आभाळच फाटलं तर….
पुणे.
( हा लेख काल्पनिक पण मार्मिक वास्तव .)
माणूस जन्मला येतो तोच नात्यांच पुंजक घेवून.
आणि ते नात्यांच पुंजक अभिमानाने आयुष्यभर मिरवत आसतो .
पण
निसर्ग हा मोठा किमयागार आहे. काही नाती हि मिरवायला नाही तर जपायला देतो.
ज्याला जपण कळल त्याला जगण कळलं.
त्यातलच नवरा बायकोच नातं.
नुसतं नावानेच अंगावर शहारे आणि रोमांच !
रेशिमगाठी म्हणे
स्वर्गात बांधल्या जातात
आम्ही फक्त निमित्तमात्र !
म्हणजे सगळा भार देवावर आणि नशिबावर.
आपण नात जपायच्या जबाबदारीतून मुक्त .
पण
हिच मुक्तता आज आयुष्याला ठेचा देत , जगणं रक्त बंबाळ करत असते.
कुटुंबरुपी संसाराची नौका पैल तिरावर नेयायची आणि समाधानाने डोळे बंद करायचे ! किती छान वाटतं ऐकायला
पण
संसार म्हणजे काही तीन तासांचा चित्रपट नव्हे कि जेथे आधीच सर्व कथानक ठरला आहे.
कधी कोणतं वादळ कोणत्या रुपात येईल,
आणि नवरा बायकोच्या नात्यालाच आव्हान देईल , सांगता येत नाही .
अशावेळी नात्याची वीण घट्ट असावी.
काही प्रसंग धगधगत्या आगी सारखे सत्व पाहण्यासाठीच येतात की काय जणू.
असे प्रसंग म्हणजे जळते निखारेच.
आयुष्य होरपळून काढतात . छातडावर आसुड ओढले जातात. जगणं असहय आणि नकोसं होतं.
संवेदना बधिर होतात . डोळ्यासमोर काळाकुट्ट अंधार.
मग
सुरेश भट यांच्या काव्यपंक्ती मनात घिरट्या घालतात,
” इतकेच मला जातांना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ”
खरच!
काही घटना ह्या ह्रदयात कायमस्वरूपी कोरल्या जातात.
पत्नी!
संसाराचा गाडा हाकत हाकता कधी कधी जबाबदारीच्या ओझ्याने त्रासुन जाते,
चिडचिड होते.
लक्ष वेधण्यासाठी आदळआपट ही केली जाते.
मनात नुसती घालमेल आणि खदखद.
अशा वेळी,
दिव्या खाली ही अंधार असतो. ते पाहण्याची दृष्टी असावी लागते.
पण लक्षात कोण घेतं ?
खर तर हि नवर्यांसाठी वादळापुर्वी धोक्याची घंटाच !
काय हव असतं हो तीला ?
देखना नवरा,
पैसा ,
दागिणे … तशी यादी खुप मोठी होईल.
खर तर यातलं कहीही नको असतं .
फक्त आणि फक्त निखळ प्रेम ,
समजून घेणारं मन ,
हक्काने मान टेकवता येईल असा विश्वासू खांदा आणि ढसा ढसा रडून कधीही मन मोकळ करता येईल असा सारथी.
मला जगाने नाकारलं तरी , तरी माझा सारथी माझ्या सोबत आहे , हा विश्वास.
आणि उभ्या आयुष्यात हा विश्वास नाही निर्माण करता आला तर त्याच्या सारख संसारातल अपयश कोणतं नाही.
खरं तर
जगात तरी संवादाने सुटू शकत नाही, अशी एकही समस्या नाही . पण तो संवाद एका ह्रदयातून दुसऱ्या ह्रदयापर्यंत पोहचणारा असावा.
कारण
मला कोणीतरी समजून घेतयं . माझ कोणतरी ऐकून घेतय हि भावनाच स्री ला जगण्यासाठी बारा हत्तीचं बळ देतं.
नुसत्या ठेल्यावरची पाणी पुरी खाऊ घाला.
आनंदाने अख्या जगाला ओरडून सांगेल .
पण जेव्हा हा नवरोबा अशा छोट्या छोट्या क्षणाचा आनंद हिरावून घेतो.
तेव्हा नुसती धुसफूस होत असते !
कळतच नाही त्याला त्याच्या हातातून काय निसटून चाललय.
मुलं जन्माला घातली आणि घरखर्च भागवला म्हणजे झाली कर्तव्यपुर्ती, अस कधीच नसतं.
खरं तर
तेव्हाच तिच्या काळजात विस्तवाची ठिणगी पडायला सुरवात होते.
त्याच वणव्यात रुपांतर होण्यापूर्वीच डोळस व्हाव.
कारण शरीरावरचे कसले ही खोल घाव भरुन निघतात
पण
काळजात होणारी जख्म भरुन काढणारे औषध अजून तरी वैद्यकीय शास्रात नाही.
स्रीला ही मन आहे, भावना आहेत आणि शरीर ही आहे ते ओरबडण्यासाठी नव्हे बरं !
हे जपाव .
नाहीतर
कालांतराने एक वेळ अशी येते की
शरीर फक्त नवर्यापाशी आणि मग मन कुठतरी घिरट्या घालत असत आभाळात , आणि अशावेळी आभाळच फाटलं तर ?
तर
गल्लोगल्ली टपुन बसली आहेत बोलघेवडे श्वापदे ,
गिधाड्या सारखी लचके तोडण्यासाठी.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
खूप छान , नक्कीच प्रेरणा मिळेल.
Dil Pani Pani Ho Gaya
Khupach Chhan Aahe APRATIM
माझं मत असे आहे की, जसं पुरुषांनी समजून घेण्यासाठी प्रयत्न करावा तसेच स्त्रियांन सुद्धा समजून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
लेख छान आहे. पण बऱ्याच वेळा काही मुली व्यक्तीस्वतंत्र च्या नावाखाली नवऱ्याशी सुद्धा व्यवस्थित वागत बोलत नाहीत, त्याच्यासाठी पण एखादा डोळे उघडणारा चांगला लेख लिहिला तर बरं होईल