Skip to content

घरात बसून मनाचा कोंडमारा होतोय?? मग हा लेख वाचाच!

लॉकडाऊनकडे सकारात्मक पाहूया…


कल्पना बनकर पाटील

(मानसशास्त्र विद्यार्थी)


आज जगभरामध्ये कोरोना सारख्या आजाराशी सर्व मानवजात लढा देत असतानां खूप काही चांगल्या वाईट गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत. परंतु आपल्या सर्वांवरच या सर्वांचा नकळत का होईना ताण आलेला आहे हे नाकारता येणार नाही.

आज यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा कधी होईल याचा ताण, तरुणांना नोकरी टिकेल की नाही याचा ताण तर असा प्रत्येकालाच कशाचा ना कशाचा ताण आहेच. यामध्ये भर म्हणजे सोशल मीडियाचा मानवी मनावर होत असलेला अवास्तव परिणाम. कळत नकळत आपण आपल्या मनातील भीतीपोटी न्यूज चैनल वर त्याच-त्याच न्यूज पाहणे, कोरोणा बाधितांचे आकडे, मृतांचे आकडे क्रिकेटच्या स्कोर प्रमाणे सतत बघणे व त्यावर इतरांशी व कुटुंबातील सदस्यांशी त्यावर चर्चा करणे, सतत फेसबुक स्क्रोल करणे आणि त्यातून अधिक काही अपडेट्स मिळतात का ते तपासणे व सोशल मीडियावर सतत याच प्रकारचे मेसेजेस फॉरवर्ड करणे, सध्या हाच दिनक्रम बहुतांचा आहे आणि नकळत का होईना पण प्रचंड ताण व भीती आपल्या मनात निर्माण झालेली आहे.

आणि याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे जेव्हा लॉकडाऊन च्या काळात एखादा चित्रपट टेलिव्हिजन वर सुरु असतो. त्यातील एक प्रसंग – एक घर आहे. त्या घराची डोअर बेल चित्रपटाचा नायक वाजवतो आणि त्या चित्रपटाची नायिका दरवाजा उघडते व ती दोघे खूप दिवसांनी एकमेकांना भेटत असल्याने खूप आनंदी होतात व तो नायक आनंदाच्या भरात नायिकेला उचलून घेतो. तेव्हा अचानक मनात येते की “अरे नायक तर आत्ताच बाहेरून आला आहे आणि त्याने त्याचे हात पण सॅनेटाईज केले नाही आणि तसाच तो घरात सर्वत्र फिरत आहे”

तसेच चित्रपटातील एखाद्या प्रसंगात – खूप लोक एखाद्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर लगेच आपल्याला याची जाणीव होते की “बापरे एवढी लोकं आणि एकत्र मास्क नाही किंवा काहीही प्रिकॉशन नाही”.

सांगण्याचं तात्पर्य एवढंच की, आपल्या मनाचा ताबा नकळत का होईना पण भीतीने घेतलेला आहे मग तुम्ही कितीही सुशिक्षित, उच्चशिक्षित, विचारी असाल तरीही.

मग यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल ?

तर जाणीवपूर्वक आपल्याला आपल्या भोवतालच्या नकारात्मकते कडून सकारात्मक विचार करावा लागेल तो कसा ?

तर पुढीलप्रमाणे –

१) पती-पत्नी संबंध – रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आयुष्य हे फार तणावपूर्ण झालेले आहे त्यामुळे पती-पत्नीला एकमेकांना वेळ देणे शक्य होत नाही आणि क्वचित मिळालाच वेळ तर त्यांची त्यावेळेसची मानसिक व शारीरिक स्थिती या सारख्या बऱ्याच कारणांमुळे पती-पत्नीला एकमेकांना वेळ देणे शक्य होत नाही. त्यात पत्नीही नोकरी करणारी असेल तर मग वेळ काढण थोडं अवघडच. अशा जोडप्यांसाठी लॉक डाऊन ही एक सुवर्णसंधीच म्हणावी लागेल ( अर्थात लादलेली असली तरीही….?) जुने अल्बम चाळा, जुन्या आठवणींना उजाळा द्या, सोबत घालवलेले चांगले वाईट प्रसंग आठवा. यामुळे आपण ज्या वाईट प्रसंगातून बाहेर येऊन आज यशस्वीपणे जीवन जगत आहोत या विचारां पुढे आजच्या समस्या तुम्हाला किरकोळ वाटतील हे नक्की.

दोघांमध्ये काही वाद असतील तर ते सामोपचाराने एकमेकांशी सुसंवाद साधून सोडवता येऊ शकतात आणि शेवटी एकमेकांच्या गुणदोषांसह आपल्याला व्यक्तीचा स्वीकार करता आला पाहिजे. पती-पत्नी दोघांनीही मिळून घरातील बरीच कामे एकत्रित करता येतील. उदाहरणार्थ स्वयंपाक करणे,घरातील स्वच्छता करणे. यामुळे दोघांमधील प्रेम ही वाढेल व वैवाहिक बंध अधिक घट्ट होतील.

२. कौटुंबिक संबंध – सद्य परिस्थितीमुळे घरातील ज्येष्ठ व्यक्ती व लहान मुले देखील घरातच आहेत. तर ज्येष्ठांना त्यांच्या आवडीप्रमाणे टीव्ही सिरीयल ( रामायण, महाभारत ), जूने चित्रपट लावून देणे. त्यांच्यासोबत त्यांच्या भूतकाळातील चांगल्या आठवणींना उजाळा देणे. त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच लहान मुलांसाठी घरातच बैठे खेळ खेळता येतील. घरातील सर्व सदस्यांच्या आवडीप्रमाणे एकत्रित वाचन करणे, वाद्य वाजवणे, गायन करणे, ज्यामुळे कुटुंबातील सर्वांचेच मनोरंजन होईल व नात्यातील बंध घट्ट होण्यास मदत नक्कीच होईल.

३. मैत्रीचे संबंध – सद्य परिस्थितीमध्ये बाहेर जाता येत नसले तरीही आजच्या काळातील प्रगत तंत्रज्ञानामुळे आपण जगाशी कनेक्टेड आहोत ही भावनाच मुळी सुखावणारी आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या मित्रांना खूप दिवसापासून बोलायचं राहून जात होतं त्यांच्याशी फोनवर संवाद साधा. किती मित्र-मैत्रिणी असतात शाळेतील, कॉलेजमधील, ऑफिसमधील , सोसायटीतील या आणि अशा असंख्य. यामुळे तुम्हाला व तुमच्या मित्र-मैत्रिणींना जो आनंद मिळेल तो लाख मोलाचा असेल.

वरील सर्व बाबी तर महत्त्वाच्या आहेच परंतु खूप गोष्टी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात करायच्या राहून गेलेल्या असतात त्यासाठी वेळ काढा. रोजच्या दिवसाचं नियोजन करा. त्यामध्ये मेडिटेशन, योगा, एखादा छंद, वाचन यांचा आवर्जून समावेश करा आणि सर्वात महत्त्वाचे गुरु ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे

“स्पर्शांना अर्थ मिळाले, नात्यांना आली गोडी, माझ्यातून “मी” कातरला, आन् सुटली सारी कोडी”.

?…धन्यवाद…?


आवाहन – सभोवतालची अस्वस्थता वाढत आहे. ही चाहूल लक्षात घेता. आम्ही सर्व मानसशास्त्र विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की आपण जास्तीत जास्त लेख लिहावे. आपल्या लेखाची योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील. तसेच सोबत काम करण्याची संधी देण्यात येईल. संपर्क – ९१७५४२९००६.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “घरात बसून मनाचा कोंडमारा होतोय?? मग हा लेख वाचाच!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!