Skip to content

भूतकाळातील आठवणी सतत उगाळत का रहायचं ?

भूतकाळातील आठवणी सतत उगाळत का रहायचं ?


सुलभा घोरपडे


भूतकाळातील आठवणी सतत उगाळत राहणे हा सर्वसामान्य माणसाचा स्वभाव असतो.
भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यामध्ये वर्तमानकाळ आहे . आपणाला शिकवण आसते की, आपण वर्तमानात जगले पाहिजे,

भूतकाळातील नको त्या गोष्टी आठवत बसलो तर, कालची दुःखे , किंवा उद्याची काल्पनिक दुःखे किंवा संकटे आपण कुरवाळत बसलो तर , म्हणजे रविवारी शाळेला सुट्टी आहे म्हणून आनंद होतो पण जेव्हा रविवार उजाडतो तेव्हा सोमवारी शाळेला जावे लागणार म्हणून दुःख होते त्यामुळे आज तर वाया जाणारच त्याबरोबर उद्या पण वाया जाणार.

सर्वांच्या बाबतीत सर्वच परफेक्ट नसते , जे आयुष्य आहे ते सुखी व आनंदी केले पाहिजे .
रंगीन केले पाहिजे .

गेलेला काळ परत येत नसतो , हे समजून घेतले तरच आपण वर्तमानात प्रवेश करू शकतो . आमच्या काळात किती स्वस्ताई होती, आम्ही असे होतो , तसे होतो , हे सांगून काय होणार.
आजच्या काळाशी जुळवून घेतल्याशिवाय आपली वाटचाल कशी शक्य होणार.

जग तर नव्याने पुढे चाललेय. शास्त्रज्ञ म्हणतात; येणाऱ्या पन्नास वर्षानंतर पृथ्वी माणसाला राहण्याकरिता योग्य राहणार नाही , यावेळी आपण कोठे असणार , त्यासाठी वर्तमानात जगत भविष्यात डोकावण्याची सवय लावली पाहिजे . चूक काय, हित कशात आहे , हे पण समजून घेतले पाहिजे .

कालच्या काळाला कमी लेखायला नको आणि येणाऱ्या नव्याचा दुःस्वास नको.

आपण कालचा काळ पाहिलाय , आजचा काळ पाहतो आहोत, ही जाणीव सुद्धा आनंद देते.
जुने जाऊद्या मरणा लागून जाळून अथवा पुरूनी टाका , असे म्हणतात.

म्हणून कालच्या काळात धन्यता मानण्याची सवय सोडून येणाऱ्या नवीन गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे तरच जगाबरोबर पुढे जाता येईल.

‘थांबला तो संपला,’ हे काळ सांगत असतो . हे समजले की ,

नावीन्याचा स्वीकार होतो उद्द्याची चाहूल लागेल. नित्य जगण्याचा आपला विचार कालच्या काळाला निरोप देऊन येणाऱ्या उद्द्याच्या काळाकडे झेप घेईल.असे झाले तर आपले जगण्याला बळ येईल .



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!