Skip to content

आपले ‘पूर्वग्रह’ आपलं कसं नुकसान करत असतात बघा!!

पूर्वग्रह


अजिंक्य जयवंत

(मानसशास्त्र अभ्यासक)


जगात कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहे. डॉक्टर व पोलिस प्रामुख्याने आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. तर तर काही ठिकाणी याच देवदूतांवर हल्ला केला जातो आहे. या विरोधाभासाला काय म्हणावं? कोणता माणूस कधी कसा वागेल याचा अचूक अंदाज लावणे, मानसशास्त्रज्ञांसाठी पण आव्हानच ठरले आहे. मात्र, दैनंदिन आयुष्यात प्रत्येक जण सभोवताली असणाऱ्या माणसांचा, त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा, कृतीचा अर्थ लावण्याचा व त्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आपण इतरांबरोबर कसे वागतो हे बहुतांश प्रमाणात याच गोष्टीवर अवलंबून असते. परंतु आपल्या मतांमुळे व काही पूर्वाग्रहांमुळे गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फ्रीज हिदर (Fritz Heider) या मानसशास्त्रज्ञाने आपल्या एट्रिब्यूशन (attribution) थिअरीमध्ये असे म्हंटले आहे की गोष्टींची कारणीमांसा करताना, आपल्या गरजा व मानसिक पूर्वाग्रहांमुळे खूपदा त्यांचा चुकीचा अर्थ लावला जातो. इथे, पूर्वाग्रह (bias) कसे तयार होतात हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. एके दिवशी तीन आंधळ्या व्यक्तींना एका हत्तीचा आवाज येतो. ते तिघेही हत्तीकडे जातात. पहिला व्यक्ती हत्तीच्या कानाला हात लावतो आणि म्हणतो की हत्ती खूप नाजूक आहे. दुसरा पायाकडे उभा राहतो आणि ठासून सांगतो हत्ती खूपच बलवान आहे. तिसरा व्यक्ती हत्तीच्या सोडेंला हात लावून म्हणतो की हत्ती खूपच लांब आणि सडपातळ आहे. थोडक्यात प्रत्यक्षात जे आहे ते न पाहता गोष्टींचा आपल्या अनुभवाप्रमाणे काही वेगळाच अर्थ लावला जातो. अशाच काही चुका आपण रोज करतो आणि याची आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही.

रस्त्यावर अपघात बघितल्यानंतर तो चालकाच्या चुकीमुळे झाला असावा असा प्रथमदर्शनी निष्कर्ष सहसा काढला जातो. अपघाताला इतरही कारणं जबाबदार असूच शकतात की! तुमचा एखादा मित्र लठ्ठ झाला असेल तर तो आळशी आहे किंवा तो खूप फास्टफूड खातो असे गृहीत धरता. तो आजारीसुद्धा असू शकतो ना? पण जर का तुमचे वजन वाढले असेल तर तुम्ही व्यायाम करण्यास वेळ मिळत नसल्याचे सांगता. तुमच्या सहकाऱ्याला जर बढती मिळाली तर ती साहेबांची चोचलेगिरी केल्यामुळे. आणि तुम्हाला बढती मिळाली तर तुमच्या हुशारीमुळे व अथक प्रयत्नांमुळे! एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स मिळाले तर त्याच्या कष्टामुळे मिळाले असे तो म्हणतो आणि जर का कमी मार्क्स मिळाले तर पेपर अवघड होता अशी सबब देतो. स्वतःची किंमत कमी होऊ न देण्याचा पूर्वाग्रह (Self-serving Bias) इथे काम करत असतो.

परंतु खूपदा पूर्वाग्रह काही वाईट आणि अनैतिक गोष्टींसाठी पण कारणीभूत ठरू शकतात. सगळ्या धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना असेच वाटते की, त्यांना फुप्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता इतरांपेक्षा खूप कमी आहे. याला खोटा आशावाद (Optimism Bias) असे म्हणतात. आपल्याला कोरोना होणार नाही अशा अविर्भावात वावरणारे करंटे बघतच असाल तुम्ही! तसेच खुपदा एक वाक्य तुम्ही ऐकले असेल, “चांगल्या लोकांबरोबर नेहमी चांगल्या गोष्टी होतात आणि वाईट लोकांबरोबर वाईट (Just-world hypothesis) “. अशा पूर्वाग्रहामुळे बलात्कार, घरगुती हिंसा, ॲसिड हल्ला झालेल्या पीडितांना त्यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेसाठी जबाबदार धरले जाते. म्हणजे लोक इतरांबरोबर जर वाईट झाले असेल तर परिस्थितीला दोष न देता त्यांच्या व्यक्तीमत्वातील घटकांना दोष देतात आणि पीडित व्यक्तींनीच योग्य खबरदारी घ्यायला हवी होती अशी आशा करतात. यालाच भूतदृष्टी पूर्वाग्रह (Hindsight Bias) असे म्हणतात.

यावर एकच उपाय आहे तो आपण समजून घेऊया. उदाहरणार्थ, तुम्ही पिवळ्या रंगाचा चष्मा डोळ्यांवर चढवला आहे आणि तुमच्या मित्राने हिरव्या रंगाचा. थोड्या दिवसांनंतर आपण चष्मा लावला आहे हे तुम्ही पार विसरून गेलात. ह्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला आजूबाजूचे जग कायम पिवळे दिसेल आणि ते तसेच आहे असे वाटू लागेल. तर, तुमच्या मित्राला जग म्हणजे हिरवळच वाटेल. जर तुम्ही पूर्वाग्रहाचा चष्मा योग्य वेळी ओळखलात आणि दूर केलात, तर दोघांना जग सारखेच दिसेल नाहीतर मित्राचा शत्रू होण्यास वेळ लागणार नाही.


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

आपलं मानसशास्त्र



आवाहन – सभोवतालची अस्वस्थता वाढत आहे. ही चाहूल लक्षात घेता. आम्ही सर्व मानसशास्त्र विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की आपण जास्तीत जास्त लेख लिहावे. आपल्या लेखाची योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील. तसेच सोबत काम करण्याची संधी देण्यात येईल. संपर्क – ९१७५४२९००६.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

4 thoughts on “आपले ‘पूर्वग्रह’ आपलं कसं नुकसान करत असतात बघा!!”

  1. खुप छान विवेचन ! विचार करायला लावणारा लेख ! डोळस आत्मचिंतन करायला लावणारा लेख आहे !

  2. छान. सुंदर विश्लेषण. अजिंक्य, तुझे, मानसशास्त्रीय विचार वेगळ्या रीतीने विचार करण्यास भाग पाडतात.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!