Skip to content

‘Creativity’ चा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्व!!

कल्पकता तुमच्यात दडलेली प्रचंड क्षमता….


अजिंक्य जयवंत

(मानसशास्त्र विद्यार्थी)


नमस्कार मित्रांनो.

जग इतके अस्थिर असताना, चित्त एकाग्र करून तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व प्रसार माध्यमांवर काही ज्वलंत विषयांवर, उदाहरणार्थ, जग कसे बदलणार आहे , अर्थव्यवस्थेची कशी वाईट अवस्था झाली आहे आणि कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत ह्याबद्दल चर्चा सुरू आहेत. विद्यार्थी, युवा मित्र, नोकरदार जर का तुम्ही ह्यामुळे चिंताग्रस्त असाल तर या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही एका गोष्टीचा जरूर अभ्यास करा. कारण भविष्यात तुम्हाला सगळ्यात जास्त गरज ह्याच गोष्टीची असणार आहे. आणि ती गोष्ट म्हणजे ‘कल्पकता’ (Creativity).

दुर्दैव असे आहे की, शाळा-महाविद्यालयांमध्ये सगळ्या मुलांना एकाच धाटणीचे शिक्षण दिले जाते आणि एकाच तराजूत तोलले जाते. शिक्षणाचा उद्देश हा प्रत्येक मुलाला त्याच्या मधल्या विशेष गुणांची जाणीव करून देणे हा आहे. परंतु आपल्याकडे डुप्लिकेट कॉपीज बनवण्यावर जास्त भर दिला जातो आणि कोण हुशार आहे हे ठरवण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा घेतली जाते. आश्चर्याची गोष्ट अशी की, जगात यशस्वी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने कल्पकतेला यशाची गुरुकिल्ली मानले आहे. भारताचे पूर्वराष्ट्रपती मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांनीसुद्धा मुलांना क्रिएटिव्ह बनवणाऱ्या शिक्षणावर बरेचदा भाष्य केले आहे.

थोडक्‍यात कल्पकता म्हणजे काय?

रोज आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. जर तुम्ही, हे प्रॉब्लेम्स, वेगळ्या अनोख्या पद्धतीने हाताळू शकलात तर तुम्ही क्रिएटिव्ह आहात असे समजा. क्रिएटिव्हिटी म्हणजे एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यावर अनोखा आणि सर्जनशील असा उपाय शोधणे. तुम्ही जर स्वतःच्या भूतकाळात डोकावून पाहिलेत, तर तुम्हाला आढळून येईल की आयुष्यात एकाच प्रकारच्या चुकांची तुम्ही कितीतरी वेळा पुनरावृत्ती केली आहे. चुकला म्हणजे माणूस पण वारंवार एकच चूक करणे म्हणजे अपयशाला आमंत्रण. मानसशास्त्रामध्ये अशा विचार करण्याच्या पद्धतीला ‘मेंटल सेट (Mental Set)’ असे म्हंटले जाते. माणसाच्या विचारशक्तीवर त्याच्या भूतकाळातले प्रसंग, कुटुंब, मित्र व शिक्षण यांचा मोठा प्रभाव असतो. जर, तुम्हाला आउट ऑफ दि बॉक्स विचार करायचा असेल तर त्यासाठी मानसिक कष्ट घेणे व जुन्या विचारांची सीमा ओलांडणे गरजेचे आहे. परंतु ते करणार कोण? म्हणून आपण नेहमी आपल्याला पटेल तेच बघतो, रुचेल तेच ऐकतो आणि जमेल तेच करतो. परंतु आधी न मिळालेले मिळवायचे असेल तर, काहीतरी वेगळे, नवीन करणे आवश्यकच असते.

जर तुम्हाला कल्पकता अंगीकारायची असेल तर स्वतःच्या क्षमता (Comfort Zone) ओलांडायला शिकायलाच हवे. जेव्हा आपण नवीन पद्धतीने विचार करतो तेव्हा भीती वाटणे सहाजिकच आहे. पण मज्जातंतूंवर (Neurons) आणखी जोर दिलात तर काही कठीण नाही. लक्षात ठेवा, विचित्र गोष्टींमध्ये पण चित्र शोधा. एखाद्या गोष्टीवर अनेक पद्धतींनी विचार करा. आयुष्यात घडलेले प्रसंग वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करा. शंका बाजूला सारून मनात भन्नाट आणि विचित्र कल्पना येऊ द्या. दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी सुद्धा नावीन्यपूर्ण पद्धतीने करा. असं जगण्यातसुद्धा वेगळीच मजा आहे आणि आपल्या देशालाही नोकऱ्या करणाऱ्यांची नव्हे तर देणार्‍यांची गरज आहे.


आवाहन – सभोवतालची अस्वस्थता वाढत आहे. ही चाहूल लक्षात घेता. आम्ही सर्व मानसशास्त्र विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की आपण जास्तीत जास्त लेख लिहावे. आपल्या लेखाची योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील. तसेच सोबत काम करण्याची संधी देण्यात येईल. संपर्क – ९१७५४२९००६.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “‘Creativity’ चा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्व!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!