
This Is From My Heart A Letter to Indian.
डॉ.उल्हास उढाण (Ph.d.)
औरंगाबाद,महाराष्ट्र.
9421678889
पटलं तर जरूर शेअर करा…
प्रिय मित्रहो,
सप्रेम नमस्कार.
आज संपूर्ण भारतीयांना उद्देशुन हे पत्र लिहितआहे.
तो अधिकार मला आहे/नाही हे मला माहीत नाही.पण हृदयातून वाटलं म्हणून लिहित आहे.
कोरोनाचं संकट मोठं आहे याची जाणीव मला आहे. पण सकारात्मक विचार करणं हे मोठं नैसर्गिक हत्यार आपल्या हातात आहे.उच्च मनोबल हे कोणत्याही संकटात प्रभावी शस्र ठरते हे मात्र खरे आहे.ते आपण वाढवूया आणि काही लहान लहान कृती करू या.
Think Positive.
एका हलक्या-फुलक्या विनोदाने या पत्राची सुरुवात करत आहे.तुम्ही खुप हसाल आणि हास्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.ही शक्ती क्षीण करणाऱ्या द्रव्यांचा हस्यामुळे रहास होतो असे तज्ञ सांगतात.
शाळेतील एका मॅडम ने आपल्या विद्यार्थ्यांला प्रश्न विचारला”असं एकच वाक्य सांगा ज्यात भूतकाळ,वर्तमान काळ आणि भविष्य काळ असेल.
नेहमी प्रमाणे वर्गात स्मशान शांतता पसरली…
प्रत्येक विद्यार्थी एकामेकांकडे पाहू लागला.पण एक बेरका विद्यार्थी आत्मविशवासाने पुढे आला आणि श्वास रोखुन म्हणाला,
“मॅडम…..तुम्ही रागावणार नसाल तर…. माझ्या मनाला जे सुचलं ते सांगू का?
त्या मॅडम सकारात्मक विचार करणारया असल्यामुळे म्हणाल्या…..Yes,Yes….. Why not? आणि विद्यार्थी म्हणाला”सो साल पहिले… मुझे तुमसे प्यार था।…आज भी है।…और कल भी रहेगा।
वर्गात हास्यकल्लोळ झाला पण त्या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचं कौतुक मॅडमनी केलं.
मला वाटतं आपण असंच आत्मविश्वासाने #कोरोना या साथीचा नायनाट करण्यासाठी पुढे यायला हवं. यापूर्वी आपण अनेक संकटावर मात केलेली आहे.
त्यासाठी घरावर तुळशीपात्र ठेवून सीमेवर बंदुका घेऊन लढायला जायचे नाही तर आपल्याच घरात आपल्या कुटूंबा सोबत आनंदाने राहयचे आहे.या साध्या सोप्या सूत्राने या संकाटावर मात करायची आहे.
कोरोनावर मात करायची असेल तर काही दिवस घरात राहा,स्वच्छता पाळा,बाहेर गर्दी करू नका,व्यक्ति-व्यक्ती मध्ये योग्य अंतर पाळा.लोकांच्या मनात भिती निर्माण होईल असे कोणतेही संदेश एकमेकांना पाठवू नका.सर्दी,खोकला,ताप आला तर मला कोरोना झाला असेही समजू नका.योग्य डाॅकटरांशी संपर्क करा.
एवढा साधा सोपा पर्याय आपण निवडला तर आपलं सरकार सहजतेने या साथीवर मात करू शकते.या पाठीमागेचे विज्ञान आपण थोडक्यात समजावून घेऊ या.
मानवी मेंदू विषयीचे संशोधन जगात अतिशय वेगाने पुढे गेले आहे.जगातल्या सर्व विचारवंतानी सांगितलेले आहे ‘तुमचा विचार तुमचे भविष्य आहे.तुमची निवड तुमचे भाग्य आहे’.त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका.आनंदी रहा,उत्साही रहा,उल्हासित रहा.आणि घरीच रहा.काही दिवस रिकामे कामं बंद करा.घरात बसुन शासनाला मदत करा.
“दीड किलो वजनाचा आपला मेंदू,तीन अब्जे न्यूरॉन पेशी व त्याच्या किमान दहापट संख्या असणाऱ्या गलायल पेशी यांनी बनलेला आहे” पाहणे,विचार करणे,स्पर्श,वास आणि परिसराची जाणीव आदि हे सर्व मेंदूच्या कार्यावर अवलंबून आहे.त्याला आपण या काळात कोणते काम देतो हे ठरवण्याची वेळ आली आहे.
सकारात्मक विचार द्यायचा कि नकारात्मक हे ठरवावे लागेल.विना कारण आपण आती काळजी पोटी आपल्या स्नेहीजणांना मनात भीती निर्माण होईल असे व्हिडिओ,चित्र,मेसेजेस पाठवने हे प्रथम थांबवायला हवे.कारण #आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ते आहे शारीरिक-मानसिक व सामाजिक स्वास्थ्य.असे जागतिक आरोग्य संघटना(WHO)म्हणते.
“WHOच्या मते 70 टक्के आजारांना औषध उपचारांची गरज नसते ते घरगुती उपयांनी बरे होऊ शकतात.25 टक्के आजारांना साध्या उपचारांची,साध्या तपासण्याची गरज असते.केवळ 5 टक्के रूग्णांना अत्याधुनिक तपासण्या व योग्य उपचारांची गरज असते”
वरील70 टक्के गटातील अंदाजे 40टक्के आजारात मानसिक तान तणावाचा शरीरावर परिणाम झालेला असतो.ज्याला सायकोसोमाटिक आजार असे म्हणतात.तर इतर 30 टक्के आजार हे विविध विषाणूंमुळे झालेले असतात.
विषाणूंमुळे झालेले आजार शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावरच आपोआप बरे होतात. त्यांना कोणत्याही प्रतिजैविकांची(अँटिबायोटिक्स)ची गरज भासत नाही.असे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डाॅ.रवी बापट म्हणतात तरी आपण ते घेत असतो.हा भाग वेगळा.
सतत कोरोनाच्या बातम्या आणि नकारात्मक संदेशाचा भडिमार कोरोना पेक्षाही मोठी समस्या निर्माण करू शकतो. म्हणून जास्तीत जास्त सकारात्मक विचार करा त्यासाठी सकारात्मक गोष्टी ऐका,वाचा,बघा,मनाला प्रसन्न ठेवा कारण मनाला,बुद्धीला ताण देणाऱ्या बाबींचा आपल्या मज्जासंस्थेवर आणि रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होत असतो.म्हणून आपल्या शरीरात अतिरिक्त एनझाइमस अंतरद्रव्य व हार्मोन्स आंतःस्त्राव तयार होतात.
या दोन्हीचा परिणाम त्वचेवर,श्वसनसंस्थेवर,पचनसंस्थेवर होऊन त्वचा,दमा किंवा अस्थमा,सर्दी,कोरडा खोकला, आम्लपित्त, डोकेदुखी,अंगदुखी आदि लक्षणे दिसतात.या त्रासाच्या तपासण्या केल्या तर सर्व काही नॉर्मल येते.कारण मानसिक ताणाचा हा शारीरिक परिणाम असतो.
30टक्के आजार हे विषाणूंमुळे होतात. सायकोसोमाटिक आजार असलेल्यांची प्रतिकार शक्ती कमी होते.शरीर विषाणूच्या हल्ल्याला लवकर बळी पडते.सर्वसाधारणपणे विषाणूंमुळे होणारे आजार हे अंगभूत प्रतिकारशक्तीच्या बळावर बरे होतात.त्यांना प्रतिजैविकांची गरज नसते.यासाठी थोडा धीर धरावा लागतो.पण 20टी-20टी च्या जमान्यात आम्हाला सर्वच फास्ट लागतं.
याचा अर्थ एवढाच आहे की कोरोना या विषाणूला हरवण्यासाठी आपण आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होऊ देता कामा नये. त्यासाठी मनाची प्रसन्नता शरीर,परिसराची स्वच्छता,व्यक्ती-व्यक्ती मधील योग्य अंतर पाळणं अत्यंत गरजेचं आहे.यासाठी कोणत्या ही शासकीय अनुदानाची गरज नाही.ज्याची गरज आहे ते देण्यासाठी सरकार तयार आहे.
आपल्या कडे आणि जगात अशी असंख्य उदाहरणे आहेत जी जीवघेण्या आजारातून ही माणसं केवळ आत्मविश्वास,इच्छाशक्ती,. योग्य काळजी,योग्य उपचार आणि मानसिक संतुलन ठेऊन चक्क ठणठणीत बरी झाली आहेत.
त्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन हा सिद्धांत,डॉ.रवी बापट,डॉ.अभय बंग,रेमंड फ्रन्सीस,डॉ.नॉर्मन कझीन,डॉ.हिप्पॉक्रेट्स डाॅ.श्रीकांत जीचकार आदींनी आपल्याला आपल्या आरोग्याबाबत आणि मानसिकते बाबत काय सांगितले आहे हे एकदा बघायला हवे.
नकारात्मक,भितीदायक गोष्टीचे संदेश कोणालाही पाठवू नका.आणि त्याची चर्चाही करू नका.सरकार वेळोवेळी ज्या सूचना देईल त्याचे काटेकोर पालन करावे अशी विनंती करण्यासाठी हा पत्र प्रपंच केला आहे.पटलं तर बघा.आपण काहीही शेअर करतो हे पत्र शेअर करायला काय हरकत आहे.
तर चला,
सकारात्मक विचार करू या घरात राहून कोरोनाला हरवूया,आपल्या सरकारला मदत करू या.
I wish you all healthy life.This is from my heart.Love all.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??




खूप उपयोगी माहिती दिलीत.खूप खूप छान लेख.