
स्त्रियांनो आपला जन्म इतका स्वस्त नका करू ओ….
वाडा, पालघर
आज-काल आपण बऱ्याचदा ऐकतोय थोडसं भांडण झालं म्हणून सोडून निघून जाणे, लहान-सहान गोष्टी माहेरी सांगून विषय वाढवणे, सतत संशयी स्वभावाने वागणे, नवऱ्यावर किंवा सासरच्या माणसांवर अजिबात विश्वास न ठेवणे आणि वाद जास्त झालेच तर एकतर घटस्फोट घेणे नाहीतर आत्महत्या करणे.
आज अशा सुद्धा स्त्रिया आहेत ज्यांच्या जगण्यातून दुसऱ्यांना कायम प्रेरणा मिळते. मी स्वतः अशा स्त्रिया बघतेय खरंच तेव्हा खूप नवल वाटते कारण आपलं दुःख कोणालाच कळू न देता इतक्या निस्वार्थीपणे जगणं म्हणजे जगावेगळं वागणं आहेना. येणाऱ्या संकटांना रडत आणि घाबरत न राहता कस हसत हसत सर्व सांभाळून घ्यायचं हे या स्त्रियांकडून नक्कीच शिकायला मिळते.
जेव्हा आपल्या नवऱ्याच दुसऱ्या बाईसोबत नकोते संबंध आहेत हे माहीत असताना आणि त्याबरोबरच नवरा घरी कशातच लक्ष घालत नाहीये ..आपल्या बायकोला काय आवडते..तिला काय हवं आहे.. याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय असं असताना देखील ती मात्र कोणतीच अपेक्षा न करता फक्त आपल्या मुलांकडे बघून सर्व adjust करून मनात दुःख ठेवून चेहऱ्यावर फक्त हसू ठेवतेय.ते हसणं बघितलं तर प्रश्नच पडतो की कुठून आलय हे सामंजस्य .. नवऱ्याच प्रेम आणि काळजी मिळत नसताना देखील अस जगणं म्हणजे खरंच खूप कठीण आहे पण ती जगतेय ते फक्त मुलांसाठी. ..
मुलं अगदी लहान असताना त्यांचे वडील म्हणजेच तिचा नवऱ्याचे निधन झाले. जिवंत असताना पण दारूच व्यसन असल्यामुळे कसलीच सोय केलेली नव्हती. ना मुलांच्या शिक्षणाची ना लग्नाची..आणि शेती करणाऱ्या माणसाला कसली आलिये pension. पण अशा परिस्थितीत सुद्धा न खचता अगदी धैर्याने मुलामुलींच शिक्षण पूर्ण केलं. मुलींची लग्न केली आणि आज मुलगा नोकरी निमित्ताने बाहेरगावी राहतोय ..आजसुद्धा एकटीच आहे ती पण कोणतीच तक्रार न करता आजही कष्ट करतेय. मुलांच्या भविष्याचा विचार केला म्हणून आल ना हे बळ… म्हणून स्वतःच्या इच्छांना दुर्लक्षित होणारा त्रास सहन करून येणाऱ्या संकटांना तोंड देत आजही ती ठामपणे उभी आहे.
पदरी फक्त मुली जन्माला आल्या. नवऱ्याच्या कमाईमध्ये सर्व adjust झालं नसतं. म्हणून लहान लेकरांना घरी सोडून मिळेल तशी काम करून पोट भरली. स्वतःचं घर अजूनही नाही. भविष्यात काळजी घेईल, आई वडिलांना सांभाळेल म्हणून हक्काचा मुलगा नाही. मुली लक्ष देतातच पण त्यांच्यावर अवलंबून राहणे पटत नाही. म्हणून आजही काम करतेय.नवऱ्याच संशयी स्वभाव आणि कामिक वृत्ती असताना ते सगळं सहन करताना आजही चेहऱ्यावर हसू आहे. कोणी बघितलं तर वाटणार सुद्धा नाही की इतका त्रास सहन केला आहे आणि आजसुद्धा सहन करतच आहे. कुठून आली ही सहन शक्ती … संसार आणि मुलं यांचा विचार करूनच ना..
आज एवढ्या धावपळीच्या जगात घर सांभाळून नोकरी करणं सोपं नसतानाही सर्व नाते सांभाळून ती आजही कष्ट करते… आणि आनंदात राहते.
मी अस म्हणत नाही की नवरा सासरचे किंवा कोणीही कशेही वागले तर ते निमूटपणे ऐकून घ्या..कितीही अन्याय झाला तरी तो अन्याय सहन करा….पण
जिजामातेने छत्रपति शिवाजी महाराज यांना घडवल ते सहज का?? झाशीची राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट योद्धा मानली जाते.. इतकं सोपं नव्हतं ना किती प्रसंगांना तोंड दिलं असेल??
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला.. किती हाल अपेष्टा सहन केल्या असतील??? जर इतकी स्त्रीशक्ती आपल्याकडे आहे तर आपण का स्वतःचं आयुष्य इतकं स्वस्त करतोय???
आज साक्षरता वाढली आहे.शिक्षण असो वा कोणतेही क्षेत्र स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत.आजची स्त्री राष्ट्रपती होतेय तर एकीकडे उत्तम खेळाडू म्हणून सुद्धा स्वतःची ओळख निर्माण करतेय. आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात स्त्री कुठेच मागे राहिलेली नाही.
येणाऱ्या प्रत्येक संकटाना ,प्रश्नांना सामोरे जाण्याची शक्ती जर या स्त्री मध्ये आहे.. इतकं धैर्यता, शौर्यता,पराक्रमी वृत्ती, सामंजस्य, सहनशीलता या स्त्रीमध्ये असेल तर मग कोणताही अविचार करून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेणे..
आत्महत्या करणे योग्य आहे का???
आवाहन – सभोवतालची अस्वस्थता वाढत आहे. ही चाहूल लक्षात घेता. आम्ही सर्व मानसशास्त्र विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की आपण जास्तीत जास्त लेख लिहावे. आपल्या लेखाची योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील. तसेच सोबत काम करण्याची संधी देण्यात येईल. संपर्क – ९१७५४२९००६.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


योग्य विश्लेषण केले आहे, धन्यवाद
लेखिकेला म्हणायचे तरी काय आहे??
लेखकाला म्हणायचय तरी काय?