Skip to content

‘Positive Thinking’ हा फक्त एक भोंदूपणा आहे!

‘Positive Thinking’ हा फक्त एक भोंदूपणा आहे!


विनय भालेराव


पॉझिटिव्ह थिंकिंग हा एक नवा भोंदूपणा आहे.

पॉझिटिव्ह थिंकिंग करायला डोकं लागत नाही.

तुम्ही कुठलीही शंका न काढता माझ्या बरळण्यावर विश्वास ठेवा, हे लोकांच्या गळी उतरविण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंगचं फॅड काढलं आहे.

निगेटिव्ह थिंकिंग करायला डोकं लागतं.

निगेटिव्ह थिंकिंग कसं करायचं हे एक शास्त्र आहे.

सर्व उच्च शैक्षणिक कोर्सेसमध्ये निगेटिव्ह थिंकिंग कसं करावं, हेच शिकविले जाते.

व्यवहारात समोरचा आपल्याला फसवणारच नाही, असा पॉझिटिव्ह विचार केला तर वकिलांची गरजच पडणार नाही.

आणि त्याने फसवले तर आपण जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

धरणं आणि पुल बांधताना, यावर अत्यंत वाईट कॉम्बिनेशन्सचे लोड इम्पॅक्ट होणारच नाहित, असा पॉझिटिव्ह विचार केला तर एक ना एक दिवस शहरं बरबाद होताना दिसतील.

विमान आकाशात असताना अत्यंत वाईट प्रकारच्या टर्ब्युलन्समध्ये अडकले तर? त्याचीही गणितं मांडून विमान स्थिर कसे राहिल याची काळजी घेतलेली असते.

वाहनं रस्त्यावरून जाताना घसरलं, समोरच्या वाहनावर आपटलं किंवा इतरही काही शक्यतांमुळे बिघडलं तर कमीतकमी नुकसान कसं होईल याची किचकट गणितं डिझाइन बनवताना करावी लागतात आणि तशा टेस्ट्सही कराव्या लागतात.

इमारत उभी राहिल्यावर दहा वीस वर्षांनी मोठा भूकंप झाला तर आतील जान मालाचं कमीतकमी नुकसान कसं होईल याची किचकट गणितं डिझाइन इंजिनियरला करावी लागतात.

निगेटिव्ह विचार करणं हे एक शास्त्र आहे, ती एक विचारसरणी आहे, ती शिकण्यासाठी उच्च शिक्षित होण्याची आवश्यकता आहे.

माझ्या घराला किंवा गाडीला धोका होईल असे मी मानूच कशासाठी? ते निगेटिव्ह थिंकिंग आहे.

काहिही वाईट घडणार नाही असाच विचार करत बसलं तर ती स्वतःची फसवणूक करणे असेल.

साधक बाधक किंवा सारासार विचार करूनच गोष्टी करणे हा व्यवहाराचा मूलमंत्र आहे.

निर्गुण ते सार, सगुण असार।
सारासार विचार हरिपाठ।।

हे व्यवहाराचे सूत्र माऊलींनी सांगितले आहे, तात्पुरता किंवा तात्कालिक फायदा हा व्यवहारातील असार आहे आणि दीर्घकालीन शाश्वत उपयुक्तता हे व्यवहारातील सार असणं आवश्यक आहे.

पॉझिटिव्ह थिंकिंग हि कुठेही उगवणाऱ्या भूछत्र्यांप्रमाणे आजकाल उदंड उगवलेल्या तत्वज्ञानी बुवा बाया आणि गुरू महाराज यांच्या सुपिक डोक्यातली अफलातून आयडिया आहे.

तुम्ही कोणताही सारासार विचार न करता माझ्या बरगळण्यावर विश्वास ठेवा, तसं केलं नाहित तर तुम्ही निगेटिव्ह माणूस आहात असा शिक्का आम्ही मारू, अशी धमकीच हे बाबा या पॉझिटिव्ह थिंकिंग मधून देत असतात.

शंका उपस्थित करणे आणि कोणतीही गोष्ट किंवा कोणताही विचार हा आपल्या कसोट्यांवर तावून सुलाखून घेणे हा आपला आधिकार आहे ते बुद्धीचे लक्षण आहे.

त्यात निगेटिव्ह काहिही नाही.

फोनवरून आर्थिक फसवणूक करणारे बँकेचे आणि इन्शुरन्स एजंट्स, दारावर माल विकायला आलेले विक्रेते, डेबिट क्रेडिट कार्डचे नंबर्स मागणारे आणि पासवर्ड ओटीपी मागणारे लोक आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगची पट्टी पढविण्याचा आटापिटा करीत असतात आपण निगेटिव्ह नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळतो आणि सपशेल फसवणूक करून घेतो.

बी पॉझिटिव्ह थिंक निगेटिव्ह!!


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

2 thoughts on “‘Positive Thinking’ हा फक्त एक भोंदूपणा आहे!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!