Skip to content

अनेक तरुण मुलींना या ‘Situation’ मध्ये मार्ग सापडत नाही.

अनेक तरुण मुलींना या ‘Situation’ मध्ये मार्ग सापडत नाही.


मिनल मोरे

वाडा, पालघर


प्राजक्ताचं एका मुलावर खूप प्रेम होतं, पण त्या मुलाने तिला फसवलं आणि तिच्या आयुष्यातून दूर निघून गेला.

रियाचं सुद्धा एका मुलावर प्रेम होतं. दोघे एकमेकांशी लग्न सुद्धा करणार होते. पण रियाच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध झाला आणि घरच्यांच्या दबावात येऊन रियाला दुसऱ्या मुलाशी नाईलाजास्तव लग्न करावं लागलं.

आता आपण म्हणाल, हे दोन्ही घडलेल्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण माझ्या नजरे दोन्ही प्रसंग सारखेच आहेत.

प्राजक्ताला मुलाने फसवल, तो त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेला. अशावेळी प्राजक्ता काय करू शकते का..??

प्राजक्ता फक्त रडतेय.. तिचं कशातच लक्ष लागत नाही. एकटीच विचार करत बसते. खाणं-पिणं, गप्पा मारणे, टीव्ही बघणे, हसणं बागडण यांपासून तिचं मन उडलंय.. तो मुलगा असा का वागला असेल?, जुने एकमेकांसोबत घालवलेले क्षण, त्याच्यासोबत संसार करण्याचे स्वप्न.. हे सर्व आठवून ती फक्त स्वतःला त्रास करून घेत आहे.

रियाचं मात्र वेगळं आहे. तिला सुधा तिच्या प्रेमाचा त्याग करावा लागला. त्याच्यासोबत भविष्याचे संसाराचे स्वप्न बघितले त्याच्यापासून कायमच दूर जावं लागलं. एकमेकांना दिलेले वचन, दोघांच्या जुन्या आठवणी, घरच्यांनी केलेला विरोध हे सर्व आठवून आज रिया सुद्धा रडत बसू शकते पण ती तसं करत नाही. कारण तिला परिस्थितीचे भान आहे. जे घडले तो भूतकाळ होता. त्या आठवणीत जर ती रडत बसली तर वर्तमानात मिळणारे क्षण आणि प्रत्येक क्षणात जगण्याचा आनंद तिला घेता येणार नाही. जे घडलं आहे त्यामध्ये काहीच बदल करता येणार नाही याची तिला जाणीव आहे.

आज जसं रिया जगत आहे तसं प्राजक्ता सुद्धा जगू शकते.

जो घडलाय तो भूतकाळ होता. आता माझ्यापुढे सुंदर आयुष्य उभ आहे हा विचार प्राजक्ता सुद्धा करू शकते.

रिया आणि प्राजक्ता या दोघींचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे.

असंच आपल्यापैकीही बहुतेकांचं असतं. प्रत्येक व्यक्तीला खूप सार्‍या प्रसंगांना सामोरे जावे लागते. जेव्हा आपल्या घडलेल्या क्षणांमध्ये आनंद असतो तेव्हा तेव्हा वारंवार तोच आनंद जसाच्या तसा आपल्याला घेत येत नाही. तेथे आपल्याला आनंदी होण्यासाठी नवं काहीतरी हवं असतं आणि आपण शोधतो ही.

कारण मन कसं आनंदी ठेवायचं याचा फोर्मूला आपण शोधलेला असतो.

अगदी तसंच दुःखे समोर आली की आपण दुःखाच्या बारीक सारीक अंगाचा नकारार्थी विचार करतो… म्हणून नकारात्मकता पसरते आणि पुढेही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपले लक्ष केवळ दुःखद गोष्टींकडेच खेचले जाते. आपल्या आयुष्यात जेव्हा दुःख येतात तेव्हा आपण…

१) सतत तेच दुःख आठवत बसणे.
२) दुसऱ्या व्यक्तीला आपले दुःख सांगून सहानुभूती मिळवणे अर्थात तसा अर्थ नसतो आपला पण होते मात्र तसच.
३) स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे (जेवणाकडे, झोपे कडे, आपल्या आवडीनिवडी)
४) दुःख आल्यावर आपला दुःखाला सपोर्ट करणारे अगदीच साजेसे असे अजीब दासता है ये.. तडप तडप के..ह्यासारखे दुःखात भर देणारे गाणे ऐकणे.
५) स्वतःला सर्वांपासून लांब ठेवणे (बाहेरचा सुंदर निसर्ग, मित्रमंडळी, घरातली माणसं).

हे सर्व केल्यामुळे आपले दुःख कधीतरी कमी झाले का???

आता याउलट दुःखी वाटलं तर,

१) मस्तपैकी कॉमेडी सिरीयल लावायची, भन्नाट विनोद वाचायचे अगदीच खळखळून नसलं तरी मनापासून हसायला येईल.
२) घरच्यांसोबत तसेच मित्रपरिवार सोबत मोकळ्या गप्पा मारायच्या वेळ अगदी सहज जातो.
३) आपल्याला जे आवडते ते करायचं, त्यामुळे वेळ कसा जातो कळतच नाही. आपल्या आजूबाजूला खूप सुंदर निसर्ग आहे त्यामध्ये रमायचं.
४) स्वतः वर प्रेम करायचं अर्थात सगळ्यात महत्त्वाची राहून गेलेली गोष्ट आहे ही. आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही याला महत्त्व द्यायचं.
५) ज्यांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत स्फूर्ती देतात असे सुंदर पुस्तक वाचायचे, लेख वाचायचे. उदा. छत्रपती शिवाजी महाराज, अब्दुल कलाम. यामुळे आपल्याला आपली दुःख खूप छोटी वाटतात.

आयुष्य हे एकदाच मिळतं पुढचं कोणी पाहिलं आहे.. दुःखामध्ये अडकून बसून जगण्याची मजा विसरू नका. येणारा क्षण येईलच तो कसा असेल माहिती नाही.

त्यामुळे आत्ताचा क्षण जगा..


आवाहन – सभोवतालची अस्वस्थता वाढत आहे. ही चाहूल लक्षात घेता. आम्ही सर्व मानसशास्त्र विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की आपण जास्तीत जास्त लेख लिहावे. आपल्या लेखाची योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील. तसेच सोबत काम करण्याची संधी देण्यात येईल. संपर्क – ९१७५४२९००६.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “अनेक तरुण मुलींना या ‘Situation’ मध्ये मार्ग सापडत नाही.”

  1. Yogesh Mahadev Shevkari

    दोन्ही गोष्टी सेम नाहीत, वडिलांनी प्रियकरा ऐवजी दुसऱ्या मुलाशी इच्छेविरुद्ध लग्न लावून दिलेली स्त्री खूपच घातक असते नवरा व त्याच्या कुटुंबासाठी. सत्य घटनेवर आधारित.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!