तो दरवाजा तुटला असावा बहुतेक. त्या स्त्रीला उचलून बाजूला केले जीप सरळ केली चार स्त्रिया ड्राइवर त्याच्या बाजूला बसलेले 3 जण सर्व बाहेर पडले. त्या नंतर रोड वरून जात असलेल्या एका car मध्ये सर्व स्त्रियांना बसवून हिंगोली ला पाठवून दिले.
त्यानंतर मला जाणवले की मला कानाच्या मागे डोक्याला वेदना जाणवत आहे. तिथून रक्त येत होते. पण सर्वाना बाहेर काढणे होईपर्यंत माझे माझ्या वेदनेकडे लक्षही गेले नाही. (शिकवण:वेदनेपेक्षा कर्तव्य नेहमी श्रेष्ठ असते. कर्तव्य करताना मिळणारे समाधान हे आत्म्याला मिळत असते तर वेदनेची जाणीव ही फक्त एक शारीरिक अनुभूती असते.) इकडे जीप मधील 5-6 जण ड्राइवर ला घेरून त्याला बदडण्याच्या प्रयत्नात होते. जीप बाहेरचे मदतीला आलेले 4-5 जण आणि मी आम्ही त्यांना समजावून मारण्यापेक्षा करायची असल्यास पोलीस case करण्याचा सल्ला दिला. पण एक बेशुद्ध पडलेली स्त्री आणि 2-3 जणांच्या डोक्यातून येणारे रक्त याखेरीज फारशी शारीरिक इजा कुणाला झालेली नव्हती. म्हणून काही वेळाने सर्व जण शांत झाले. नंतर ड्राइवर ने दुसऱ्या एका जीप मध्ये आम्हाला बसवून दिले . 
जीप मध्ये बसल्यावर मी मामाला फोन केला. त्याला झाला प्रकार सांगितला झेंडे नावाचा एक मित्र हिंगोली बस स्टँड ला मला घेण्यासाठी आला तिथे मी एक pain killer घेतली आणि अमरावती नांदेड बस ने रात्री 11.30 वाजता सुखरूप घरी पोहोचलो. घरी येऊन झालेला प्रकार आई बाबांना सांगितला.
अवघड परिस्थिती त शांत डोक्याने काम करण्याचा गुण ध्यान आणि योग यांच्या साधनेने माझ्यात विकसित होतोय. फक्त शरीरावर अजून थोडे नियंत्रण मिळवायला जमले तर मी कुठल्याही परिस्तिथी मध्ये आपले balance राखायला माझे शरीर शिकू शकेल. हा accident चा अनुभव देखील मी काल खूप छान enjoy केला. रात्री झोपताना माझीच एक कविता गुण गुण त मी झोपी गेलो.

खणखणीत वाजतय ना माझे नाणे
देवा अधूनमधून तपासून पाहत राहा
दुःखाच्या आगीमध्ये मलाही देवा 
अधूनमधून टाकून पाहत राहा…

जळून जातील सर्व अशुद्धी 
दुःखाच्या त्या आगीमध्ये
शुद्ध सोने राहील चकाकत
चित्ता च्या माझ्या वृत्तीमध्ये

आहे तुझा लाडका भक्त म्हणून
फालतू लाड माझे पुरवू नकोस
श्रीमंतांच्या त्या पोरांसारखे
देवा मला तू बिघडवू नकोस

काय योग्य माझ्यासाठी देवा
ते तूच काय ते ठरवत राहा
जीवनाचा मार्ग मला तूच
देवा योग्यवेळी दाखवत राहा

तसं तर आत्तापर्यंत वेळोवेळी
मार्ग दाखवलासच की तू…
रूपे घेऊन वेगवेगळी मदतीला
धावून आलासच की तू…

माझ्यातल्या तुझी मला 
ओळख व्हावी म्हणून
कधी कधी मलाही तू 
देवा आजमावून पहा..

कितीही संकटात सापडलो तरी मला 
कधी कधी तू लांबूनच लढताना पहा
खणखणीत वाजतय ना माझे नाणे
देवा अधूनमधून तू तपासून पाहत राहा

***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!