Skip to content

काही व्यक्ती किती छान आयुष्य जगतात, मग त्यात मी का नाही??

शोध मनाचा


सौ.सविता दरेकर

(चांदवड, नाशिक)


दैनंदिन जीवनात अनेक चांगले वाईट अनुभवांचे उतार चढाव येत जातात. प्रत्येक प्रसंग काही ना काही शिकवत जातात…सुखदुखाची बेरीज वजाबाकी होत जाते…यात स्वतःच स्वतःच्या मनाचा शोध घेत जावे चुका झाल्यास मोठे मनाने स्वतःसह ईतरांनाही माफ करत चालावे…असे केल्याने मनावर ताणाचे ओझे वाढत नाही …

आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर जे जे दुखवत गेले त्या त्या सगळ्यांना न दुखावता सोडून देणं मानवी मनाला जमायलाच हवं..असे केल्याने मनशांती मिळते नाहीतर मनुष्यातील मीपणाच्या अहंकारी भावनेने सुड,राग ,द्वेष निर्माण होतात व मनशांती हरवते..मानवी स्वभाव न मिळालेल्या सुखाच्या शोधात होरपळत रहातो…

काही वेळेला संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी वाद न घालता तेथून दूर निघून जाण्यातंच वैचारीक मनाची समजदारी असते हे ज्याला समजले तो जिंकलाच समजा स्वतःचे आनंदी विश्व साकारायला…

स्वतःबरोबर घडणाऱ्या चांगल्या वाईट अनेक गोष्टींचे रडगाणे गात त्यात आपला वेळ, उर्जा खर्च करण्यापेक्षा … आजूबाजूला आपल्या जीवनात जे जे उत्तम आहे त्या कडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाळगायला हवा….आनंद शोधायला हवा.

आपल्याला आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांतून बाहेर पडत स्वतःला सावरून…”पुढच्याच ठेच मागचा शहाणा” या म्हणीप्रमाणे ईतरांना आनंद वाटणे जीवनाचा अर्थ समजवणे जमायला हवे…यात भरपूर सुख मिळते..जे पैसे देवूनही विकत घेता येत नाही …

कोणत्याही न पटणार्‍या गोष्टींवर वाद घालण्यापेक्षा काहीही न बोलणे उत्तम पर्याय असतो म्हणजे समोरचा जिंकतो असे नाही ..पण त्याला आपण हरलोय याचा आनंद होतो हे महत्त्वाचे म्हणत त्याला त्याच्या विश्वातच सोडून आपण वैचारीक आनंदात पुढे चालावे..
कधी-कधी काहीही न बोलणं आपल्या ज्ञानाचीही कसोटी असते..प्रसंगानुसार अबोल राहुन योग्य वेळ
खूप काही बोलून जाते आणि सांगूनही जाते..आपण संयम ठेवणे शिकायला हवे…

आपण लोकांच्या तोंडाला हात ठेवू शकत नाही कि त्यांनी काय बोलावे काय बोलु नये… किंवा त्यांच्या विचारांवर बंधन आणू शकत नाही पण आपण स्वतःच्या मनावर मात्र संयम बांधू शकतो…अशा वेळी शांत रहात मनन ,चिंतन करणे उत्तम पर्याय असतो…

आपण काही लोकांचे वागणे बोलणे किती मनावर घ्यायचे त्यांना किती महत्त्व द्यायचं हे सर्वस्वी आपण ठरवले पाहिजे …याचं त्याचं ऐकलेल्या गोष्टी किती डोक्यात साठवून ठेवायच्या आणि स्वतःचे आयुष्यात मनशांती भंग करून घ्यायची का ? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा…

कधीकधी अनेक प्रसंगात शाब्दिक युद्ध करण्यापेक्षा परिस्थितीला आहे तसंच येणाऱ्या वेळेवर सोडून देणं आणि शांत राहणं योग्य शहाणपणाचं लक्षण असतं..
समाजाला कुठल्याही गोष्टींचं स्पष्टीकरण देत बसणं आणि त्यांनी तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःकडे दुःख, निराशा ओढवुन घेण्याचं लक्षण आहे …

खूप वाचनाने ,संवादाने ,वैचारीकतेच्या जोरावर, समाजातील अनेकांचे निरनिराळे दुःखाचा शोध घेतल्याने आपली मनःशांती, समाधान आपण शोधू शकतो… तेंव्हा मन आपोआपच ठरवते की मी अशा लोकांपासून लांब राहावे जे नकारात्मक विचारसरणीचे ,ईर्शा,जलसी प्रवृत्तीचे असतात…चांगली मनाची माणसं जोडावी..,मेहनत,चिकाटी,ध्येप्राप्तीसाठी धडपड करणारी सकारात्मक उर्जा असलेली माणसे सहवासात आणावी…ज्यामुळे मानसिक,आर्थिक सुखाचा विकास होतो…
ज्यांच्या दृष्टीने आपण चांगले नाही त्यांच्या दृष्टीत चांगले होण्याचा त्यांना आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचा खटाटोप करुन आपण आपला वेळ वाया घालवु नये…

नेहमी समाजात, नात्यात,मैत्रीत, कौटुंबिक चौकटीत वादविवाद आणि भावना नसलेले संबंध मनाला मानसिक त्रास देतात .अशा वेळी ती नाती तिथेच काही काळ थांबवत अथवा असह्य झाल्यास कायमची सोडून द्यावी…आणि भुतकाळात न अडकता वर्तमान भविष्याकडे पहात पुढे वाटचाल करत चालावे…जीवन सुंदर अनमोल आहे ते आनंदाने जगावे…जे सोबत असतील त्यांना आनंद वाटत जावे ..जे सोबत नसतील त्यांना सुखी ठेव देवा म्हणत पुढे चालावे…

कधीकधी समाजातील तोंडावर गोड बोलून मागे वाईट वागणार्‍या काही लोकांना नेहमीच दूरुन डोंगर साजरे करत तेवढ्यापुरतेच संवाद असावे…मनाने दूर रहावे नाहीतर हळव्या लोकांची मानसिकता ढासळते अशा लोकांच्या सहवासात राहील्याने…मनाने वरवर बोलणारे लोकांना वेळीच ओळखावे त्यांच्यात गुंतत जावु नये…आनंदी जगण्याचे सुंदर रहस्य आहे हे…

आपल्या स्वतःच्या आनंदाचा ठेवा आपणच शोधायला हवा..आयुष्यातील कुठल्याही वळणावर कितीही उशीर झाला तरीही हे सुखदुखाचे अनुभवच मानवी मनाला समाधानाच्या वाटेवर आनंदाच्या जगात अंतिम सुखाचा खजिना सापडल्याच्या विश्वात घेवुन जातात …..

जन्माला येताना एकटे येतो मरताना एकटे जातो मग जगतानाच का सोबत हवी म्हणून झटत रहातो मणुष्यप्राणी…हृदयभाव हा एकच आनमोल खजिना मिळालाय मानवाला जो प्रत्येक मनुष्यात आहे ..पण तो घडतो वावरतो तसा बनतो आणि आजचा समाज बनतो…निरनिराळ्या स्वभावांचा…?
यात कुणी भरकटतो कुणी सावरतो कुणी ईतरांना सावरतो,कुणी आनंदी तर कुणी दुःखी ,कुणी चोर तर कुणी खूणी…कुणी मायाळु तर कुणी अहंकारी रागीट?

किती प्रकार तुझे मानवी मना ….!

पण शेवटी जाणार तर प्रत्येक जण एकाच ठिकाणी सरणावरच..त्या ज्वालामागे उरतात त्या माणसाच्या चांगल्या वाईट कर्माच्या आठवणी कधी अनेक हृदयात प्रेमळ साठवणी!

म्हणूनच एकदा का मानवी मनाला हा वैचारीक दृष्टीकोनाचा सुखाचा खजिना सापडला आणि त्याला स्वतःच्याच मनावर राज्य करता आले की त्याचा आनंद आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यत सोबत करतो..आणि अशा आनंदी मानसांच्या सहवासात प्रत्येकजण रहाण्याची धडपड करतो…कारण हाच मानवी जन्माचा सुखाचा शोध असतो….!!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

4 thoughts on “काही व्यक्ती किती छान आयुष्य जगतात, मग त्यात मी का नाही??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!