बऱ्याच साधना आणि सराव शिकूनही मनःशांती का मिळत नाही ?
जगण्यामध्ये आणि त्याच्या समजून घेण्यात अनेक चढ उतार येतात माणसाला त्यामुळे कुणी सांगितलं म्हणून किंवा कुणी वडिलोपार्जित चालत आलेली साधना करतं म्हणून काही ना काही जोडून असतात त्यात कुणी पाठ म्हणतात रोज,कुणी उपवास,कुणी सत्संग।
हे सारे करूनही अशा काही प्रसंगांना निराळेच वागून गेल्यावर लक्षात येते कि आपली साधना कामी येत नाहीये मग लोक रस्ता बदलतात।
यामुळे मग नव्या साधनेकडून नवी अपेक्षा ठेवून कालांतराने तिथेपण तेच वाटू लागते मग खरी निराशा येते ,
असे करून आपण एक प्रकारचे गुरु शॉपिंग करत असतो ।आज हे ट्राय तर उद्या ते हे शॉपिंग मध्ये ठीक आहे पण मार्ग दिसण्यामध्ये उपयोगी येत नाही।।मुळातच धरसोड होते कारण कुठलीही साधना झिरपायला आपण योग्य वेळ दिलेला नसतो ।गोळी घेतली कि डोकेदुखी थांबलीच पाहिजे या न्यायाने काम चालत नाही यात आपली एकूण शिदोरी ,आपला स्वभाव, मिळालेले आईवडील व समाज, घेतलेले निर्णय आणि मग त्यावरून चालताना हेतू आणि सायकॉलिजिकल गोंधळाचा आपला डोक्यातला ड्रॅमा यावर काम नं करता धरसोड होतेच .
यावर उपाय म्हणजे आपला गाभा समजल्याशिवाय साधना करतोय का? कुणाला इम्प्रेस करायला करतोय का? अमका करतो म्हणून मी करतोय का?जोरजबरदस्तीने करतोय का? हे सारे प्रश्न स्वतःला नीट विचारावेत । एक ऍव्हरेज विचार करू शकणारा माणूस हे करू शकेल।ही अपेक्षा हाताबाहेर गेलेल्या मानसिक अवस्थेत अपेक्षितही नाही आणि ती होणारही नाही ।आपल्या स्वभावातील कम्पल्शन्स आपणच काढू शकतो दुसरा नाही हे सत्य आधी स्वीकारावे लागेल म्हणजे जर आपल्याला भूक लागली तर तर जसा दुसर्याने जेऊन उपयोगी नाही तसेच हे आहे।
यासारखे करण्यापेक्षा आपण ज्या पायरीवर आहोत तिथून सुरवात करावी प्रत्येकाची पायरी निराळी असते आणि त्यात चांगले वाईट कामी जास्त काहीच नसते ।आपण जर स्वीकाराने प्रसन्न राहू लागलो तर आजूबाजूलाही प्रसन्नता पसरते आणि मग मोठ्या गोष्टी नं करता सरळमार्ग दिनक्रम होऊ लागेल। आपल्या वृत्ती बदलताच आसमंत बदलतो हे सत्य आहे ।मग कधी आपण परिस्थिती सावरू तर कधी समोरचाही सावरेल आणि सुकर होईल जगणे ।नाही का?
सगळ्यांना एक आत्मपरीक्षणाची चांगली पायरी नक्की सापडो ही प्रार्थना.
शुभम भवतु
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


खूप छान विचार करायला लावणारा