Skip to content

आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स!!

आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स!!


मिनल मोरे

(संकलन)


आजच्या युगात स्पर्धा खूप वाढली आहे. दिवसाला नवीन-नवीन क्षेत्र तयार होताहेत आणि या स्पर्धेत टिकायचं असेल तर दुसऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला पाहिजे आहे तो म्हणजे आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. तर आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स:

१) तुम्हांला जे बनायचं आहे, ते Visualize करा.

जे प्रत्यक्षात पाहिजे आहे याची कल्पना करा. मनात ठरवलं आणि विश्वास ठेवला की ते मिळवता येते. आपण नेहमी स्वतःला कमी लेखत असतो आपल्याला स्वतःला सिद्ध करता येते पण ठरवलं ते मिळवताना त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि ते प्रयत्न आत्मविश्वास कमी असल्याने बहुतेकदा कमी पडतात. उदाहरणार्थ मला भविष्यात डॉक्टर बनायचे आहे तर मी नेहमीच मनात एक कल्पना करणार कि मी एक उत्तम डॉक्टर होणार आहे.

२) स्वतःला जाहीर सांगा.

होकारार्थी म्हणजेच सकारात्मक आणि उत्तेजन देणारी वाक्य जे आपण स्वतःलाच बोलतो त्यांचा परिणाम जेव्हा आपण ते मोठ्याने बोलतो आणि ऐकतो तेव्हा नक्कीच होतो. आपण स्वतःला सातत्याने जे सांगतो त्यावरच आपण विश्वास ठेवतो. उदाहरणार्थ जर आपल्याला स्वतःचं दिसणे आवडत नसेल तर आपण नेहमीच स्वतःला आरशासमोर उभं राहून स्वतःचं कौतुक करण्याची सवय लावली पाहिजे. आपली बुद्धी नेहमीच सकारात्मक विधान लवकर स्वीकारते म्हणून कायम मला हे जमणार का? माझी ती कमजोरी आहे असं म्हणण्यापेक्षा मी हे नक्कीच करणार माझ्यात चांगले गुण सुद्धा आहेत, असं स्वतःच स्वतःला जाहीर सांगायचं यामुळे स्वतःबद्दलची नकारात्मकता दूर होते.

३) रोज असं एक नक्कीच करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

जर तुम्ही असुरक्षित आहात तर बाकीचे जग सुद्धा तेवढेच असुरक्षित आहे. जगात चाललेल्या स्पर्धेला अवास्तव महत्त्व देऊ नका आणि स्वतःला कधी कमी लेखू नका. तुम्ही जेवढा विचार करता त्यापेक्षा नक्कीच तुम्ही उत्तम आहात. दिवसातून एकदा ज्याची तुम्हाला भीती वाटते त्यातला एक प्रयत्न नक्कीच करा. त्यामुळे तुमच्या मनातील भीती दूर होईल आणि आत्मविश्वास वाढेल तर आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन मनातली भीती कमी करायला हवी.

उदाहरणार्थ मला इंग्लिश भाषा शिकायची आहे. ती भाषा मला कळते पण सर्वांमध्ये बोलण्याची भीती वाटते तर मी रोज एकदा एखादी स्टोरी किंवा काही वाक्य मोठ्या आवाजात आरशासमोर किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीसमोर बोलणार.. त्यामुळे मला सवय होईल, माझ्यातली भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढेल.

४) आपल्या आतील टीकाकाराला प्रश्न विचारा.

आपण नेहमी स्वत:च स्वत:वर टीका करत आलोय पण त्यातून काहीच बदल आपल्यामध्ये घडले नाहीत. याचं कारण आपल्यातील टीकाकार एकतर अतिशयोक्ती करतो किंवा चुकीचा सुद्धा असू शकतो. कधी तर अतिशय कठोर अशा टीका आपणच आपल्यावर करतो. अशावेळी आपण स्वतःला उलट प्रश्न विचारायचे (आतील टीकाकार) मी जर अपयशी आहे तर मी अपयशी असल्याचा पुरावा काय आहे? आणि जर मी अपयशी नाहीये तर मी अपयशी नसल्याचा पुरावा काय आहे?
नेहमीच अशा संधी शोधायच्या ज्यातून आपणच आपले अभिनंदन करणार आणि अगदी लहान यशानंतर सुद्धा स्वतः स्वतःला बक्षीस देणार.

५) स्वतःला जिंकण्यासाठी तयार करा.

आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर आपण आपले लक्ष यशाकडे केंद्रित केले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता आणि अपयश हे आपण विसरले पाहिजे.

बहुतांश लोक त्यांच्यातील कार्यक्षमतेबद्दल निरुत्साही दिसतात कारण त्यांनी साधण्यासाठी अतिशय कठीण अशी ध्येये ठरवलेले असतात. जर आपण अगदी लहान आणि सोपे ध्येय ठरवले तर आपल्याला ते साधण्यास कठीण जात नाही आणि हळूहळू आपल्याला आपले ध्येय वाढवता सुद्धा येतात. अगदी सुरुवातीपासूनच जी ध्येय आपण साध्य केले आहेत यांची लिस्ट तयार करायची. त्यामुळे आपल्यातली सकारात्मकता वाढते. पुढे काय करणार याची लिस्ट आपण करतोच पण त्यासोबतच याआधी आपण काय केलं याची लिस्ट पाहिल्यावर आपल्यातला आत्मविश्वास वाढतो.

६) दुसऱ्यांना सहकार्य करा.

दुसऱ्यांना मदत केल्यामुळे आपल्यातल्या नकारात्मकतेचा विसर पडतो. त्यासोबत आपल्याला स्वतःमधील कौशल्य/कार्यक्षमता किती आहे ते कळते. आपल्यातील अपयश तसेच नकारात्मकता याच्याकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा दुसऱ्यांना शिकवणे, कामामध्ये सहकार्य करणे यामुळे आपल्यातला आत्मविश्वास आपोआपच वाढतो.

७) स्वतःची काळजी घ्या.

स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वार्थीपणा असं नसते.
आत्मविश्वास शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक स्वास्थ्य हे सर्व एकत्रित होऊन तयार होत असतो. आपण आपली शारीरिक ठेवण योग्य ठेवत नाही हे ऐकायला खूप कठीण जाते. उत्तम असा शारीरिक व्यायाम, मेडिटेशन (मानसिक व्यायाम), त्याचबरोबर जेवणाच्या सवयी, झोपण्याची वेळ योग्य ठरवणे यासाठी आपणच आपल्याला वेळ दिला पाहिजे. चांगलं ड्रेसिंग असलं की आपल्या व्यक्तिमत्त्वात भर पडते. त्यामुळे जे आपल्याला आवडते ड्रेसिंग सुद्धा आपण केलं पाहिजे. या सर्वांमुळे आपल्यातला आत्मविश्वास वाढतो.

८) स्वतःच्या सीमा आखा.

कधीच गुलाम होऊ नका. स्वतःचा बळी देण्याचा कधीच स्वीकार करू नका. दुसर्‍यांकडून आपण कोण आहोत याची ओळख करून घेण्यापेक्षा आपणच आपली ओळख निर्माण करणं केव्हाही उत्तम.
नकार द्यायला शिकायचं. दुसऱ्यांना आपल्या व्यक्तिगत सीमांचा आदर करायला शिकवायचं, जास्तीत जास्त खंबीरपणे बोलायचं तसेच आपल्याला काय आवडते.. काय आवडत नाही हे ठामपणे बोलायला शिकायचं.आपल्या आयुष्याचा ताबा पूर्णपणे आपल्याकडे असायला पाहिजे यातून आपला आत्मविश्वास टिकून राहतो.

९) मनोवृत्ती समानतेकडे वळवा.

ज्यांच्यामुळे कमी आत्मविश्वास असतो ते नेहमीच दुसऱ्यांना आपल्यापेक्षा जास्त कार्यक्षम समजतात. ही समस्या घेऊन पुढे जाण्यापेक्षा स्वतःला दुसऱ्या सारखेच समजा. आपल्यापेक्षा जास्त कार्यक्षम आणि योग्यतेच कोणी नाही हे कधीच विसरू नका. आपली मनोवृत्ती ही समानतेकडे वळवा.

१०) नव्याने शिकत रहा.

कोणतीच व्यक्ती ही जन्मताच हुशार नसते. आपल्यातले प्रयत्न आपल्याला यशाच्या वाटेकडे नेत असतात. कोणतीही गोष्ट करताना, नवीन प्रयोग करताना सुरुवातीला ते प्रत्येकालाच अनोळखी असतात. एकदा त्याची सवय झाली की प्रत्येक व्यक्ती त्या क्षेत्रात उत्तम घडते. ह्यामुळे कधीच प्रयत्न सोडायचे नाहीत. प्रत्येक एक गोष्ट नव्याने शिकत राहायची. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळत असते आणि स्वतःवर विश्वास सुद्धा निर्माण होतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

6 thoughts on “आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स!!”

  1. अप्रतिम लेख, एवढाच म्हणेन कारण आपण खूप गोष्टी वाचन करत असतो पण त्यातील किती गोष्टी आत्मसात करतो याचा विचार करत नाही आपल्या आयुष्याला एक कलाटणी देण्यासाठी हा एकाच लेख खूप काही देऊन जातो खूपच छान…. प्रत्येकाने आपल्या जीवनात ह्या गोष्टी आणल्या तर नक्कीच आपल्यात वाढेल यात शंका नाही..

  2. खूपच मस्त …सध्या धावपळीच्या जीवनात खूप कॉम्पिटेशन आहे त्यामुळे कॉन्फिडन्स कधी कधी लुझ होतो.ह्या लेखातल्या 10 टिप्स खूप प्रेरणादायी आहेत

  3. Aniruddha Patil

    Khupach interesting ani practical lihilaye,mazya mulala vachun dakhawala…he said he got inspired….. Keep it up

  4. Khupch apratim ani mahiti purna lekh. Sopya shabdat khup mothi गोष्ट samjavlit

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!