Skip to content

आजच्या निराशाजनक वातावरणात स्वतःला निराश होऊ देऊ नका!

जे आवडते ते करावे …


सौ.शितल हर्षल संखे

बोईसर , पालघर


घुसमट होत असतानाच , दु:ख पुढ्यात असताना ही नवनिर्मिती आणि आनंद पसरवण्याची स्वत: मध्ये क्षमता निर्माण केली . तर , आजच्या निराशाजनक वातावरणात तग धरून ठेवता येईल .

आपल्यासमोर आलेल्या अगदी गंभीर परिस्थितीचा विचार आपण करून त्याला सांधून संधी म्हणून उपयोग करून घ्यायला आपण आजच्या लाॅकडाऊन काळात राहण्याचा प्रयत्न करायला हवा .

आपल्या बऱ्याच आवडी-निवडी असतात . त्यांना ही सर्व घरातील कामे आवरून वेळ देता येवू शकतो . मन रमवा नाहीतर मनस्थैर्य संपेल .ते संपले तर आपल्याला ते परवडण्यासारखे नाही . कारण ,आजच्या परिस्थितीत घरातूनच बाहेर डोकावून पाहताना मृत्यूचे वाढणारे आकडे …मदतीसाठी प्रयत्नशील डाॅक्टर्स , सिस्टर्स आणि आपत्कालीन मदत करताना प्राण पणाला लावणारे सर्वच त्यांना ही ज्यावेळी संसर्ग झाला आणि त्यांचे होणारे मृत्यू अगदी ह्रदय पिळवटून टाकत आहेत . काही ठिकाणी अन्नानदशा झालिये . आपण फक्त कॅमेरासमोर आलेले पाहतोय . पण, कोसो दूर राहणारे काही तळागाळात राहणारे फक्त डाळ ,तांदूळ विकत घेण्यासाठी काडग्यासारख्या देहकायेने चार -पाच मैल चालून येतात आणि चालून जातात . त्यावेळी किती हतबल झाल्यासारखे वाटते . अगदी संवेदनशील नसलेल्यांनादेखील पाझर पुढेल असे दृश्य अनुभवताना .तरीही , आपण परिस्थिती हाताळताना संयम ठेवायलाच हवाय ना .

काळ आपल्याला काही सुचवतोय . आपण ते संकेत समजून घ्यायला ही ह्या वेळेचा सदुपयोग करायला हवा . तसेच, प्रत्येक नकारात्मक भूमिकेत एक , सकारात्मकता प्रकर्षाने दडलेली असते . तिचा शोध जर घेतला . तर ,आपण या सर्व कठीण काळाचे , ऐतिहासिक साक्षीदार म्हणून विजय मिळवलेला असेल . तोवर घरातूनच जे आवडते ते करावे …आनंदी राहण्याचा प्रयत्न करावे . कारण , आपल्याला खंबीर व्हायचे आहे . कोसळून पडलो तर हानी आणि केवळ हानीच होणार आहे .

आनंद वाटू आणि आनंदी राहूया संयम राखूया आणि मनस्थैर्य टिकवूया .


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

आपलं मानसशास्त्र



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “आजच्या निराशाजनक वातावरणात स्वतःला निराश होऊ देऊ नका!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!