Skip to content

आपल्या आजूबाजूला दोन्ही बाजूने बोलणारी माणसे असतात.

आपल्या आजूबाजूला दोन्ही बाजूने बोलणारी माणसे असतात.


सुलभा घोरपडे


असे म्हणतात ज्या दिवशी आपण जन्माला आलो , त्या दिवसापासून समाजात टिकाकार जन्माला आले. आपण कसेही वागलो तरी लोक चारी बाजूने बोलत असतात.

* एखाद्या संसार चांगला करत असेल तर, याने संसाराचा पसारा मांडलाय, नुसता संसारात बुडाला आहे.
* संसार सोडावा तर , आळशी म्हणतात .
* काही चांगले सांगायला गेले तर, लागली उपदेश करायला, असे म्हणतात.
* पैसा कमवायला लागले तर, पैशाच्या मागे धावतोय. खूप कमवला तर , पैशाचा माज आलाय.
* पैसा नाही कमवला तर, करंटा म्हणतात.
* जास्त बोलणारा ( बोलणारी) असेल तर, वाचाळ, बडबडी म्हणतात .
* कमी बोलत असेल तर , गर्विष्ठ म्हणतात .
*एखाद्याच्या घरी सारखे जात असेल तर, याने( हिने) येउन जाउन घराचा उंबरा झिजवला.
घर बुडवले.
* कोणाच्या घरी जाणेच नसेल तर, त्याला( तिला ) रितभात नाही , निष्ठूर म्हणतात .
* लग्न केले , फार मुले झाली तर, पोरवडा माजवला म्हणतात .
मुलच नसेल तर , निपुत्रीक म्हणतात .
* कोणी जास्त खर्च करत असेल तर, उधळ्या ( उधळी) म्हणतात .
* कोणी बचत , कमी खर्च करत असेल तर, चेंगूस ( चेंगट) म्हणतात.

अशा प्रकारे बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असताना आपल्याला कस वागावे हे समजत नाही .प्रत्येकजण बरे वाईट मत प्रदर्शित करत असते . या दुतोंडी समाजात आपण कसेही वागलो तरी , टीका होतच राहणार.

लोक आपल्याला नावे (निंदा ) ठेवतील म्हणून कित्येकांची स्वप्न अपूर्ण राहतात.

लोकांच्या विचार करण्यापेक्षा , आपण कसे आहोत हे आपल्याला माहिती असते .

अशा लोकांना किती महत्त्व द्यायच हे आपणच ठरवायला हव ना?
कोण काय म्हणते त्यापेक्षा आपल्याला काय वाटते हे महत्त्वाचे .
आपण सगळ्यांना खूश ठेवू शकणार नाही .आपले आपण खूश कस राहायच हेच पाहाव.

एकूण काय तर , कुछ तो लोग कहेंगे ; लोगों का काम है कहना . छोडो संसार कि बातो को….बस तूम खूश रहना!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??


छंद जोपासण्यासाठी

क्लिक करून सामील व्हा!

??

6 thoughts on “आपल्या आजूबाजूला दोन्ही बाजूने बोलणारी माणसे असतात.”

  1. खूप छान मांडणी केली आहे , आपल्या मताशी सहमत आहे कारण मला असलेला अनुभव असाच काहीसा आहे व आपण माझ्या मनातल्या असणाऱ्या भावना व्यक्त केल्यात असं मला सांगायचं आहे…? खूप छान अप्रतिम

  2. समर्पक विचार आहेत.महत्वाचा प्रश्न असा आहे की कळतं पण वळत नाही. कृतिशुण्यतेला ज्ञान असून उपयोग काय?
    मुळात जन्मतः संस्कार नसेल तर आयुष्य भरकटतच जाते.

  3. अगदी बरोबर बोलला बारीक निरीक्षण करून तुम्ही बरोबर लोकं काय म्हणतात हे बरोबर लेखात मांडलं आहे??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!