
पालक, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आणि सृजनात्मकता
मी पालक विद्यार्थी आणि सृजनात्मकता या प्रकरणात तुम्हाला अमेरिकेतील उद्योगपतींची गोष्ट सांगितली आहे. त्यांनी ‘कोण बनेगा करोडपती’ मध्ये विजेता झालेल्या युवकाला स्वतःच्या कंपनीमध्ये जॉब द्यायला नाकारले होते. कारण तो युवक पोपटपंची होता. पाठांतरावर भर देणारा होता, रट्टा मारणारा होता. फक्त ज्ञानाला महत्व देणारा होता. उद्योगपतीला ज्ञान अर्जित करून ज्ञानाला महत्व देणारा युवक हवा होताच पण त्याच बरोबर त्या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग करू शकणारा, या ज्ञानापासून नव्या ज्ञानाची निर्मिती करणारा, संशोधन करणारा म्हणजे सृजनात्मक युवक हवा होता. असा युवक त्यांच्या कंपनी मध्ये जॉब मागायला आले असता उद्योगपती या युवकाला पाच लाख रुपये महिना पगार द्यायला तयार होता.
मला वाटते उद्योगपतींचे हे उदाहरण इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे. आजच्या घडीचा विचार झाल्यास अजूनही पालकांचे व विद्यार्थ्यांचा कल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्याकडे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करीत आहेत.
दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास १३ लाख विद्यार्थी इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करीत आहेत. यातील किती विद्यार्थ्यांना जॉब मिळत आहे. याचा विचार करायचे झाल्यास फारच कमी विद्यार्थ्यांना जॉब मिळत आहे. टक्केवारी नुसार सांगायचे झाल्यास दरवर्षी १००% पास होण्याऱ्या विद्यार्थ्यांपैकी १०% टक्के विद्यार्थ्यांना जॉब मिळत आहे. त्यातील १% ते २% विद्यार्थ्यांना मोठे पॅकेज मिळत आहे. २% ते ३% विद्यार्थ्यांना मध्यम पॅकेज मिळत आहे आणि ६% ते ७% विद्यार्थ्यांना महिना १० ते २० मिळत आहे. उरलेले ९०% इंजिनिअर विद्यार्थी नोकरी मिळावी म्हणून कंपनी टू कंपनी भटकत आहे.
दरवर्षाला हा आकडा वाढत आहे. यामधून इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती किती गंभीर आहे हे आपल्याला दिसून येत आहे.
असे का होत आहे हे प्रत्येक इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. १% ते २% इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोठा पॅकेज का मिळत आहे याचा अभ्यास केले असता असे दिसून आले कि हे विद्यार्थी पाठांतर करून ज्ञान अर्जित करणारे आहेतच. याच बरोबर हे विद्यार्थी सृजनात्मक आहेत. २% ते ३% विद्यार्थी माध्यम पॅकेज मिळवीत आहेत कारण ते पाठांतर ज्ञान अर्जित करणारे व थोड्या प्रमाणात सृजनात्मक विद्यार्थी आहेत. ६% ते ७% विद्यार्थी १० ते २० हजार रुपये महिना कमविणारे आहेत कारण ते पाठांतर करणारे आणि ज्ञान अर्जित करणारे आहेत.
उरलेले ९०% विद्यार्थ्यांना जॉब न मिळण्याचे अनेक कारण आहेत पण यातील एक महत्त्वाचे कारण विद्यार्थी परीक्षार्थी आहेत हे आहे. शिक्षणाबाबत गंभीर नाहीत.पास होण्यापुरते मर्यादितआहे. यावरून तुमच्या लक्षात आले असेलच कि कोणतीही कंपनी इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना जॉब द्यायचे असेल तर प्रथम सृजनात्मक विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देतात.
काही दिवसापूर्वी मी एक मॅगझीन वाचले. त्या मॅगझीन मध्ये मला एक स्टेटमेंट वाचायला मिळाले होते. इंडस्ट्रीज क्षेत्रातील एक तज्ञ व्यक्ती म्हणाले होते कि अजूनही आम्हाला कंपनीसाठी प्रशिक्षित इंजिनिअर हवे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यांचे हे स्टेटमेंट खरे आहे किंवा खोटे आहे यामध्ये मला जायचे नाही. पण समजा हे खरे असेल तर इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे.
मी असे बघितले आहे कि जेव्हा आर्थिक मंदी येत असते, तेव्हा जे इंजिनिअर फक्त ज्ञानापुरते सीमित आहेत त्यांचा बळी जात असतो. जे इंजिनिअर सृजनात्मक आहेत त्यांच्यावर या आर्थिक मंदीचा कोणताच परिणाम जाणवत नसतो.
ते नवे नवे प्लानिंग करून पुन्हा कंपनीला वैभव प्राप्त करून देत असतात. नफा मिळवून देत असतात. म्हणून मला इंजिनिअरिंग चे शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना हे सांगायचे आहे कि तुम्हाला कंपनीत मोठ्या पॅकेज चा जॉब मिळत नसेल किंवा तुम्ही जॉब मिळविण्यासाठी भटकत आहात तर प्रथम तुम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करा.
बघा कि तुम्ही परीक्षार्थी विद्यार्थी होते का ? याचे उत्तर हो येत असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या क्षेत्रातील ज्ञान व्यवस्थित रित्या समजून घ्या. त्यामध्ये प्रशिक्षित व्हा एक्स्पर्ट बना. कौशल्य विकसित करा. आणि सगळ्यात महत्वाचे ‘सृजनात्मकतेचा विकास स्वतःमध्ये घडवून आणा. जे इंजिनिअरिंग चे शिक्षण घेत आहेत. त्यांनी सुद्धा या गोष्टी लक्षात घ्या. मग बघा तुमची कोणतीही ब्रांच असू द्या. तुमच्या ब्रांचला आर्थिक मंदी असेल तरी तुम्ही मोठे पॅकेज मिळविण्यात यशस्वी व्हाल. सृजनात्मक विद्यार्थ्याला संपूर्ण जगातून मागणी होत असते. त्यामुळे जगात कुठेही जॉब मिळविण्यास सक्षम व्हाल.
मग आता ठरवून घ्या या नंतर परीक्षार्थी बनायचे नाही, सृजनात्मक विद्यार्थी बनायचे.
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
क्लिक करून सामील व्हा!
??


उत्तम