Skip to content

मनातल्या गैरसमजुतीची दोर कापून टाका, मग बघा कशी प्रगती होते..

यशस्वी जीवनाचे रहस्य …


आनंद ठाकरे

(पुणे)


तुमच्या मनातील गैर समजुतीचे दोर कापून टाका आणि मग तुमची प्रगती बघा.

आम्हाला लहानपणी शाळेत व समाजात एक गोष्ट शिकवली गेली ती म्हणजे ” मेहनत केल्याने फळ मिळत ” आणि आम्ही सुध्दा ह्या वाक्यावर विश्वास ठेवून आयुष्यभर फक्त मेहनत करीत गेलो, परंतु हवं तसं काही फळ मिळालं नाही … आजही असंख्य लोकांचा ह्या वाक्यावर प्रचंड विश्वास आहे, आणि ते खरंही आहे, परंतु सत्य या पेक्षा काही वेगळे आहे …

हे समजून घेण्यासाठी आचार्य रजनीश ह्याच्या पुस्तकात एक एक गोष्ट बघू या … दोन मित्र असतात, त्यांना कुणीतरी सांगितलेलं असत की ” मेहनत केल्याने फळ मिळत ” आणि ह्या वाक्याने प्रेरित होऊन हे दोन मित्रा नदीच्या काठी उभ्या असलेल्या एका नावेत बसतात, मनाशी ठरवतात की खूप मेहनत करायची म्हणजे आपल्यालाही चांगलं फळ मिळेल, संध्याकाळ ची वेळ असते, सर्वत्र अंधार असतो, ही दोघेही नाव व्हलवण्यास सुरवात करतात, अस करता करता रात्र होते तरी सुध्दा ही दोघे नाव व्हलवत असतात, खूप घाम येतो परंतु तरीही त्याच्या मनात एकच वाक्य घुटमळत असत की मेहनत केल्याने फळ मिळत …

शेवटी अस करता करता रात्रं संपते, दिवस उजडतो आणि ह्यांना वाटत की आपण रात्रभर नावं व्हलवली, खूप मेहनत केली आता आपली नावं नदीच्या पलीकडे दुसऱ्या जागी पोहचली असणार … परंतु बघतात तर काय ? नावं आपल्या जगाची अजिबात हललेली नसते, दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघतात, मनात विचार करतात की अस कस झालं ? नावं पुढे का गेली नाही ? मग त्यांच्या लक्षात येत की नावं व्हलवण्यापूर्वी ही नावं ज्या दोराने बांधून ठेवली होती, तो दोर अगोदर सोडवायचा होता, दोर न सोडल्यामुळे रात्रभर मेहनत करून सुध्दा नावं जागची हलली नाही …

असेच दोर आपल्या मनात सुध्दा असतात, जो पर्यंत हे गैरसंजुतीचे दोर कापून टाकत नाहीत, तो पर्यंत तुमच्या प्रगतीची नावं सुध्दा जागची हलणार नाही … म्हणजेच मेहनत केल्याने फळ मिळत नाही, तर योग्य गोष्टीवर, योग्यवेळी मेहनत केल्यानेच फळ मिळत, सरळमार्गी कुठल्याही अनावश्यक गोष्टी वर मेहनत करून फळ मिळत नसत …

*** आयुष्यात प्रगती करीत नेमके कुठले दोर कापावेत ***
उदाहरणार्थ तुम्हाला कुठलातरी व्यवसाय करावयाचा आहे त्या करीता आपण भांडवल सुध्दा आणू शकता परंतु दुसऱ्याच। क्षणी मनात विचार येणार की हा व्यवसाय नाही चालला तर ? माझं भांडवल अडकून पडलं तर ? हा व्यवसाय काणे हे आपलं काम नाही तर हा व्यवसाय फक्त ह्या समाजानेच करावा इत्यादी विचार मनात येणार आणि आपण व्यवसायाचा विचारच सोडून देणार … एखाद उच्च शिक्षण घ्यावयाचे असल्यास प्रथम मनात विचार येणार … एवढं शिक्षण मला झेपणार का ? त्या करिता माणूस मुळातच हुशार हवा, शिक्षणाला खूप पैसा लागतो मला ते जमणारच नाही, हे शिकण्यासाठी इंग्रजी चांगल हवं, माझी बुद्धिमत्ता एवढी चांगली नाही इत्यादी कारण मनात येतील व आपला शिक्षणाचा बेत यशस्वी होणार नाही … तर अशाच प्रकारच्या गैरसमजुतीचे दोर हे प्रत्येकाच्या मनात असतात, प्रथम ते दोर कापून टाकावेत व नंतर आपला मार्ग ठरवावा …

*** या जगात बहुतांश लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत ते 99% हे मानसिक आहेत ***
आणि यावर उपाय आहे फक्त आवश्यकता आहे ती मानसिकता बदलण्याची बस …. यश मिळवायचं असल्यास प्रथम आपली मानसिकता बदलायला हवी, आणि मानसिकता बदलायची असल्यास आपलं अपयश प्रामाणिकपणे मान्य करायाला हवे, ही तयारी बहुतेकांची नसते कारण नेहमीच आपण आपल्या अपयशाच खापर दुसऱ्यावर फोडतो, तर अस न करता आपल्या अपयशाची जबाबदारी स्वतः वर घ्या, मग तुमची मानसिकता बदलेल, आणि एकदा का मानसिकता बदलली की तुमची विचारांची यंत्रणा वेगळ्या दिशेने आपलं यश शोधायला लागते …

*** तुमची प्रबळ इच्छा शक्ती हीच तुमची गुरू ***
वास्तविकता काहीही असू देत, सत्य काहीही असो परंतु तुमच्या प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर सुध्दा यश मिळवता येतं …
तुमच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग असो, तुमची परिस्थिती तुमच्या इच्छा पूर्ण करण्या करिता समर्थ ही नसेल, पण तुमचा तुमच्या कर्तृत्वावर, कर्मावर, विचारांवर पूर्ण आत्मविश्वास असावयास पाहिजे तर नियती सुध्दा एक पाऊल मागे घेत तुमच्या ईच्छा पूर्ण करते ज्याला लोक गुडलक, दैवी चमत्कार, देव पावला वगैरे समजतात… पण हे सगळं सोपं नसतं म्हणूनच दहा पैकी नऊ लोक परिस्थिती पुढे नतमस्तक होतात व फक्त एकच व्यक्ती आपलं ध्येय साध्य करू शकतो …

*** मग परिस्थिती च्या विरुध्द वागणे योग्य आहे का ? असे वागल्याने लोक हेकेखोर म्हणतील ***
होय ! आहे मी हेकेखोर …कशा करीता तर आजची परिस्थिती बद्दलण्याकरीता.. मला ह्या करिता कुणी एकलकोंडा, हेकेखोर, विचित्र स्वभावाचा, म्हटलं तरी चालेल कारण मला माझं ध्येय स्पष्ट दिसतंय … सर्वसाधारण व्यक्तीला जीवनात यश सहज मिळालं, (काही व्यक्ती अपवाद असतात) तर अशा व्यक्ती शांत स्वभावाच्या व भाग्यवान असतात. परंतु जेव्हा यश खूप झगडून मिळणार असत, खूप स्ट्रगल करून मिळत असत तेव्हा बरेचदा ती व्यक्ती समाजात हेकेखोर व विचीत्र स्वभावाची समजल्या जाते, पण ह्या व्यक्तीचा हाच विचित्र स्वभाव एक दिवस ह्या व्यक्तीला यशाच्या शिखरावर विराजमान करत …

*** नियतीने तुमच्या ताटात काय वाढून ठेवले ते ओळखा ***
आपल्या अपेक्षेचे मूल्यमापन करण्या अगोदर नियतीने तुमच्या ताटात काय वाढून ठवले ते बघा, ते जर तुमच्या पात्रतेत बसणार असल्यास तसेच त्यात तुम्ही समाधानी असाल तर … काहीच प्रश्न नाही कारण नियतीने तुम्हाला आवश्यकते पेक्षा ही जास्त दिल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नव्हती, जे काही तुमच्याकडे आज आहे ते जर तुमच्या पात्रते पेक्षा जास्त असेल तर त्या नियतीचे म्हणजेच परमेश्वराचे आभार माना, आनंदी व समाधानी जीवन जगा …

परंतु नियतीने तुमच्या ताटात जे वाढले आहे ते तूमच्या पात्रते पेक्षा खूपच कमी असेल तर त्या नियतीस आव्हान द्या … नियतीशी बंड करा, तिला चॅलेंज करा, आपली पात्रता सिद्ध करा, अस केल्या नंतर मात्र जो काही त्रास होईल तो उपभोगायची तयारी ठेवा कारण तुम्ही साक्षात नियतीला आव्हान देत आहात हे लक्षात ठेवा, आपल्या प्रबळ इच्छाशक्तीला आपला गुरू बनवा व आपणास जे काही हवे ते ह्या नियती कडून हिसकावून घ्या … बरेच जण जे आयुष्यात अजुनही पूर्णतः यशस्वी नाहीत ते अशीच आपली लढाई नियती सोबत सतत सुरू ठेवतात व शेवटी नियती सुध्दा कंटाळून ह्या लोकांना एक दिवस भरपूर यश देते …

हेच जीवनाचं रहस्य आहे …


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

2 thoughts on “मनातल्या गैरसमजुतीची दोर कापून टाका, मग बघा कशी प्रगती होते..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!