आयुष्यात बहुतेक वेळा आपण आपल्याच चुकांचे फळ भोगतो.
मिनल महेश झवर
(चित्रकार)
आयुष्यात बहुतेक वेळा आपण आपल्याच चुकांचे फळ भोगतो…आपण चुकीचे वागलेलो असतो आपणच आपल्यासाठी समस्या निर्माण केलेल्या असतात फक्त कधी कधी आपल्या अहंकारा मुळे समोरच्या व्यक्तीला किंवा परिस्थितिला आपण कारण बनवतो…
आपण फक्त “ब्लेम गेम” खेळतो..
उदाहरण द्यायचे झाले तर…
आपल्या तब्येतीची काळजी घायची असेल तर व्यायाम अथवा खाण्याचे हे पथ्य पाळणे अत्यन्त गरजेचं आहे हे आपण समजून असतो माहिती असतं पण आपल्या आळसमुळे किंवा खाण्याची आवड न आवरल्यामुळे आपण ते करू शकत नाही पण आपल्यावर येऊ द्यायचं नाही म्हणून रात्री झोप आली नाही म्हणून उठले नाही, वेळच नसतो, होत नाही, बाकीचे काम राहून जातील,
माझ्यासाठी काय वेगळं बनवू, हे आपल्याला परवडणार नाही, उद्या पासून बघू…असं म्हणून वेळ मारून घ्यायची…
आणि नंतर तेच,….
तसं असल्यामुळे असं करता आलं नाही…
दिवसभरात आपण कितीतरी गोष्टींवर ओव्हर रिऍक्ट करतो गरज नसताना जास्त बोलतो त्या 10 टक्के असलेल्या गोष्टींना 70 टक्क्यांपर्यंत नेतो..
मग ती कोणाची काळजी असो राग असो स्वतःची चिंता असो…
छोट्या गोष्टीला आपण खूप मोठ्ठ प्रेसेंट करतो आणि स्वतःला एंझायटीक आणि पॅनिक करून घेतो…आणि परत “ब्लेम गेम”
तसं झालं म्हणून मी असं केलं…
एकदा शांत विचार करून बघीतला तर लक्ष्यात येतं की अरे, एव्हडा मोठ्ठा प्रॉब्लेम नव्हता..पण मग आपलं स्वभावाच्या किंवा चुकीचा खापर सहज दुसर्यावर फोडतो..
घरातील काम असो, जॉब चा वर्क लोड असो, अभ्यास असो,तब्येतीची समस्या,नाती,लेबर प्रॉब्लेम, पैश्यांचा प्रॉब्लेम, सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स असतात…यांच्यातील काही ही असू शकतात…
पण आपल्या समस्या हाताळताना अथवा त्यांच्या कडे निरीक्षण करताना खरच एकदा शांतपणे विचार करा किंवा त्रयस्थपणे ती समस्या सोडवा आणि विचार करा की खरंच एव्हढ काही नाही आपण ती हँडल करू शकतो आणि गुंता सोडवू शकतो…
फक्त “ब्लेम गेम” सोडा..
स्वतःच स्वतःला प्रश्न करा आणि बघा तुम्हाला लक्षात येईल की तुम्हीच जास्त गुंतागुंत केलीय..सहज उत्तर मिळेल..
It’s not always him,her or the situation…
Sometimes it’s only “U” to create or to solve the problem…
Solution is within “U” only…
स्वस्थ रहो मस्त रहो
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
Brobr bolalat
Very nice
हे मात्र पटलं….