Skip to content

२१ दिवस संपले आता येऊ लागला कंटाळा..

२१ दिवस संपले आता येऊ लागला कंटाळा..


हेमश्री अलासे


“Spending Quality time with Family”, ” FamilyTime”, “Cooking is fun with family”, असे अनेक captions आणि hashtags सध्या सोशल मीडियावर in trend आहेत. Lockdown मुळे सगळेच घरात कैद झाले आहेत. कैद हा शब्द अशासाठी की आता मार्च महिन्याच्या जवळपास १५व्या तारखेपासून घरात आहोत. पहिले काही दिवस सगळ्यांनी एकत्र बसून सिनेमे पाहणं, पत्ते खेळणं, स्वयंपाक आणि साफसफाई करणं सगळं सगळं झालं. पण आता… ह्याच family time पायी घरात वादाच्या ठिणग्या पडू लागल्यात. आणि so called fun time आता कैद वाटू लागली आहे. कित्येक कुटुंबांनी ही कैदेची भावना सहज मान्य केली तर काहींनी ‘असं काही नसत’ म्हणत तशीच रेटली.

छोटे-छोटे खटके उडणं, कुरबुरी, वाद हे प्रत्येक घराला नवीन नसतं. कुठेतरी मतभेद होतात आणि मग शाब्दिक आतिषबाजी ही obvious म्हणजे अपेक्षितच असते.

पण आता lockdown मुळे लोकांनी स्वतःला self quarantine करून घेतलं आणि कुटुंबाला प्राधान्य दिलं. उशिरा उठणं, एकत्र हसत-खेळत चहा-नाष्टा, मग निवांत आंघोळी की तोवर दुपारच्या जेवणाची वेळ होतेच, दुपारची जेवणं आटोपून एक मोठ्ठी वामकुक्षी घेऊन पुन्हा चारच्या चहाची तयारी… आणि असं करत करत दिवस संपतो. सगळं कसं अगदी लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीसारखं… गोड, गोड!

पण एकवीस दिवसांचे एकवीस दिनक्रम संपले आणि मग येऊ लागला कंटाळा…

ह्या तेवीस-चोवीस दिवसांत कित्येक आईवडिलांना आपली मुलं काय थराचा आळशीपणा करू शकतात याचा अंदाज आला, कित्येक मुलांना आपले आईवडील किती शिस्तप्रिय आणि कामसू आहेत हे समजलं तर बऱ्याच नवराबायकोंना आपल्या ‘other half’ च्या नवनवीन सवयी कळल्या.

आपल्या जवळच्या माणसांच्या ह्या गोष्टी काही आपल्याला नवीन नसतात फक्त इतरवेळी आपण कामाच्या रगाड्यात त्यांच्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतो आणि adjust होऊन जातो त्यांच्यासकट आपापल्या busy आयुष्यात. पण सुट्टीचे दोन दिवस adjust करणं वेगळं आणि महिनाभर घरात सहन करणं वेगळं…

हळूहळू sharing म्हणजे personal space वर हल्ला वाटू लागला. मुलांचं पडून राहणं आणि चालढकल करणं विश्रांती न वाटता, कामचुकारपणा आणि आळशीपणा वाटू लागला. घातलेले पसारे डोळ्यांना खुपायला लागले. मनाने जवळ आलो म्हणता म्हणता भांडणाच्या, वादाच्या ठिणग्यांनी दहशत पेरली. सहजीवन, सहअस्तित्व संकल्पना पुस्तकातच बऱ्या असं वाटू लागलं.

पण अचानक family time साठी धडपडणाऱ्या आपल्याला अचानक त्याची ऍलर्जी का वाटू लागतेय?

अति एकत्र असणं एकटेपणाला आमंत्रण देतंय का?

“लवकर उठ रे, बारा ही काय उठायची वेळ झाली का???… अंघोळ आटप गधड्या/गधडे… आजकाल नाष्टा आणि दुपारचं जेवण एकच झालंय आपलं… तुझ्यापेक्षा तो कुंभकर्ण तरी कमी झोपत असेल… सारखं काय आपलं खायला लागतं तुला? सारखा सारखा तो मोबाईल आणि लॅपटॉप बघून डोळ्यांची खाचाडं होतील आता, बस करा…” असे संवाद आता घराघरात ऐकू येऊ लागलेत.

अशी सततची टीका, जवळपास प्रत्येक गोष्टीत घरातल्या इतर सदस्यांची overinvolvement कधी कधी त्रासदायक ठरू शकते. इतरवेळी जेव्हा आपलं नेहमीचं routine सुरू असतं तेव्हा ही टीका, overinvolvement आपल्याला control करता येते. कारण २४ तास आपण एकमेकांसमोर नसायचो. विशेषतः जेव्हा घर लहान आणि कुटुंब मोठं अशी परिस्थिती असेल तर ह्या quarantine च्या काळात अशा गोष्टी handle करणं अतिशय अवघड होऊन जातं. २४ तास एकमेकांबरोबर राहणं हे काही काळासाठी अगदीच सुखावह असू शकतं पण जर हा कालावधी वाढला तर कित्येकदा मानसिक आरोग्यावर आणि कौटुंबिक आयुष्यावर याचे दूरगामी परिणाम दिसून येऊ शकतात.

कित्येकदा आपल्या मागच्या पिढ्यांनी personal space, privacy ह्या संकल्पनांना ‘हे काय नवीन फॅड, आमच्यावेळी असं नव्हतं बुवा… नवीन पिढ्यांची नवीन नाटकं’ असं म्हणत सपशेल नाकारलं आहे. सर्वसामान्य परिस्थितीत कधी शाळा-महाविद्यालयात, कामाच्या ठिकाणी तर कधी अजून कुठे बाहेर जात आपण आपली personal space जपत असतो. स्वतःला वेळ देत असतो.

अनोळखी माणसांसमवेत किंवा एकटं राहून स्वतःला शांत करत असतो. मात्र आता घरातच राहून ही परिस्थिती कशी हाताळता येईल ह्यावर विचार करायला हवा. थोडक्यात, परिस्थिती स्वीकारून मार्ग काढायला हवा.

सध्या आपला आणि आपल्या कुटुंबाचा रोजचा दिनक्रम काय आहे याचा आढावा घेऊन वादाची, टीकेची नक्की कारणं ह्याचा शोध घेणं ही पहिली पायरी.

प्रत्येक सवय बदलणं हे अगदीच शक्य नाहीये पण काही गोष्टी नक्कीच कमी करता येतील. आनंदी सहजीवनासाठी काही गोष्टी adjust कराव्या लागल्या तर काय हरकत आहे?

सकाळी वेळेत उठण्यावरून वाद होत असतील तर १२ च्या ऐवजी ९ ला कसं उठता येईल ह्याचा विचार केल्यास कित्येक वादाचे मुद्दे सहज शमवता येऊ शकतात.

आपण प्रत्येकाने आपल्याभोवती काही चौकटी आखलेल्या असतात. घरात राहताना कित्येकदा त्या चौकटी पाळणं शक्य होत नाही. अश्या वेळी कदाचित घरच्यांना ह्या गोष्टींची शांतपणे, पटेल अश्या रीतीने कल्पना दिली तर सुसंवादाने प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. जशी आपल्याला personal spaceची गरज आहे तशीच ती घरच्या इतर लोकांनाही आहे ह्याचा विचार करून ती प्रत्येकाला कशी जपता येईल याबद्दल निर्णय घेता येतील.

असेच वादाचे मुद्दे हळूहळू rule out करत नात्यांचे हळुवार बंध अजून घट्ट करता येतील. कौटुंबिक आयुष्यात शांतता आणि समाधान असेल तर प्रत्येक जण ह्या अवघड परिस्थितीत आनंदी राहू शकतो.
हॅरी पॉटर सिनेमातील प्रोफेसर डंबलडोअरच्या तोंडी एक वाक्य आहे,

“Happiness can be found, even in the darkest of times, if one only remembers to turn on the light.”
So, let’s turn on the light we had forgotten long time ago…



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “२१ दिवस संपले आता येऊ लागला कंटाळा..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!