Skip to content

अशी समजूतदार सासू सर्वांना मिळो…

अशी समजूतदार सासू सर्वांना मिळो


आयुष्य … एकदाच जगायचं पण मनसोक्त …..

हॉल मध्ये मुलगा आणि आई खूप दिवसांनी मस्त गप्पा मारत बसलेले असतात. इथे सुनेची तडफड होत असते. मी आणि माझा नवरा जेव्हा गप्पा मारत असतो तेव्हा ही बाई लगेच अरे , सुश्या , जर इकडे ये रे म्हणून लगेच हाक मारून ह्यांना बोलवून घेते.
आणि आमचं हे लगेच आलो आलो करत जात बाहेर
तिला ही आम्ही बोलायला लागलो कि च बरी काम आठवतात आणि हा ही लगेच येतो जरा थाम्ब वगैरे काही नाही , निघाला लगेच
खडूस बाई ,

आज त्याला ही सुट्टी होती .मस्त तिच्या डोक्यात प्लॅन शिजत होते .खूप दिवसांनी नवरा तावडीत सापडला होता.
पण कसचं काय
कुठून आमचं बोलणं ऐकते ही बाई काय माहिती
आमच्या आधीच हिच प्लॅन ठरवून मोकळी झालेली असते . आणि तेच सांगायला बोलवलं असेल लेकाला अगदी गोड आवाजात हाक मारून

आज तिनेही ठरवलं होतं त्यांचे प्लॅन success होऊ द्यायचा नाही आणि आपण जे ठरवलंय तेच करायचं

त्या आनंदात ती त्याला ही तशीच गोड आवाजात हाक मारते , सुशील sssss

तो ही , थाम्ब ग आलो जरा आईची काही काम आहेत ते ऐकून येतो
हिची इकडे धुसपुस होत होती नुसती , आताच काय अडलीत का ह्यांची काम , अशी काय फार महत्वाची आहेत .

परत ती हाक मारते आता थोडा सूर बदलतो
त्याला ही समजत आता उठावच लागेल नाहीतर दिवसभर ऐकून घेत बसावं लागेल ,

तो आईला हो हो सगळं करतो , थाम्ब जरा ती काय म्हणते जरा बघून येतो . असा म्हणून तिथून सटकतो.

हम्म , बोला राणी , सरकार काय म्हणताय !
ती तिचा प्लॅन सांगते दिवसभर काय काय आणि कुठं जायचं ते.
पण त्याच पुन्हा अ ग आई म्हणते , वसु मावशी कडे तिला जायचंय , आपण सगळेच तिकडे जाऊ म्हणत होती.
मी कुठे ही येणार नाही आज तू आणि मी फक्त दिवसभर बाहेर जायचं मस्त जेवू , picture बघू आणि मला थोडी शॉपिंग पण करायची आहे . मी ठरवलंय ह्यात आता बदल नाही

अ ग पण…
पण नाही नी बिन नाही आईना हवं असेल तर जाताना मावशी कडे सोडू आणि आपण जाऊ . तेव्हडे करू शकतो. थाम्ब म्हणावं दिवसभर तिकडे आपण येताना घेऊन येऊ त्यांना. सांग जाऊन त्यांना आमचं अस ठरलंय म्हणून.
तू जाऊन सांग की
का तुझी आई आहे न तू सांग की

सांगतो ग बाई पण ती काय बोलते ते आधी बघतो . तस ही तुम्हा बायकात माझं sandwitch च होतंय.
हो हो माहिती ह जा आता
तू जा आधी बाहेर बोल त्यांना मी आलेच बाहेर.

आई मी काय म्हणतो ,
बोल न सुश्या
आज मला कधी नव्हे ते सुट्टी मिळाली , विनी ने पण प्लॅन केला होता कुठे तरी बाहेर जाऊ म्हणून .
बर मग ,
एक काम करतो आम्ही तुला मावशी कडे सोडतो आणि आम्ही जरा दिवसभर बाहेर फिरून येतो आणि संध्याकाळी तुला परत घ्यायला येतो. चालेल का ?

अरे इतकंच न , मग त्यात काय एव्हडे आढे वेढे घायचे . ठीक आहे न तुम्ही या फिरून मी थांबते तिच्या कडे.
आतून विनी ऐकत होती , तीच काम फत्ते झालं होतं.
मनातल्या मनात (किती चांगल्या आहेत आई )

मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या तिला तशी खुश होऊन ती बाहेर आली .
आई बद्दल चा थोडा गैरसमज दूर झाल्यामुळे आता तिला वाटलं उगाच आपण चुकीचं समजत होतो त्यांना.
किती समजून घेतात आपल्याला .

बाहेर येऊन ती बोलणारच आईना तेव्हड्यात आई पण बॉम्ब टाकतात , दोघंच जाताय ?

दोघं ही एकाच सुरात hoooooo
त्यांना वाटलं अजून आई काहीतरी बोलणार असेल
(मी 2 दिवस वसु कडेच रहाते वगैरे )

पण ओम फस
मग मी काय म्हणते , मी तरी तिकडे जाऊन काय करणार आणि किती वेळ बोलणार त्या दोघानशी.
त्यांच्या कडे फार वेळेची बंधन असतात. जेवण इतके वाजता , चहा इतके वाजता .मग त्यांचं बाहेर फिरायला जाणं , त्यांचा तो दोघांचा जेष्ठ नागरिक क्लब . मी काय करू मग तिकडे ?

मग आता इकडे दोघांनाही वाटलं आपला प्लॅन चौपट होणार
ही आता आपल्या सोबत येणार , आपल्याला प्लॅन प्रमाणे काही करता येणार नाही.
दोघे ही एकमेकांकडे बघायला लागले
काय ग आई आता तर तिच्या कडे जायला हो म्हणाली होतीस आता का कारण

विनी म्हणाली बर , पण आई मी काय म्हणते

अ ग तू कशाला काय म्हणते , मी काय सांगते ते ऐका
दोघांच्याही भुवया उंचावल्या
अरे असे काय बघताय , मी काय म्हणते ते एक तरी

आपण तिघे मॉल ला जाऊ , तुम्ही मला picture च तिकीट काढून द्या , picture संपला की मी सगळं सामान खरेदी करते घरातल्या ही बऱ्याच वस्तू संपल्यात ,आणि थोडी फार माझी शॉपिंग करते .तोपर्यंत तुम्ही या फिरून माझाही वेळ जाईल तेव्हढाच .
मग आपण विनी साठी शॉपिंग करू तिचा birthday आहे न पुढच्या आठवड्यात परत तुम्हाला ही वेळ मिळत नाही बाहेर जायला .

सगळं झालं की माझ्या कडून आज तुम्हाला दोघांना ट्रीट देईन

खूप दिवसांनी बाबा गेल्या नंतर असा मला बाहेर जावंसं वाटत होतं रे . म्हटलं तुमच्या मूळे तरी निघता येईल

हे ऐकून दोघेही खूप इमोशनल झाले .
दोघांना ही वाटलं हे आपल्या लक्षातच आलं नाही कधी.
एखादी व्यक्ती आयुष्यातून गेली तरी मागे राहणाऱ्या व्यक्तीला ही मन असतं , त्याला ही अजून मनाप्रमाणे जगावस वाटत असतं हे विसरलोच होतो .

विनी तर आईच्या गळ्यात च पडली तिला ही खूप जाणवलं आपण चुकत होतो , आपण आपलाच फक्त विचार करत होतो .
ती ही उत्साहाने म्हणाली चालेल आई असाच करू आपण हो न सुशील .
सुशील ही खूप भावूक झाला होता , त्याला काय बोलावं समजेना.
वातावरण खूप भावुक होतंय हे पाहून ,

मग आईच म्हणाली चल चल लवकर तिकीट काढा picture च सुरू होईल वेळ होऊन गेली . मधुरीचा picture आहे , starting चुकवायची नाही मला

हो ग आई काढतोय , ह घे अस म्हणून त्याने तिकीट काढून दिला आणि सांगितलं 4 स्क्रीन ला आहे ग नीट जा आम्ही येतोच ,6 वाजेपर्यंत तुझं picture सुटला की एक कॉल कर आम्ही निघतो लगेच .

आज आईच हे वागण सुशील ला पण नवीन होत . 6 महिने आई घरातून बाहेर पडली नव्हती अशी कुठे , पण आज त्यालाही खूप बरं वाटलं आपली आधीची आई परत आली होती
हो हो असा म्हणून आई आत येऊन बसल्या.
मनात असंख्य विचार , आठवणी , डोळ्यात पाणी , शेवटच picture कधी बघितला होता अहो न सोबत , शेवटचं बाहेर कधी जेवलो होतो सगळे मिळून. सगळं मागचं आठवलं होत तेव्हढ्या मिनिटात.
पण आता त्यांनी ही ठरवलं आपण ही आपल्याला हवं तसं जगून घायच , परत कोणती ही इच्छा राहीली अस नको वाटायला जाताना .मनाशीच ठरवुन हसत होत्या .

तेव्हड्यात मधुरीची पडद्यावर एन्ट्री झाली आणि भूत काळातून बाहेर येऊन माधुरीला पाहून अजून ही किती छान mantain केलाय स्वतःला अस म्हणून मनातच
माधुरीचा च डायलॉग तिला मारला perfect

?….??


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!