Skip to content

‘प्रेम आणि अफेअर’ यामधला फरक मुलांना समजावून सांगा.

प्रेम आणि अफेअर


सौ. सुधा पाटील, सांगली

(८४५९७३०५०२)


काल पिक्चर बघत होते.अचानक एक सीन पाहताना मुलगा म्हणाला,मम्मी त्यांच अफेअर आहे.प्रेम वगैरे काही नाही.मी त्यांच्याकडे पाहतच राहिले.मग जरा दोन्ही मुलांसोबत प्रेम आणि अफेअर याविषयावर चर्चा झाली.मग विचार आला की, आजकाल सिनेमा पाहून मुलांमध्ये एक विचार सरणी तयार होते आहे.आणि तिच समाजात रुजत आहे.एक काळ असा होता की, ‘प्रेम’ याविषयावर कोणी बोलायचचं नाही.सारच चोरून असे.कारण त्यावेळची सामाजिक स्थिती तशीच होती.

पण आजकाल सभोवताली पाहिलं तर प्रेमाच्या नावाखाली काहीही चालतं.तरुण पिढीला काय किंवा आमच्या पिढीला काय प्रेम कितपत समजतं माहिती नाही.खरं तर प्रेमाचं नातंच अफेअरच्या लेबलने चिकटवले गेलंय.त्यामुळे अफेअर आणि प्रेम यातला फरकच कोणाला किती समजतोय हा गहन प्रश्न आहे.

प्रेम म्हंटले की,राधा कृष्ण सर्वांना आठवतात.पण कोणही त्यांच्या नात्याला अफेअरच लेबलं लावणार नाही.कदाचित, ते देव आहेत, आपण त्यांच्या नात्यास अपशब्द वापरले तर आपणास पाप लागेल अशी लोकांची मानसिकता असू शकेल.पण मग प्रेम आणि अफेअर यातला फरक काय? निरपेक्ष, निखळ नातं म्हणजे प्रेम! वासना विरहीत नातं म्हणजे प्रेम! जिथं जपलं जातं, काळजी घेतली जाते,आदर असतो ते प्रेम!

अशा अनेक व्याख्या प्रेमाच्या असतील.प्रेम हाच जगण्याचा पाया आहे.निसर्गाचं चैतन्यमय रुप म्हणजे प्रेम! जगण्यासाठी जितकी हवा महत्वाची तितकंच प्रेम महत्त्वाचं असतं.हे साऱ्याच सृष्टीला ठाऊक आहे.प्रत्येक नात्यातील प्रेमाची वीण वेगवेगळी असते.शेवटी काय प्रेम ही अनमोल भावना महत्त्वाची!आपण प्रेम या भावनेला ईश्र्वरी रुप मानतो. तरीही कुठे कुठे प्रेम ही भावना बदनाम करतो.कारण यात मध्ये येते ती वासना.मध्ये येतो स्वार्थ! स्त्री आणि पुरुष ही दोनच समाजाची रुपं आहेत.निसर्गत: तर त्यांच्यातच प्रेमाचा अंकुर फुलला जातो.हा अंकुर शुद्ध़ भावना ठेवून असेल, विचारपूर्वक असेल तरच त्याचा वटवृक्ष होतो.अन्यथा सारंच जमीनदोस्त!

खरं तर मुद्दा हा आहे की, तरुण पिढीला खरं प्रेम म्हणजे काय हे ओपनली सांगणं गरजेचं आहे.कारण प्रेम आणि अफेअर यात ते फरकच करतं नाहीत.आज एक ब्रेकअप, उद्या एक ब्रेकअप,परवा एक…. असं सत्र सुरू राहतं आणि मग स्थिरत्वासाठी कोणाशीतरी लग्न!आजची पिढी सरळ सरळ म्हणते, आमचं अफेअर सुरू आहे.मग प्रेम म्हणजे काय? इतरांशी चर्चा करून मुद्दे आले की, जिथे केवळ शारीरिक वासना ते अफेअर.जिथे फक्त वापर होतो,स्वार्थ असतो ते अफेअर.अफेअरमध्ये केवळ वासना हा एकच मुद्दा असतो.मग पुन्हा प्रश्र्न,मग प्रेम म्हणजे नेमकं काय? सर्वांनाच प्रेम समजायला हवं.केवळ अफेअर असंच सारे म्हणत राहिले तर मग खरं प्रेम उमगायचं तरी कसं?

प्रेमाशिवाय जगातील कोणतीही व्यक्ती जगू शकत नाही.हे तितकंच सत्य आहे.म्हणूनच प्रेमाला लेबलं न लावता स्वच्छ दृष्टिकोन ठेवून पहावं.आम्हीच आहोत जे या प्रेमाला बदनाम करतो.खरच आज गरजेचं आहे प्रेम याविषयावर मोकळेपणाने बोलण्याची.आपल्याच लेकरांना खरं प्रेम म्हणजे काय ते सांगण्याची!नाहीतर विविध सिनेमे पाहून ती प्रेमाविषयी चुकीची धारणा करून घेतात.गरजेपुरतं असतं ते प्रेम नसतंच मुळी,गरज नसतानाही जी भावना हृद्यात जपली जाते ते प्रेम!

आज प्रेम म्हणजे अफेअर हीच धारणा बऱ्याच ठिकाणी दिसते.अगदी खरं प्रेम असेल तरीही ते अफेअर असंच समजलं जातं.त्यामुळे प्रेम आणि अफेअर यातला फरक करतंच अवघड होतं.खरं तर प्रत्येकाच आयुष्य स्वतंत्र असतं.अनुभव, घटना, जीवन शैली सारंच वेगळं असतं.कोणी कोणाला दुषणं देऊच नयेत.फक्त इतकंच की, वास्तव प्रेम तरूण पिढीला सांगावं.प्रेमाच्या नावाखाली कित्येक जीव नाहकच बळी जातात.आणि मुख्य म्हणजे यात आयुष्य जास्त होरपळून जातं ते मुलींचं!कारण प्रत्त्येक मुलांच्या घरच्यांना वाटतं असतं की, आपल्या मुलाला मुलगी ही कोरी हवी.म्हणजे आधी तिचं कोणावर प्रेम वगैरे असू नये.आणि यांच्या मुलाने अनेक मुलींना फसवलं असतं ते चालतं….(समजून घ्या)

असो प्रेमाला प्रेमचं राहू द्यायचं असेल तर प्रेम म्हणजे काय? यावर बोलावच लागेल.प्रेम आणि वास्तव याची सांगड घातली जावी.जर प्रेमच असेल तर अफेअरचं लेबलं कशाला?जर राधाकृष्ण खऱ्या प्रेमाचं प्रतीक असतील तर मग अशा प्रेमाचा आदर करूयात! प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या वाईट घटना थांबवणं हे आपल्या समाजाच्या हातीचं आहे.प्रेम म्हणजे एक अनमोल देणगी!जीवनाचा मूलाधार!तेच समजून घेऊ आणि तरुण पिढीला समजावून सांगू. जाता जाता…

प्रेमात आहे जीवन सारे…प्रेमळाच लाभे प्रेमाचे वारे.वासना असते क्षणिक…प्रेम आहे अजरामर!


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

आपलं मानसशास्त्र


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!