
कोरोना आणि बालमित्र
प्रा.रेखा ढेरे
मानसशास्त्र विभाग,
बलभीम महाविद्यालय, बीड.
व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे आज होऊ घातलेल्या परिस्थितीवर विचारांचा ऊहापोह तरुण व सर्व स्तरातील लेखक वर्गाकडून होताना दिसतो आहे. संकटाचे सावट जसजसे वाढत आहे तसतसे विनोदी पोस्ट, फोटो व व्हिडीओ कमी होताना दिसत आहेत.जे व्यक्ती लाँकडाऊनचे नियम पाळत नाही त्यांना योग्य तो प्रसाद व कारवाई प्रशासन करत आहे.
मात्र या सर्व परिस्थितीत नोंद घेण्यासारखा प्रतिसाद हा बालकांकडून मिळतांना दिसत आहे. अचानक झालेला हा बदल या चिमुकल्यांनी मोठ्या मनाने स्विकारलेला दिसतो आहे.आजच्या परिस्थितीचे भय त्यांच्यात जाणवत आहे. जेवढ्या चांगल्या गोष्टींचा मुलांवर परिणाम होतो त्याच प्रमाणात वारंवार कोरोनाच्या बातम्या, चर्चा ऐकून मुलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिकच आहे. अशा वातावरणात आपल्या मुलांना हसतखेळत ठेवून सकारात्मक उर्जा घरात निर्माण करण्याची जबाबदारी आता सर्व पालकांची आहे.खरं तर समस्त स्त्रीवर्गाच्या वतीने मी हे नमूद करू ईच्छीते की,मुलं चोविस तास घरात असल्यानंतर होणारा त्रास हा महिलांनाच जास्त सहन करावा लागतो.
मात्र आता वेळ आली आहे पुरुषमंडळीनेही याला हातभार लावण्याची.मुलांबरोबर बालविश्वात रमूयात. त्यांना बोर होणार नाही असे खेळ त्यांच्या मुडनुसार खेळूयात.आपल्यामध्ये विविध कलांचे भांडार असते त्याला उजाळा देऊयात. रोजच्या दगदगीच्या जीवनामुळे मुलांना वेळ देता येत नाही हा प्रश्न आता सोडवुयात.
आपल्या सभोवताली असणारा चोविस तासाचा किलबिलाट आनंदाने स्विकारुयात.परीक्षा न होताच पुढील वर्गात प्रवेश मिळणार यापेक्षा अद्वितीय आनंद काय असणार या बालमनास. मात्र एवढे असुनही चोविस तास घरात राहून मुले कंटाळणार हे नक्कीच.
मुलांना सदैव नाविन्य हवे असते.आपण जेवढे सांगू,शिकवू तेवढे आत्मसात करण्याची क्षमता मुलांमध्ये असते,असे मानसशास्त्र सांगते.मग या वेळेत आपल्या मुलांना चांगल्या गप्पागोष्टीत गुंतवून ठेवा.त्यांची बौद्धिक क्षमता वाढणारे खेळ त्यांच्या समवेत खेळा.हसतखेळत त्यांचा अभ्यास घ्या.मुलांचे खाण्यापिण्याचे लाड व हट्ट पुरविण्यासाठी सध्या घरोघरी माझ्या माता भगिनी सज्ज आहेत.थोडे टोमणे ऐकण्याचा त्रास होत असेल पुरुषमंडळींना तर सहन करा.कारण ही वेळही सारखी राहणार नाही. पण आपल्या मुलांना शंभर टक्के वेळ द्या.
मला माहिती आहे परिस्थिती अनेक दृष्टीने बिकट आहे. पण माझ्या लेखनाचा उद्देश सुज्ञ समजून घेतील.कारण मुलांच्या मनातील घालमेल व त्यांचे बालमन समजून घेणे ही या काळात पालकांची फार मोठी जबाबदारी आहे.आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने काही दिवस अजिबात बाहेर न पडता घरातच राहुयात. आपल्या चिमुकल्यांसमवेत आपणही बालपण जगून घेवूयात.
मुलांसमोर या गोष्टी टाळा
1.मुलांसमोर सतत कोरोनाच्या बातम्या बघणे टाळा.
2.मुलांसमोर कोरोनाच्या चर्चा करु नका.
3.मुलांसमोर कुठल्याही नकारात्मक विषयावर चर्चा टाळा.
4.मुलांसमवेत खेळतांना व बोलतांना मोबाईलचा वापर कटाक्षाने टाळा.
5.मुलांना एकटेपणा वाटणार नाही याची काळजी घ्या.
6.मुलांमध्ये झालेले छोटे छोटे बदल काळजीपूर्वक जाणुन घ्या.
मुलांसाठी या गोष्टी करा
1.जुन्या गोष्टी व फोटोवर मुलांसमवेत चर्चा करा.
2.नकाशाच्या माध्यमातून आपल्या देशाची, राज्याची ओळख मुलांना करून द्या.
3.बौद्धिक क्षमता वाढवणारे बैठे
खेळ मुलांसमवेत खेळा.
4.घरातील छोट्या मोठ्या कामात मुलांना सामावून घ्या.
5.हसतखेळत मुलांचा अभ्यास घ्या.
या छोट्या मोठ्या गोष्टीतून त्यांच्या बालविश्वात आपण आनंद निर्माण करू शकतो.त्यासाठी प्रयत्न करुयात.घरात आनंदी वातावरण राहिल,यासाठी म्हणून जाणिवपूर्वक काळजी घेऊया.जुने चित्रपट,कोडी,गोष्टी आपल्या मुलांना सांगितल्यास त्यामधे मुलांचा आणि आपलाही वेळ जाईल.हेही दिवस निघून जातील,ही सकारात्मकता बाळगा.सर्व काही ठिक आणि सुरळीत होईल,हा आशावाद उराशी बाळगा,ही काळाची गरज आहे.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !

खुप छान
खुप खुप छान सर