तंबाखूचं हे व्यसन इतकं टोकाला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं!
(समुपदेशक)
अहो डॉक्टर कसं काय शक्य आहे हे? मला तर अजून पण विश्वास होत नाही, वाटल्यास तर सर्व तपासणी पुन्हा एकदा करा नक्कीच काहीतरी चुकीचे reports आले असतील. अशीच काहीतरी माझी पहिली प्रतिक्रिया होती.
आता अगदी सुरवातीपासून सांगतो, आज माझे वय अवघे ३४ वर्षे आहे आणि या वयातच मला एक गंभीर आजार झाला तो म्हणजे तोंडाचा कर्करोग. मागील ८ वर्षांपासून मी तंबाखू खात होतो तस तर मला काही फारसं व्यसन नव्हत दिवसातून अवघे २-३ वेळा तंबाखू खायचो. मागील २-३ वर्षांपासून थोडासा त्रास व्हायला लागला, सुरवातीला तोंड हळूहळू बंद व्हायला लागले, त्याच बरोबर तोंडात लालसर चट्टा/डाग पण होता पण त्याचा कधी मला त्रास झाला नाही पण जेवतांना मात्र खूप तिखट वाटायचं.
सुरवातीला फॅमिली डॉक्टर कडे गेलो पण तिथून काही गुण आला नाही पण तंबाखू सोडण्याचा सल्ला दिला ते मी काही मनावर घेतले नाही. ” मी तर २-३ वेळाच खातो मग कशाची भीती” हळूहळू त्रास वाढत गेला आणि आता मात्र तोंड उघडायचे पूर्णपणे बंद झाले आता तर तोंडात एकच बोट जात होते अशा परिस्थतीमध्ये पुन्हा डॉक्टरकडे गेलो यावेळी कोणताच उपचार न करता कॅन्सर रुग्णालयात पाठवले तेथे सुरवातीची तपासणी केली तेव्हा कळाले की मला कॅन्सर झाला आहे आणि तो ही जीभेला झालेला होता.
तेव्हा मला मोठा धक्का बसला येथे माझे मित्र १०-१५ वेळा तंबाखू खातात त्यांना काही होत नाही आणि मी फक्त २-३ वेळा खातो तर मला कसा काय कॅन्सर झाला?
१ वर्ष झाली उपचार करत आहे, आतापर्यंत ६ लाख खर्च झाले आणि पुढे किती खर्च होतील ते माहिती नाही. पण उपचार पूर्ण करू शकतो इतका मी सक्षम आहे. यातून एक गोष्ट गमावली ती म्हणजे माझी अर्धी जीभ. कॅन्सर झाला तो भाग ऑपरेशन करून काढून टाकण्यात आला, आज मला बोलता येत नाही, माझे बोलणे हे फक्त माझ्या परिवाराला समजते, जेवतांना त्रास होतो, जेवणाची चव मला व्यवस्थित समजत नाही.
वरील केसच्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे
१) तंबाखू १-२ वेळा खाल्ली म्हणजे आपल्याला कॅन्सर होणार नाही ही चुकीची बाब आहे.
२) सर्वांची रोगप्रतिकारशक्ती वेगवेगळी असल्यामुळे कोणाला कमी कालावधीत कॅन्सर होतो तर कोणाला कॅन्सर होण्यासाठी जास्त कालावधी लागतो.
३) कॅन्सर हा तोंडात कोठेही होऊ शकतो.
तोंडाचा कॅन्सर होण्यापूर्वीची काही लक्षणे
१) तोंडामध्ये ४ पेक्षा कमी बोटं जाणे.
२) तोंडामध्ये लाल डाग होणे.
३) तोंडामध्ये पांढरा डाग होणे.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे ही एक सवय आहे, आपण ती नक्कीच सोडू शकतो.
त्या करता काही उपाय व काही नियमांचे पालन केले तर अवघ्या काही दिवसातच ही सवय सुटू शकते.
तंबाखू, गुटखा, मावा, खर्रा, बिडी, सिगरेट किंवा कोणतेही तंबाखू जन्य पदार्थ सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
??
क्लिक करा
आपणही तज्ञ समुपदेशक असाल आणि आपल्याला सुद्धा अशी जाहिरात करायची असल्यास,
