Skip to content

चला आज आपण आपल्या दुःखाचं दुःख समजून घेऊया…

दु:ख बाजूला ठेवाल?


अनघा हिरे


दुःख काय असते ? दुःखी राहणे काय असते? वारंवार त्याच दुःखात राहून कदाचित आपण समोर आलेल्या आनंदाचा आस्वादही घेऊ शकत नाही . आणि तो आनंद आपल्या पाशी येऊन आपली वाट बघून निघूनही गेलेला असतो . दुःख हे तिहेरी आहे.

एक इमॅजिनेशन, दुसरे दृष्टीसामोरील आणि तिसरे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालेले …

आता याचे उदाहरण बघायचे झाले तर, आपल्या लाडक्या व्यक्तीला आपण सांगत असतो कि समोर जाऊ नकोस समोर खड्डा आहे त्या खड्यात तू पडू शकतोस …आणि त्या खड्यात पडल्यावर तुला फार इजा होतील तुला फार वेदना होतील …ती व्यक्ती त्या खड्यापर्यंत गेलेली नसते पण आपण तिला होणारे दुःख इमॅजिन करत असतो. वास्तविक पाहता ती गोष्ट घडलेली नसते पण आपल्याला नुसत्या कल्पनेने दु:ख होते.

का असे होते जी गोष्ट घडलेलीही नाही तिच्या संबधी विचार करून आपण काल्पनिक दुःखात का अडकतो ?

आपला स्वभाव हा असाच आहे.विनाकारण कोणत्याही गोष्टीची अती काळजी करण्याची सवय असणार्‍या व्यक्तींना ह्या दुःखाला सामोरे जावे लागते. हे काल्पनिक दु:ख मनुष्य स्वतःहून ओढवून घेत असतो.

दुसरे दु:ख दृष्टीसामोरील दुखः ती व्यक्ती आपला सल्ला झिडकारून पुढे जाते… आपले ऐकत नाही म्हणून आपल्याला दुखः होते नंतर ती व्यक्ती आपल्या समोर जर खड्यात पडली तर ते आपल्या दृष्टीसमोरील दु:ख ते सहन करणे फार त्रासदायक असते. ह्या दुःखाच्या वेदनाही असह्य असतात. खड्यात पडल्यानंतर त्या व्यक्तीला होणारा त्रास आपण आपल्या डोळ्यांनी बघतो आणि त्या क्षणाला त्या व्यक्तीला होणारा त्रास ,वेदना ह्या आपल्यालाही त्रासदायक होतात कारण ती आपलीच व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला होणारा प्रत्येक त्रास हा आपल्यालापण तितक्याच तीव्रतेने होत असतो. हे प्रत्यक्ष अनुभवलेले दु:ख आपल्याला अधिकच दुःखी करत असते.

सर्वात अवघड असते ते प्रत्यक्षात अनुभवायला आलेले दु:ख. कधी आपण आनंदी असतो कधी आपण दुःखी असतो .आपण आनंदी असतो तेव्हा हे दु:ख नेमके कुठे जाते? कुठे पळून गेलेले असते का? तर नाही ते कुठेच गेलेले नसते. ते फक्त थोडावेळ लपून बसलेले असते. थोडावेळ विश्रांती घ्यायला गेलेले असते. जेव्हा दु:ख परत येते तेव्हा ते आपल्याला डोंगरा एव्हडे उंच भासते. असं वाटत हे दु:ख कधी संपणारच नाही, हे तर एव्हडे मोठे आहे . पण काळ हे सर्व गोष्टींवर चांगले औषध आहे.

जसजसा काळ ओसरतो तसतसे दु:खाची तीव्रताही कमी होते. फक्त तीव्रता कमी होते ..ते परत मनात डोकवायला येतेच .

दुखः येते आणि आपल्याला नेस्तनाबूत करून निघून जाते. दु:खाकडे तटस्थपणे बघितले पाहिजे. पण काही वेळा नंतरच आपण त्या दुःखाला तटस्थपणे पाहू शकतो. दु:ख संपल्यानंतर त्या दुःखाचे विश्लेषण केले पाहिजे आणि हे आपल्याला जमलेच पाहिजे…

म्हणजे आलेले दुःख हे दुःखच आहे त्याची कमी जास्त अशी तीव्रता असूच शकत नाही.परंतु ह्या दुःखाने आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांवर अन्याय तर करत नाही ना? त्याच्या मार्गात अडचण तर निर्माण करत नाही ना? आपल्या दुःखामुळे आपण समोरच्याच्या मानसिकतेवर हल्ला करत नाहीये ना? किंवा कुणाच्या पंखातील बळ तर नष्ट करत नाही ना?

ह्या आणि त्या प्रकारे आपल्याला दुःखाचे विश्लेषण करता आले पाहिजे.

सहज आठवला म्हणून एक जोक ————-

एकदा एका जोकराने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले…परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोक कमी हसले ….
परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..
त्याने वारंवार तोच जोक सांगितला, लोक हसेनासे झाले…

आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि “जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात ”

हेच एकमेव उत्तर आहे आपल्या दुःखी होण्याच्या सवयीवर..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

1 thought on “चला आज आपण आपल्या दुःखाचं दुःख समजून घेऊया…”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!