त्याग : खऱ्या प्रेमाचा
त्या दिवशी 7.50 होऊन गेले होते तरीही मी आवरतच होते अर्जुन बाहेर येऊन केव्हाच थांबला असेल हे माहिती होतं. कारण तो वेळेचा पक्का आणि मी तेवढीच आळशी. हातात मिळेल ते घेत होते आज पक्का 8 वाजताच्या अकाउंटच्या लेक्चरला उशीर होणार आणि बाहेरच थांबवा लागेल हे दिसतच होतं. कसबस आवरून मी घरा बाहेर आले. अर्जुन वाट पाहत बसला होता.
“सॉरी सॉरी मला माफ कर ते रात्री झोपायला उशीर झाला म्हणून उशिरा जाग आली, परत असं नाही होणार”
तो म्हणाला “झोया,आता कॉलेजला जाऊन पण काही उपयोग नाही तसाही अकाउंट्सच लेक्चर काही मिळणार नाही त्या पेक्षा आपण आपल्या अड्ड्यावर जाऊन मस्त पोहे आणि चहा पिऊयात” मी लगेच हो म्हणाले.
आमच्या अड्ड्यावर आम्ही खूप वेळ जात असत. अगदी रिलेशनशिप मध्ये यायच्या आधीपासून. अर्जुन आणि मी लहानपणी पासून एकत्र होतो. एके दिवशी त्यानेच मला प्रोपोज केले. मला त्याच्या बद्दल म्हणजे त्याच्या सवयी, आवडनिवड, आई वडील, घर, इत्यादी सगळे माहिती होतं आणि मलाही तो खूप आवडत होता. म्हणून मी त्याला लगेच हो म्हणाले. पण प्रॉब्लम एकच होता तो म्हणजे तो हिंदू आणि मी मुस्लिम आणि दोघांनाही माहिती होतं की आमच्या घरचे लग्नाला परवानगी देणार नाहीत. पण आमच्या आग्रह खातर आणि प्रेमा खातर करून देतील ही पण एक अपेक्षा धरून आम्ही जगत होतो.
अर्जुन आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम होते आम्ही दोघे एकमेकांना सोडून राहण्याची कल्पना पण करू शकत नव्हतो.
बहुतेक आमच्या घरच्यांना पण आमच्या वागण्यातून कळून आले होते की आम्ही एकमेकांनवर खूप प्रेम करतो करण की आमच्या दोघांचे वडील हे खूप छान मित्र होते आणि आमच्या आई पण छान मैत्रिणी झाल्या होत्या. लहानपणी पासुनच आम्ही सोबतच ट्युशन, शाळा, आणि आता कॉलेज ला एकत्रच जायचो-यायचो. एकाच वर्गात असायचो खेळायचो म्हणूनच आमचं इतक पटायच बहुदा. आणि म्हणून आम्ही आयुष्य भर एकत्र राहायचा निर्णय घेतला होता.
पण अचानक एक दिवस कॉलेज मधून मी घरी आले. तेव्हा घराच्या बाहेर एक कार दिसली आणि मी घरात गेले असता मला कळले की पप्पानी माझ्यासाठी एक स्थळ आणले होते आणि आत मुलगा, त्याचे आई वडील, भाऊ आणि काका होते. मी पळतच माझ्या खोलीत गेले अम्मीला सांगितले..
“मला अर्जुन सोडून कोणाशीच लग्न नाही करायच, मी फक्त अर्जुनचीच आहे” आणि रडायला लागले. आईने मला समजावले की “बाळा मान्य आहे तू आणि अर्जुन लहानपणी पासून सोबत आहात तुम्हाला एकमेकांशिवाय करमत नाही पण तो हिंदु आहे आणि आपण मुस्लिम. तू जर त्याच्याशी लग्न केले तर बाहेर लोकं काय म्हणतील ”
मी ऐकतच नव्हते आणि जोरजोरात रडत होते मग अम्मीने मला समजावलं ” झोया इतका कार्यक्रम होऊ दे मग आपण सगळे बसून नीट विचार करूया. आता चांगले कपडे घाल आणि माझ्या सोबत बाहेर ये”. मी अम्मीने सांगितले तसे केले आणि कार्यक्रम झाला. मग अब्बूनां मी सगळं सांगितलं बाबा पण तेच म्हणाले ” बेटा मला तुमच लग्न लावून द्यायला काही हरकत नाहीये. अर्जुन खूप छान मुलगा आहे. त्याच्या घरचे पण तुला छान वागवतील. कदाचीत आमच्यापेक्ष्या जास्त काळजी घेतील. पण बाहेर लोकं काय म्हणतील ?
समाजातील चालीरीतीना धरून चालावे लागते. माझं ऎक मुली.. आज आलेल्या मूलासोबत लग्न कर तो पण चांगला आहे. मी इतकच सांगू शकतो तुला..बाकी तू समजूतदार आहेस…
मला सगळं समजत होत की जर अर्जुन सोबत लग्न केलं तर अम्मी अब्बुनां लोकांना तोंड द्यावे लागेल, काहीच उपाय शिल्लक राहिला नव्हता. शेवटी ते जे म्हणतील ते नाईलाजाने कराव लागेल म्हणून मी हे सगळं अर्जुनशी बोलायचं ठरवलं. त्याला सगळं सांगितलं तर तो ढसाढसा रडायला लागला….
“मला तुझ्याशिच लग्न करायचं आहे, वाटल्यास आपण पळून जाऊन लग्न करूया, कारण मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत, प्लीज मला सोडून जाऊ नकोस” अस म्हणून अगदी लहान मुला सारख रडत होता. मलाही रडू येत होतं. पण जर मी रडले तर अर्जुनला कोण सांभाळेल म्हणून मी एकदम खंबिर राहिले. मी अर्जुनला ओळखते तो माझ नक्की ऐकेल बस त्याला थोडा वेळ लागेल आणि मी त्याला तेवढा वेळ दिला.
तोपर्यंत सलीम म्हणजेच तो त्यादिवशी आलेला मुलगा, त्याच्या घरच्यांनी मला पसंती दिली. घरी आनंदाचे वातावरण होते. अम्मी अब्बूनां वाटलं की मी विसरले सगळं पण मला न त्यांच्या समोर रडता येत होतं न अर्जुन समोर, पण एकट्यामध्ये मी रडून स्वतःला हलकी करत होते. अर्जुन पण भेटल्यावर, “मला सोडून जाऊ नकोस आणि तू फक्त माझी आहेस” इतकच म्हणायचा. पण मी त्याला नेहमी समजावून सांगायचे “जे पाहिजे ते प्रत्येकवेळी मिळत नसत अर्जुन.
आणि प्रेम करणं म्हणजे प्रेम मिळवणंच अस नसत, तर परिस्तितीमुळे त्याग करणं पण प्रेम असतं” पण तो फारच एकटा पडत होता. मला सलीमचे पण कॉल येत होते, कधी कधी तो भेटत पण होता. सलीमला अर्जुन बद्दल कळू द्यायचं नव्हतं आणि अर्जुन ला पण एकटे सोडून द्यायचे नव्हते. मी अगदी अडकून गेले होते. कधी अस वाटत होतं की आत्महत्या करू, पण अम्मी-अब्बू, अर्जुनचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.
असेच दिवस निघून जात होते आणि आता अर्जुन पण त्यातून बाहेर येत होता ह्याचेच समाधान मला होते. अर्जुनच्या घरच्यांनी पण त्याच्यासाठी एक मुलगी पहिली होती. तिचे नाव ज्योती होते. ती दिसायला खूप सुदंर होती. एकदम दोघांचा जोडा शोभेल असा होता. अर्जुनला तिच्याशी लग्न करायचं नव्हत आणि मला पण सलीम सोबत लग्न करायचं नव्हत. पण माझ्या खातर त्याने घरी होकार दिला आणि मी माझ्या घरच्यांना.
योगायोगाने आमचे लग्न एकाच दिवशी ठरले. दोघांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. दिवस जसे जसे जवळ येत होते तसे खूप वाईट वाटत होते.काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते.
शेवटी लग्नाचा आदला दिवस उजाडला. आम्ही लग्नाआधी शेवटचं भेटायचं ठरवलं कारण उद्या पासून दोघंही एकमेकांचे न राहता कोणा दुसऱ्याचे होऊन जाऊ. भेटल्यावर एकमेकांच्या गळ्यात पडून आम्ही खूप रडलो.
मी म्हणाले ” कधी माझी गरज पडली तर नक्की सांग सगळं सोडून येईन मी” तो म्हणाला की सलीम मध्ये मला पाहू नकोस. त्याच्या मध्ये त्यालाच पहा. तो खूप चांगला मुलगा आहे. तुझी खूप काळजी घेईल” आणि मग आम्ही सगळा राग, त्रास, दुःख बाहेर काढला. सुखी राहण्याची शप्पथ घेऊन आम्ही घरी गेलो.
दुसऱ्या दिवशी आमचे लग्नं झाले. आमच्या दोघांचे प्रेम तर आम्हाला मिळाले नाही पण आम्ही त्यामुळे नवीन संसार खराब होऊ नये म्हणून आनंदी राहायचा प्रयत्न करत होतो. आजकाल अर्जुन क्वचितच कधी बोलतो करण की त्याला पाहून मला परत पहिले दिवस आठवतील आणि त्याचा मला त्रास होईल म्हणून कदाचित बोलत नसेल अस मला वाटतं.
पण अजूनही अर्जुन ची खूप आठवण येते. त्याला पण माझी आठवण येत असेल मे मात्र नक्की. पण तो आता ज्योती बरोबर आनंदी संसार करो हीच माझी अपेक्षा. ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी आम्ही नक्की एकमेकांचेच असू, आता ह्याच आशेवर राहिलेले आयुष्य मी जगत आहे.
धन्यवाद…
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा..
TC….
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


लेख आवडला
Pn as krna kitpat yogya ahe…..Samjala Ghabrun apan ase kiti divas jagnr
प्रेम म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे का ?
प्रेम एकाशी आणि लग्न दुसर्या शी .
अशा पळपुटेपणा मुळेच लोकांना खर प्रेमाची किंमत अर्थहीन करून टाकली.
सगळ सुरळी करण्याची ताकद प्रेमात असते.
पण अशा नेभळट प्रेमविरांमुळे लोकांनी प्रेमाची व्याख्या च बदलून टाकत आहे
अतिशय सुंदर ! आजही सामाजिक दडपण आहेच …..
Ya lekha mde Arjun ani Zoya yanch evda atut prem astana tyani Give up ks kel he samjat nai… Lekhakane ti goshta kshi ghadli yacha ulgada krava