Skip to content

सेक्स हा शरीराचा नसतोच, तर तो दोन मनांचा असतो. (भाग-२)

लग्न आणि सेक्स – भाग २


सौ.सुधा पाटील, सांगली

8459730502


या विषयावर कालच थोडं लिहिलं.बऱ्याच जणांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.खर तर हा विषयाचं गहन आणि सखोल आहे.त्यावर विचार मांडावेत तितके कमीच आहेत.पण आज भाग दोन मध्ये अजून थोडे विचार मांडण्याचा हा प्रयत्न!

कालचा लेख वाचून माझ्या डॉक्टर मैत्रिणीने मला दोन याबाबतची सत्य उदाहरणे सांगितली.ज्यांची ती स्वत: साक्षीदार आहे.पहिलं उदाहरण एका मुलीचं..ती मुलगी लग्न झाल्यावर माझ्या मैत्रिणीला भेटली पण नववधूचा आनंद तिच्या चेहऱ्यावर नव्हताच.तीनं चौकशी केल्यावर ती मुलगी म्हणाली, लहानपणापासून सेक्स म्हणजे घाण, वाईट असंच मला सांगितलं गेलं आणि लग्न झाल्यावर हेच घाण करायचं.मला किळस वाटते.मला त्यात इंटरेस्ट नाही.

आता दुसरं उदाहरण…एक मुलगा त्याच्या आई व नववधूला घेऊन तपासायला माझ्या डॉक्टर मैत्रिणीनीकडे आला.तक्रार अशी की,ती नववधू नवऱ्याजवळ झोपायला तयार नाही.चौकशीअंती ती मुलगी म्हणाली, मला भीती वाटते.ते सगळं घाण वाटतं.असं म्हणून ती मुलगी रडायला लागली.कशीतरी समजून सांगून,तिला थोडा वेळ द्या असं तिच्या नवऱ्याला व सासूला समजावून पाठवलं.जाताना ते दोघे त्या नववधूला ओरडतच होते.पण दुसऱ्या दिवशी समजलं की,त्या मुलीनं आत्महत्या केली.खरचं धक्का बसला ही उदाहरणे ऐकून!

खरंच विचार करायला हवा.मी लहानपणी एक वाक्य ऐकलं होतं.असचं कोणाच्यातरी तोंडून…. मुलं ही आई-वडीलांच्या वासनेतून जन्माला येतात.तेव्हा काहीच कळलं नाही.पण ते वाक्य मनावर कोरलं गेलं होतं.मोठेपणी अर्थ समजायला लागल्यावर हेच वाक्य मी मैत्रिणींमध्ये खुपदा चर्चेला घेतलं.पण अशीच वरवरची चर्चा झाली.मागेच या विषयावर लिहावं वाटलं पण तोच सामाजिक पगडा आणि भीती! आणि तेव्हा लेखणी अजून धारदार आणि धाडसी नव्हतीच.पण एकविसाव्या शतकात आम्ही खूप शिकलो.पण आम्हाला अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक समस्या सोडवता नाही आल्या.पण समस्येचं मूळ शोधल्याशिवाय समस्या कधीच संपत नाहीत.एखाद्या मुरलेल्या रोगासारखी ही दबलेली समस्या सतत डोकं वर काढत राहते.म्हणूनच योग्य वेळी योग्य ती काळजी आजार होऊच नये म्हणून घ्यायची असते.

खरंच प्रेमापोटी अपत्ये जन्माला येतं असती तर आज मुलींचे गर्भ पाडले गेले नसते.कचरा कुंडीत कोवळे अंकुर सापडले नसते.अनौरस बालके अशी लेबलं काही मुलांवर दिसलीच नसती.अनाथाश्रमे ओस पडली असती.असो…ही पण एक भयानक सामाजिक समस्या आहेच.
सेक्स लाईफचा नैतिक मार्ग म्हणून आपण या लग्न संस्थेकडे पाहतो.पण या संस्थेच्या दुबळेपणामुळे पाश्र्चात्य संस्कृती बोकाळत आहे.अनेक तरुण पिढीला लग्न नकोच आहे.

लिव्ह इन रिलेशनशिप संस्कृती बोकाळत आहे.पण का?याचा कुठेतरी विचार करायला हवा.एकीकडे आम्ही मुलींना सेक्स घाण असतो, वाईट असतो असे संस्कार करतो.आणि लग्न झालं की, फुलांनी सजवलेल्या पलंगावर तिला तेच करायची ही सुरुवात असं सांगतो.किती हा विरोधाभास!या अज्ञानामुळे कितीतरी कळ्या कोमेजून गेल्या असतील! कित्येक जीव आधी घुसमट सहन करून नंतर पर्याय नाही म्हणून परिस्थितीला शरणही गेले असतील.काळाच्या भयानक गर्तेत असंख्य कहाण्या लपल्या असतील.

पण या विज्ञान युगात पुन्हा अशा कहाण्या तयार होऊ नयेत म्हणून आपणच काळजी घ्यायची आहे.कारण आपणही या समाजाचे जागरूक घटक आहे.म्हणूनचं विवाह संस्था बळकट करण्यासाठी आजच्या तरुण पिढीला विवाहपूर्व समुपदेशन करायलाच हवं.पूर्वीच्या काळी लग्न झालेल्या बाईला आधार नसल्याने लग्नं टिकवली जायची.पण आज काळ बदलला आहे.मुलंमुली क्षणात घटस्फोट घेतात.यातूनही झालेल्या मुलांचे प्रश्र्न, त्यांच्या मनावर होणारा परिणाम या पुढच्या समस्या आहेतच.

या सर्व सामाजिक समस्या येऊच नयेत यासाठी लग्न म्हणजे काय? सेक्स म्हणजे काय?याची माहिती मुलामुलींना द्यायलाच हवी.तरच बलात्कार, अनैसर्गिक सेक्स अशा समस्यांना आळा बसेल.आमच्या मुलींना सुहागरात म्हणजे सजवलेला पलंग, मस्त नटणं सजणं म्हणजेच लग्न असं वाटतं.आजकालच्या मुलामुलींना सोशल मिडियामुळे बरीच माहिती मिळते.पण तीही अर्धवट आणि चोरून त्यामुळे वेगळ्याच समस्या निर्माण होतात.

म्हणूनच विवाहपूर्व समुपदेशन करणाऱ्या संस्था बळकट करायला हव्यात.आमच्यावेळी असं कुठे काय होतं?असे फालतू प्रश्न उभा करण्यात काहीच अर्थ नाही.आपली पिढी अज्ञानातच वाढली.वाढत आहे, सेक्स ही एक नैसर्गिक गरज असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे त्यातील समस्या गाढायच्या! यातूनच समस्या वाढत जातात आणि कधीही न सुटणारा गुंता तयार होतो.आजची पिढी तडजोड करून संसार टिकवणारी नाही.मुली स्वावलंबी झाल्या आहेत.पूर्वी बाईला जगण्यासाठी माहेर किंवा सासर हाच आधार होता.बाईची वाईट अवस्था ही की,दिल्या घरीच मर!सर्व चांगलं असलं तर ठिक नाहीतर बाई मरायचीच! वाईट वाटतं की,जन्मदाते सुद्धा त्रास सहन कर पण तिथेच मर असं मुलीला म्हणायचे.

आजही काहीजण तसंच म्हणतात.कारण आपली सामाजिक परिस्थिती, सामाजिक संस्कार.पण जीवांशी खेळणारे संस्कार काय कामाचे?पण आज तशी परिस्थिती नाही.स्वत:च्या बायकोला छळणारा पुरुषही माझ्या मुलीला जपणारा जावई हवा असं म्हणतोच.हे वास्तव आहे.आणि म्हणूनच लग्न या संस्थेचा पायाच असणाऱ्या सेक्सची शास्त्रशुद्ध़ माहिती सर्व वयोगटातील मानव जातीला दिलीच पाहिजे.अगदी प्रेमात अखंड बुडालेली,एक दुजे के लिये असं म्हणणारी मुलं-मुली देखील सेक्स लाईफ असमाधानी असेल तर घटस्फोट घेतात.मग प्रेम गेलं कुठे?

खरंच जरा वास्तव समजून घेऊया.भूक असह्य झाली की अगदी सभ्य माणूसही मागून किंवा चोरून खातोच! समाजात अनेक चोर निर्माण होतात ते केवळ गरचा अपुऱ्या राहतात म्हणूनच.कोणीही मानव मूळचा चोर नसतोच.अशा अनेक समस्या संपवायच्या असतील तर सेक्स हा विषय मोकळेपणाने समाजापुढे बोलून निकोप समाज निर्मितीसाठी प्रयत्न केला पाहिजे.आणि मुख्य म्हणजे स्त्रीयांना यांत गौण समजणं म्हणजे मुर्खपणाचा कळस होईल.कारण आजकाल मुली महिलांवरील अत्याचार पाहून लग्नंच नको म्हणत आहेत.अस झालं तर काय होईल याचा विचार करा.सारीत तरुण पिढी लिव्ह इन रिलेशनशिप या संस्कृतीचा विचार करू लागली तर समाज किती धोक्यात येईल? यासाठीच स्त्री आणि पुरुष यांच्या उत्तम समायोजनाशिवाय उत्तम लग्न संस्था निर्माण होऊच शकत नाही.म्हणूनच सारासार विचार करून आपणच आपला समस्या सोडवून एक विचारशील समाज निर्माण करूया.

हा विषय नाजूक समजून अनेक समस्या दाबल्या जातात.यातूनच अनेक मनोविकृतींचा जन्म होतो आहे.आणिआपल्या समाजात मानसिक आरोग्य, मानसिक आजार याकडे दुर्लक्ष केलं जातं.कुटुंबात अनेक मानसिक आजार हे सेक्स मधील असमाधान हेच आहे.त्यात महिला वर्ग तर तोंड दाबून बुक्क्यांचा मारच सहन करतो.सेक्स ही ओरबाडून खायची गोष्ट नाहीच.खरं वैवाहिक आयुष्य सुंदर करायचं असेल तर नवरा बायको दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या गरजा पूर्ण करायला हव्यात.एकीकडे बाई म्हणून तिचा अपमान करायचा आणि दुसरीकडे तिनं रात्री सारं विसरून पुरुषाला खुश करायचं अशी विचारसरणी असेल तर…अशक्य!

कारण सेक्स हा मनांचा असतो.शरीर हे केवळ एक माध्यम असतं.म्हणूनच प्रेमाला, भावनांच्या ओलाव्याला महत्त्व आहे.हे ज्यांना कळतं त्यांचेच संसार एक दुजे के लिये बनतात.अन्यथा केवळ सामाजिक तडजोडी! आणि तडजोड म्हंटले की तिथं व्रण,यातना,असाह्यता आलीच.तिथं कुठे असणार प्रेमाचा अंकुर! म्हणूनच आपल्या पुढच्या पिढीला वेळीच आपण सावरूया.


भाग १ ? क्लिक करा


आवाहन – सभोवतालची अस्वस्थता वाढत आहे. ही चाहूल लक्षात घेता. आम्ही सर्व मानसशास्त्र विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की आपण जास्तीत जास्त लेख लिहावे. आपल्या लेखाची योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील. तसेच सोबत काम करण्याची संधी देण्यात येईल. संपर्क – ९१७५४२९००६.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

38 thoughts on “सेक्स हा शरीराचा नसतोच, तर तो दोन मनांचा असतो. (भाग-२)”

  1. Pingback: सेक्स हा शरीराचा नसतोच, तर तो दोन मनांचा असतो! - आपलं मानसशास्त्र

  2. मी एक वकिलीचा अभ्यास करणारी विद्यार्थीनी आहे आणि खरच समाजात आजही आपण का लग्न करतोय हेच लोकांना माहिती नाही आहे आणि lockdown madhy तर मी खुप जवळून हे मतभेद आजुबाजूला बघते आणि आशा लेखाची खुप गरज आहे

  3. उत्तम लेख असून , दुर्लक्षित विषय आहे . या विषयाचा आवाका उत्तम शारीरिक, मानसिक, व सामाजिक आरोग्याशी संबंधित येतो . चर्चांमधून हे विचार हळूहळू समाजात पसरत. मोकळी चर्चा ही उत्तम सुरवात

  4. आपल्या मताशी 100% सहमत आहे.
    सेक्स बद्दल जागृकता वाढली पाहिजे.

  5. छान आणि उत्तम माहीती आहे आजकालच्या मुला मुलींना सेक्स या गोष्टी माहीत होतात पण त्या तितक्याच प्रमाणात त्यासाठी ह्या विषयी त्यांना परिपूर्ण माहिती मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे करण त्यांना त्यांच्या पुढच्या पूर्ण आयुष्यात याचा आनंद घेता येइल आणि देता पन येइल आता विषय नववधू चा की त्यांना पाहिल्या पासून सेक्स हा योग्य नसतो अस त्यांच्या मनावर बिंबवल जात मुळात त्यांना त्यांचे पालक ह्या गोष्टी पासून दूर ठेवायचा प्रयत्न करत असतात मग ज्या गोष्टी माहीत नसतात त्या महिती करून घ्यायच्या नादात मुले मुली वेगळ्याच वळणार जातात त्या पेक्षा पालकांनी ही गोष्ट ज्या त्या वयात मुलाना सांगावी. आणि ज्या मुलीना हे नकोस वाटत त्यांना पालकांनी सांगाव तू ही हे जग बघितल ते आमच्या दोघांच्या इच्छेने च म्हणजे (त्यांच लग्न आणि त्यांच्यात झालेल्या मिलना मुळेच) म्हणजे त्यांना त्या गोष्टी हळू हळू माहीत होतील व ते त्यांच्या भावी जीवनात आनंद घेतील.

  6. छान आणि उत्तम माहीती आहे आजकालच्या मुला मुलींना सेक्स या गोष्टी माहीत होतात पण त्या तितक्याच प्रमाणात त्यासाठी ह्या विषयी त्यांना परिपूर्ण माहिती मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे करण त्यांना त्यांच्या पुढच्या पूर्ण आयुष्यात याचा आनंद घेता येइल आणि देता पन येइल आता विषय नववधू चा की त्यांना पाहिल्या पासून सेक्स हा योग्य नसतो अस त्यांच्या मनावर बिंबवल जात मुळात त्यांना त्यांचे पालक ह्या गोष्टी पासून दूर ठेवायचा प्रयत्न करत असतात मग ज्या गोष्टी माहीत नसतात त्या महिती करून घ्यायच्या नादात मुले मुली वेगळ्याच वळणार जातात त्या पेक्षा पालकांनी ही गोष्ट ज्या त्या वयात मुलाना सांगावी. आणि ज्या मुलीना हे नकोस वाटत त्यांना पालकांनी सांगाव तू ही हे जग बघितल ते आमच्या दोघांच्या इच्छेने च म्हणजे (त्यांच लग्न आणि त्यांच्यात झालेल्या मिलना मुळेच) म्हणजे त्यांना त्या गोष्टी हळू हळू माहीत होतील व ते त्यांच्या भावी जीवनात आनंद घेतील.

  7. Vasant Shirsath

    फार छान विषयावर सविस्तर माहिती धाडसाने मांडली. एक परिपूर्ण लेख वाचून अधिक अधिक स्त्रीया आणि पुरुष ही पुढे येवून आपले मत आणि मनातील विचार मांडून आपले स्वातंत्र्य सिध्द करतील हीच अपेक्षा.

  8. Great, and it’s really good initiative specifically on important topic that know one even think about how serious is because this will impact on our soul.

  9. लेख वाचून प्रेम आणि वासना यातला फरक काय हे लक्षात आले आणि मी या विषया ला सलाम करतो आणि त्या ताईला सुद्धा सलाम करतो

  10. Thanks for writing on this subject.
    Good attempt. Congratulations.

    I would have liked more Scientic information and solutions to the commonly faced sexual problems in married couples in this post.
    So it would be helpful to the affected population.
    Any ways I hope you would take this as positive remark. Kp writing, all the best.

  11. खुप महत्त्वपूर्ण आणि आत्ताच्या पिढीलपिढीला उपयुक्त असा लेख आहे. असेच माहितीपूर्ण लेख पाठवावेत…
    धन्यवाद

  12. दिघे किशोर

    * लग्न आणि सेक्स * ह्या विषयावरील आपले दोन्ही लेख वाचले. खुप छान माहिती दिलीत. आजच्या पिढीला ही माहिती मिळणे आवश्यक होते आणि ती आपण दिलीत.

  13. हा लेख खरंच खूप छान आहे माझ्याकडून जीवनात वैवाहिक जीवनात खूप प्रॉब्लेम सुरू आहे कदाचित अशातच मला काही वाचन करून माझ्या वैवाहिक जीवन चांगला करू शकणार असं मला वाटतं आणि खरच मला पण या गोष्टीचा विचारच करावा लागेल नव्हे तर खरंच या गोष्टीला खूप विचारपूर्वक घेऊनच मला आयुष्य जगावे लागेल थँक्य

  14. Vaishnavi Subhash Gore

    लेख अप्रतिम आहे. असेच आणखी वाचायला नक्कीच आवडेल.

  15. राजु वावरे

    Ha लेख वाचून तरुण पिडी 100% नाही खरं 30% तर बदल नक्कीच घडणार.

  16. खुप छान लेख आहे आजच्या परिस्थितीला अनुसरून आहे आज या विषयावर counceling ची नक्कीच गरज आहे

  17. nikhil r shinde

    हा लेख तुम्ही खूपच छान पद्धतीने मांडला आहे तरुण पिढी साठी हा विषय एक खूप विचार करण्या सारखा आहे

  18. खरोखरच अगदी कौतुकास्पद लेख मांडला आहे, त्यामधून आपण देखील बोध घेण्यासारखे आहे, मस्तच..???

  19. सुधा मॅडम,, खूप छान विषय मांडलाय,,, तरुण पिढी किंवा आताची,, प्रेम आणि सेक्स यातला फरक कळत नाही,, अजून पुडबे वाचायला नक्की आवडेल,,

  20. आहार,निद्रा,भय आणि मैथुन ही सजीवाची चार लक्षणे आहेत.मानवेतर सजीवांच्या भावन निसर्ग नियमानुसार चालतात.
    मानवाने मात्र या चारही बाबतीत बुद्धीच्या जोरावर काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळवले आहे. आपण भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगतो परंतू पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार करून त्यात भारतीय संस्कृती शोधण्याचा प्रयत्न करतो.
    आहार हा जसा शरीर संवर्धनासाठी आहे तसेच मैथून हा प्रजोत्तपत्ती साठीच आहे. आहार आणि मैथुनामुळे आनंद मिळतो पण हे दोन्हीही आनंदासाठी नाहीत या वास्तवाचा गेल्या शंभर वर्षांत आपल्याला विसर पडलेला आहे.बेडरूम संस्कृती,संतती नियमांच्या साधनांची रेलचेल, इत्यादी सर्व गोष्टींमुळे अधिकाधीक मैथुन करणे म्हणजेच आनंद असा समज झाला आहे.या अतिरिक्त संबंधांमुळे शरीर अवाजवी थकते, आणि अनेक आजारांची शीकार बनते.
    खरेतर वात्स्यायनाने सुद्धा अपत्य निर्मितीच्या हेतूनेच एकत्र यावे,एरवी वेगळ्या शयनकक्षात रहावे असेच सांगितले आहे.निसर्गाकडून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा संयमीत वापर हा भारतीय संस्कृतीचा विचार.तर अधिकाधिक सुखासीनता,उपभोग हा पाश्र्चात्य विचार.सुखासीनता, शरीराच्या सर्व इंद्रीयांचे तेज हरण करते हा कठ उपनिषदाचा निष्कर्ष.भगवद्गीता ७/११ धर्माविरुध्दो काम…((धर्म म्हणजे निसर्गाचे नियम) आणि १०/२८ प्रजनश्चास्मी कंदर्प असे मार्गदर्शन केले आहे.

  21. सुंदर लेख लिहिला आहे.आसेच नवनवीन लेख लिहित रहा म्हणजे समाजाचा विचार बदलेल

  22. Gorakshanath Amarsing Kundelwal

    The delicate topic is a very good talented manner in a very nice Taiyaheb unexpected community

  23. ass vichar khup kami kartat ya vishayvr kon bolatch nahi kase kalel he sarv madamni chan prakare ha vishy mandla ahe

  24. कधीही न चर्चिला जाणारा विषय अगदी उत्तम पद्धतीने मांडलेला आहे. उत्तम….

  25. सुंदर पद्धतीने विचार लेखात उतरले आहेत.

  26. अतिशय संवेदनशील विषय खूपच चांगल्या पद्धतीने मांडला आहे.

  27. सुधा ताईंचे मनस्वी कौतुक ! अतिशय नाजूक आणि संवेदनशील विषय खुप सुंदर पद्धतीने हाताळला आहे…..यावर विचार करण्याची गरज आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!