
वयात येणाऱ्या मुलीच्या आईची जबाबदारी
मुलगी वयात येत असल्यामुळे तिच्यात होणारे मानसिक बदल प्रामुख्याने तिच्या आईने समजून घेतले पाहिजेत आणि तिच्याशी समजून वागले पाहिजे. तिच्या स्वभावात बदल झाल्यामुळे तिच्यावर कोणत्याही परिस्थितीत रागवता कामा नये. तिच्या वागणुकीतील बदल आईने स्वीकारायला हवेत. आता आपली मुलगी विकसित होत आहे. हे लक्षात घेऊन आईने मुलीला आता आदराची बरोबरीची वागणूक द्यायला हवी.
प्रत्येक मुलीला, पाळी म्हणजे काय, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पाळी येणे ही अनिष्ट गोष्ट नसून ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि पाळी येणे ही एक आनंदाचीच घटना आहे. हे तिला समजावून दिले पाहिजे. काही आया आपल्या मुलीला पाळी आली ही गोष्ट इतर कुटुंबियांपासून लपवून ठेवू पाहतात. साहजिक मुलीलाही ही एक शरमेचीच गोष्ट वाटू लागते. पाळी येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. उलट पाळी न येणे हीच अनैसर्गिक गोष्ट आहे. ३ ते ५ दिवस रक्तस्राव होणे ही एक नैसर्गिक बाब असते. आणि त्यापेक्षा जास्त दिवस रक्तस्राव होऊ लागला तर मात्र ते अयोग्य असते. हे मुलींना सांगितले पाहिजे. पाळीच्या दिवसात शरीराची स्वच्छता कशी ठेवावी हेही आईने मुलीला शिकवायला हवे. काही मुलींच्या पोटात पाळी चालू असतांना खूपच दुखते, काहींना फार दुखत नाही. हे दु:ख तसं इतके तीव्र नसते. लाडावलेल्या मुली मात्र त्याचा बाऊ करतात.
पहिली एक-दोन वर्षे पाळी नियमितपणे दर महिन्याला येईलच असे नसते. दोन किंवा तीन महिन्यांनीसुद्धा पाळी येऊ शकते. यात अनैसर्गिक असे काहीच नसते. पण ही वस्तुस्थिती आईने मुलीला सांगायला हवी. कारण पाळी दार महिना आली नाही तर मुली घाबरून जाते. तिच्या मनात भलते विचार येऊ लागतात. पाळी येऊन गेल्यावरसुद्धा गर्भधारणा होऊ शकते. खरे म्हणजे पाळी कधीच आली नसतानासुद्धा गर्भधारणा होवू शकते. अर्थात अशी उदाहरणे फारच कमी असतात.
मुलींच्या मध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल जाणून घेऊन तिच्या येऊ घातलेल्या पहिल्या पाळीच्या संदर्भात तिचे मन तयार करणे, पाळी म्हणजे काय याची माहिती करून देणे हे प्रत्येक मुलीच्या आईचे कर्तव्य आहे. पूर्वीच्या पिढीतील मुलीच्या वेळची सभोवतालची परिस्थिती वेगळी होती. एकच कुटुंब पद्धती होती. घरात खूप माणसे असायची. बायकांची एकमेकीत पाळी, लग्न, गर्भधारणा, बाळंतपण या विषयांवरच्या गोष्टींची चर्चा चालू असायची, वयात येणाऱ्या मुली आपल्या बहिणीकडून ते सगळे शिकत असत.
पण आता कुटुंबव्यवस्थाच बदलत गेली आहे. बहुसंख्य कुटुंब आता लहान असतात. एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येत चालली आहे. आता मुलांना आपले आई वडील एवढेच आपले कुटुंब हे माहित असते. आपल्या चुलत, मानस भावंडाबद्दल, काका, मामा, आत्या यांच्याबद्दल फारशी माहिती नसते. अशा परिस्थितीत कुटुंबातील सगळ्या मुलींची जबाबदारी प्रामुख्याने आईवरच येवून पडते. साहजिकच शरीरातील बदल आणि पाळीबद्दलची भीती मुलींच्या मनातून काढून टाकण्यासाठी आईनेच संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारणे आणि योग्य रीतीने पार पाडणे आवश्यक असते. मुलींच्या त्या संक्रमणावस्थेच्या काळात आईने तिच्याशी हळुवारपणे, मैत्रीच्या नात्याने वागून, विश्वासात घेऊन मुलीचे मनोधैर्य वाढविण्यासाठी झटले पाहिजे. आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि सर्वार्थाने परिपूर्ण अशी उदयाची स्त्री, म्हणून मुलीचे व्यक्तिमत्व विकसित करायला पुढे सरसावले पाहिजे.
मुलीमधील बदलमुलगी वयात आल्यावर कोणकोणते मानसिक बदल दिसून येतात ?
मुलगी वयात आल्यानंतर प्रसन्न दिसू लागते. तिचा अल्लडपणा कमी होतो. मुलांबद्दल आकर्षण वाटू लागते. ती लाजाळू बनते. तिला आपण मोठे झाल्यासारखे वाटू लागते. शरीरात होणाऱ्या बदलांचे आकलन ण झाल्याने तिच्यात संभ्रम निर्माण होतात. कदाचित परिचित मुले, नातेवाईक यांच्याशी संभोग केल्याची स्वप्ने पडून ती घाबरते. तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते.
मुलगी वयात आल्यावर मुलींमध्ये कोणकोणते शारीरिक बदल दिसून येतात?
मुली ११ – १२ वर्षाच्या झाल्या की, शरीरातील विशिष्ट भागात चरबी वाढू लागते. विशेष करून कंबरेभोवती व छातीवरती ही वाढ आपल्या नजरेस येण्याइतकी असते. कंबरेच्या हाडांच्या रचनेतही बदल होऊ लागतो. त्यामुळे कंबर गोलाकार दिसू लागते. स्तन वाढू लागतात. काखेत व जांघेत केस येतात व त्यानंतर मासिक पाळी सुरु होते. प्रत्येक मुलीची मासिक पाळी सुरु होण्याचे वय वेगवेगळे असले तरी साधारणतः अकरा ते पंधरा वर्षापर्यंत मुलींची मासिक पाळी सुरु होते. मुलीला मिळणाऱ्या पोषणावर मासिकपाळी सुरु होण्याचे वय काही प्रमाणात अवलंबून असते. काही अशक्त मुलींची पाळी उशिरा सुरु होते. आपल्याकडे मुलींची मासिक पाळी सुरु होण्याचे वय साडेबारा ते साडेसतरा वर्षे इतके आहे. त्यामुळे पंधरा-सोळा वर्षापर्यंत मुलींची मासिक पाळी सुरु झाली नाही तर घाबरून जाऊ नये त्यानंतर मात्र डॉक्टरी सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
वयात येणाऱ्या मुलींची कोणती काळजी घेतली पाहिजे ?
वयात येत असताना व वयात आल्यानंतर मुलींना समतोल आहार मिळणे आवश्यक आहे. याकरिता लोहयुक्त खाणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर मुलींच्या शंका-कुशंकांचे निरसन करून, त्यांना योग्य ती माहिती देवून पालकांनी त्यांच्यात आधी सांगितल्याप्रमाणे होणारे बदल समजून घेऊन त्यांचे व्यक्तिमत्व मोकळ्या वातावरणात खुलू दिले पाहिजे. मुलींचे शारीरिक व्यायाम, खेळ व छंद बंद न करता अशा गोष्टींना प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे. शरीराची व मनाची सर्वांगीण वाढ ही सकस आहार, भरपूर व्यायाम व हसरे खेळते, मनमोकळे वातावरण यामध्येच होत असते.
वयात येताना मुलींच्या स्वभावात, वागण्यातही बदल होत असतात, ते कोणते ?
ज्याप्रमाणे मुलींच्या शरीररचनेत बदल होतो त्याप्रमाणे त्यांच्या स्वभावातही बदल होऊ लागतात. मुलांबद्दल अनामिक आकर्षण वाटणे, वेशभूषेवर व सुंदर दिसण्याकडे जास्त लक्ष केंद्रित होणे. पालकांपासून एक प्रकारचे तुटलेपण येणे तर मैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टी वाटणे असेही बदल मुलींमध्ये होत असलेले आपल्याला दिसतात. आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांची जाणीव झाल्यामुळे मुलींच्या वागण्यात एक प्रकारचा संकोच, लाजरेपणाही निर्माण होतो. ज्या घरातील वातावरण मनमोकळे असते, आई-वडिलांची मुला-मुलींबरोबरचे वागणे अति धाकाचे नसते, त्या घरातील मुलींमध्ये असे बदल प्रकर्षाने जाणवत नाहीत.
परंतु स्वतःच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संभ्रमाचे निरसन होण्यासाठी पोषक असे वातावारण घरात नसले तर मात्र मुलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूनगंड निर्माण होऊ शकतात. याच वयात मुलामुलींना पालकांच्या जवळीकतेची मार्गदर्शनाची जास्त गरज असते. आपुलकीचा साधा स्पर्शही एक भावनिक गरज असते. नेमक्या याच काळात पालक, विशेषतः वडील आपल्या मुलीपासून दूर दूर राहू लागतात. मोठी झाली या शब्दाचा भडिमार वाढत्या वयातील मुलींवर वारंवार होऊ लागतो. अचानकपणे बदललेल्या या वातावरणाचा अर्थ मात्र वाढत्यावयातील मुलीला लागत नसतो.
त्यामुळे मनावरचा ताण वाढत जातो. लैंगिकतेबद्दल नव्याने निर्माण होणारे कुतूहल समाजाला मान्य नसल्या कारणाने अनेकदा आई-वडिलांपासून लपून छपून लैंगिक प्रयोग केलेले आपल्याला आढळतात.याचे घातक परिणाम बहुतांशी मुलींनाच भोगावे लागतात. अनेकदा या वयात मुला-मुलींकडून न झेपणारी पावले केवळ उत्सुकतेपोटी अथवा एकटेपणाच्या भावनेतून उचलली जातात. आजुबाजूला वावरणारे विश्वासार्ह वाटणारे पुरुष विकृत मनोवृत्तीतून अजाण मुलींचा वापर कामपूर्तीसाठी करतात. उदा. शेजारी, घरगडी, नातेवाईक, शिक्षक इत्यादी. याबद्दल पालकांनी तर जागरूक रहावेच पण मुलींनाही याबद्दल चर्चेतून माहिती दयावी.
या नाजूक वयात आई-वडिलांशी मैत्रीपूर्ण संवादाची किती आवश्यकता आहे हे आता आपल्या लक्षात आलेच असेल.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !

????????
Khup Chan information dili tumhi .yacha nkkich upyog hoil.mc vishai aslele smj pn dur votil
ज्या गोष्टींची मुलांना सुद्धा माहिती नव्हती अशा मुलांना देखील हा लेख वाचून माहिती नक्कीच मिळाली असेल,
आणि हो त्यातलाच मी ही एक आहे
तुमचा हा लेख मुलींच्या त्यांच्या दैनंदिन जीवनात कसा बदल घडून येतो याची संपूर्ण माहिती देणारा आहे.
ज्यांना असल्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नाही अशांना ही माहिती पुरेशी आहे.
मला हा लेख खूपच चांगला वाटला.
तुम्ही अशाप्रकारच्या माहित्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा चांगलंच काम करत आहात त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो.
लेख तसा उत्तम आहे. फक्त दुसऱ्या परिच्छेदातील शेवटेचे वाक्य वगळावे ही विनंती. “हे दुःख मात्र एवढे तीव्र नसते. लाडवलेल्या मुली त्याचा बाऊ करतात”.
आधीच आपल्या समाजात मासिक पाळी बद्दल अनेक गैरसमज आहेत. हळू हळू त्या बद्दल जागृती निर्माण होत आहे. वैद्यकिय दृष्ट्या महिलेला या काळात विश्रांती भेटणे आवश्यक असते. जिथे आधीच महिलांबाबत सहानुभूती कमी आहे, अश्या वेळेस अशे वाक्य घातक ठरू शकते.
काही मुलींना खरच खूप त्रास होतो. या वाक्यामुळे त्यांच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. आणि जी काळजी घेतल्या गेली पाहिजे त्या कडे दुर्लक्ष होते.
आता कुठे तर महिलांना काही कामाच्या ठिकाणी या कारणासाठी सुट्टी भेटत आहे. त्यातही खूप वाद आहेत. अश्या वेळेस अशी वाक्ये आगीत तेल ओतण्याचे काम करू शकतात.
प्रत्येक महिलेचे शरीर वेगळे असते. तिच्या आजू बाजूची परिस्थिती, तिला भेटणारा आहार, तिच्या वरचा कामाचा ताण हे सगळा वेगळं असतं. अश्या वेळेस मुली बाऊ करतात असं म्हंटल्यावर किती मुलींचे हाल होतील देव जाणे.
आधीच आपल्या समाजात असा म्हणानाऱ्यांची कमी नाही की “जगात फक्त एक तूच मुलगी तर नाही जिला त्रास होतो, बाकी पण मुली सहन करताच ना.”
आपण ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की किती तरी मुलींचे जीव या वेळेस गेले आहेत फक्त घरच्या लोकांच्या अज्ञानापाई.
त्यामुळे माझी विनंती आहे की हे वाक्य वगळावे, नाही तर एखाद्या मुलीच्या जीवा सोबत खेळ होऊ शकतो.
धन्यवाद!
ऍड. उर्वी केचे
Lekh tar Khup chhan astat ,Mazi mulgi 18 years Chi aahe. Pan Tula real friends pekasha virtual friends jast aahet, me Khup samjavun sangte pan eaktach nahi, satat mobile madhe. Me Tila Khup dusrya goshticha karnyasathi pramote Karte pan ekada divas championship effect rahato. Maza dusara mulaga 10 years cha aahe Tula vatate ki Aamhi tyachyavr jast Prem karto, Tyamule Tila tyachyabarobar pan pathvun ghyayche naste. Tila psychology madhech BA karyacha aahe pudhche planning Khup chhan aahet pan, eakun ghet nahi konachech Bolayala gela ki bhnadhlyasarkhi ch bolate. Please mala margdarshan Kara