Skip to content

बेचेनी, चिंता व भिती पळवून लावा.

बेचेनी, चिंता व भिती पळवून लावा.


अनिल गोडबोले

सोलापूर


लॉक डाऊन च्या काळात अनेक व्यक्ती काय बोलतात हे जर निरीक्षण केलं तर लक्षात येईल की वरवर सहज बोलली जाणारी वाक्य त्या व्यक्तीची चिंता दाखवतात. जसे की” सरकारने अस करायला पाहिजे.. तस पाहिजे”..”हे साले xxx सरकारच ऐकत नाहीत यांच्या मुळेच वाढला आकडा”.. “गप बसा घरात एकदा लॉक डाऊन संपू दे.. मग बोंबलत हिंडा कुठे जायच तिकडे”..

अशी वाक्य भीती कमी आणि चिंता जास्त असते(चिंता जास्त वाढली की तिचे रूपांतर भीती मध्ये होत असते.

नेमकी चिंता कशाची:-

1. नेहमी प्रमाणे जीवन नाही… नवीन नियमांशी जुळवणे अवघड जाते.
2. रिकामा वेळ, रिकामे डोके हे चिंतेचे घर बनते
3. नवीन बातम्या, घटना, माहिती या मुळे चिंता वाढते
4. सतत एकाच विषयाच्या विचार केल्याने चिंता वाढते
5. आपल्याला काही झालं तर’…. हा विचार जीवन आणि मृत्यू बद्दल चिंता वाढवतो.
6. आरोग्य, आरोग्याच्या समस्या असतील तर अति विचाराने चिंता वाढते
7. लॉक डाऊन संपल्यावर काय?.. जॉब, करिअर, पैसे, कामगार, बॉस, मालक, घर, बँक , हप्ते, शिक्षण … आणि आर्थिक घडी याबद्दल चिंता वाटते.
8. एकूण भविष्यात काय घडेल , स्वतःच्या आयुष्यातील दुःख , अपयश या बद्दल चिंता वाटते..
9. काही जण घरापासून लांब अडकले आहेत किंवा कुटुंबातील व जवळच्या व्यक्तींची काळजी वाटून चिंता होत असते.

चिंता माणसाला जिवंतपणी जाळते असे म्हणतात..

यावर उपाय काय?.

1. आहे ती परिस्थिती जशीच्या तशी स्वीकार करणे:-

माझ्याच नशिबात अस का घडतं?.. याचा विचार सतत करणे म्हणजे चिंतेला आमंत्रण दिले जाते. एखादी गोष्ट किंवा घटना घडली आहे हे मान्य करून पुढील उपाय योजना करणे.. प्राप्त परिस्थिती सोबत लगेच जुळवून घेणाऱ्याला चिंता राहत नाही..

“महापुरे झाडे जाती.. तेथे लव्हळे वाचती” अस म्हणतात, त्यावर काम करणे गरजेचे असते. मनापासून परिस्थिती स्वीकारा

2. मन गुंतवणे/ रमवणे:-

आपल्या आवडीच्या कामात, वाचनात, लिखाणात, व्यायामात, घर अवरण्यात, समाज कार्य करण्यात, लोकांना मदत करण्यात वेळ घालवला म्हणजे समाधान लाभते आणि चिंता येत नाही

3. ध्यान धारणा/ प्राणायाम/ योगा/व्यायाम:-

शरीर निरोगी तर मन निरोगी अस म्हणतात त्यामुळे शरीर फिट ठेवण्यासाठी प्रयत्न करा. जीवनशैली बदला.

4. खेळ ( शारीरिक व बौद्धिक):-

आपल्या मेंदूला गतिमान ठेवण्यासाठी खेळशिवाय पर्याय नाही. बैठे खेळ असतील किंवा मैदानी खेळ असतील ते खेळू शकता. मोबाईल वरील गेम खेळणे ठीक आहे, परंतु अतिरेक नको.. बुद्धी बळ, टेबल टेनिस, वस्तूंची नवे ओळखा, कोडे, सुडोकू.. असे कितीतरी खेळ आहेत.

5. स्वतःशी बोला:- (भावना व्यक्त करा)

तसे आपण स्वतःशी खूप बोलत असतो पण त्या मध्ये एकतर स्वतःला समजावत असतो किंवा चिडचिड करत असतो..त्या पेक्षा वेगळं .. जे वाटत ते स्वतःशी बोलणे गरजेचे आहे.. हसणे, रडणे, रुसणं, शांत बसणं.. राग व्यक्त करणे, प्रेम व्यक्त करणे हे सर्व “स्व संवाद” मधून साध्य होऊ शकत.

6. तज्ञ व्यक्तीचा सल्ला किंवा समुपदेशक यांना भेटा:-

आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असल्याने सकारात्मक बदल आपणच घडवू शकतो.. तरी देखील मनाचे प्रश्न जेव्हा फारच जटिल होतील तेव्हा या विषयातील तज्ञ व्यक्ती कडून समुपदेशन करून घ्या..

आनंदी रहा.. संघर्ष करण्यातली मजा घालवू नका..

(लेख आवडल्यास नावासकट शेअर करा.. मला आनंद होईल)


आवाहन – सभोवतालची अस्वस्थता वाढत आहे. ही चाहूल लक्षात घेता. आम्ही सर्व मानसशास्त्र विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की आपण जास्तीत जास्त लेख लिहावे. आपल्या लेखाची योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील. तसेच सोबत काम करण्याची संधी देण्यात येईल. संपर्क – ९१७५४२९००६.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!