Skip to content

सहज एक नजर फिरवली, लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत.

“सकारात्मक विचारांचे सामर्थ्य”


आपले संपूर्ण आयुष्य आपण कसा विचार करतो यावर अवलंबुन आहे.

मनात दररोज (२४ तासांत) ६०हजार विचार येतात. यातील ६० ते ७० % विचार हे नकारात्मक असतात. दर १५ ते २० सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्याहतपणे चालू असतं.

ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्यांच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी, भय यांतून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते.

रेडिओ किंवा वाहिण्या ज्या ब्रॅंड वर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणुन नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे गरजेचे असते.

सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास आणि मनोबल वाढवितात. नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच मनाशी युद्ध करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात, ” रात्रं दिनं आम्हा युद्धाचा प्रसंग!”

थॉमस अल्वा एडिसन ने ९९९ प्रयोग केले, हजाराव्या प्रयोगाच्या वेळी दिवा लागला. थॉमस ला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारले, ९९९ प्रयत्न फसले यावर काय म्हणायचे आहे?
थॉमस यांनी म्हटले ९९९ फसले असे म्हणू नका,
९९९ वेळा मी हे सिद्ध केलंय की या मार्गाने दिवा लागू शकत नाही.( सकारात्मक दृष्टिकोन)

नेपोलियन समुद्र किनाऱ्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरुन छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रद्धाळू सैनिकांना वाटलं आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार. सैनिक भयभीत झाले. नेपोलियन ने ही बाब हेरली. तो उठताना छाती झटकत म्हणाला,” मित्रांनो आजचे युद्ध आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तिथे तिथे विजय आपला होणार, कारण आल्या आल्या या भुमीने मला आलिंगन दिले आहे, मी तुझी आहे…मी तुझी आहे….
आणि सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टिकोनामुळे.

टेबलावर एक ग्लास अर्धा भरलेला आहे. जर असा विचार केला की, अर्धा भरलेला आहे की मन समाधानी होते.
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की नैराश्य, व्याकुळता, हताशपण येत.सकारात्मक दृष्टिकोन मनाला प्रसन्न करून अतीऊर्जा प्रदान करतो, त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो.परिणामी कर्माची गती मंदावते…चुका होतात…हानी होते व यातुनच औदासिन्य (depression) येते.

गौतम बुद्धाजवळ एक शिष्य धापा टाकत आला आणि म्हणाला, ” भगवान, मला गावकऱ्यांनी शिवी दिली.” बुद्ध म्हणाले, ” बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.” तो म्हणाला, “भगवान, नंतर त्यांनी मला मारलं सुद्धा”, बुद्ध म्हणाले, “या मारामुळे तुला काही जखम झाली का?”, शिष्य म्हणाला, ” भगवान, माझं डोकं फुटलं आहे.” बुद्ध म्हणाले, “बरं झालं, तुझा मृत्यु झाला नाही.” हे ऐकून शिष्य शांतपणे बुद्धाच्या चरणाजवळ शांत बसला, बुद्धांना हेच सांगायचे होते की,
‘ जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा.’

मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत, असा विचार मनाची तात्कालिक अस्वस्थता बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करतो.

माजी राष्ट्रपती ‘अब्दुल कलामांना’ नौदलात भरती न होता आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.
काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणुन सकारात्मक विचार करा आणि आनंदी राहा.

कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत.
डोळे उघडून बघा प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरांसारखे पंख आहेत…..?

करोना बाबत सुद्धा हेच करायचे आहे. प्रत्येक व्यक्तिने स्वतः ची सोबत दुसऱ्याची सुद्धा स्वतः सारखी काळजी घेतल्यास आपण करोना पासुन लवकरच सहिसलामत बाहेर पडू.
??????


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

5 thoughts on “सहज एक नजर फिरवली, लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!