Skip to content

कोरोनाशी लढण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन समजून घेऊया!!

कोरोनाशी लढण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता.


डॉ. आर.आर.पाटील

मानसशास्त्र विभाग प्रमुख
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित,
कला ,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा.


आज आपण पाहत होतो की आपल्या आजूबाजूला फक्त एकच विषय सुरू आहे. तो म्हणजे कोरोना संपूर्ण जगाची गती ज्याने थांबवली लोकांना घरामध्ये राहण्या करीता प्रवृत्त केले. कोरोना हा निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित आहे तो कुठे थांबेल काहीच माहित नाही. परंतु एक गोष्ट सत्य आहे ज्याला सुरुवात असते त्याला अंत हा असणारच.

हाच आशावाद म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला कोरोनाशी लढण्याची हिम्मत देतो.माणूस म्हटला म्हणजे भाव-भावना, चिंता, काळजी, या गोष्टीत येतातच तो नैसर्गिक नियम आहे. या नियमाप्रमाणे सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या व त्यातून मार्ग देखील सापडला म्हणून आपण घाबरण्याचे व चिंता करण्याचे कारण नाही. आपली भूमिकाही आपण नेहमी वस्तुनिष्ठ सकारात्मक (वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन)ठेवली पाहिजे. आता प्रश्न पडतो तो मनात सकारात्मक विचार कसा आणावा???

या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनोविश्लेषण तज्ञ डॉ. सिग्मंड फ्राईड यांनी सांगितलेल्या लिबेडो (Libido)यात मिळते.

म्हणजे ज्याला आपण काम प्रेरणा असे म्हणतो ही वयानुसार बदलत जाते तिलाच आपण इच्छा-आकांक्षा असे म्हणतो व ती दोन पद्धतीने कार्य करीत असते.

१) विधायक उर्मी / जीवन उर्मी (Life Instincts): यालाच आपण सकारात्मक दृष्टिकोन (Positive Thinking)असे म्हणतो. व्यक्तीला जीवनात कितीही संकटे आली तरी मला जगायचे आहे व मी जगणारच. कारण जीवन सुंदर आहे. मी अजून सुंदर बनवणार. अशा विचाराने मनात आशावाद तयार होतो व त्यातूनच व्यक्तीमध्ये स्फूर्ती येते व व्यक्तीची आत्मशक्ती वाढते या आत्मशक्ति सकारात्मक दृष्टिकोन असे म्हणतात.

Good Start is hap don या उक्तीप्रमाणे आपल्याला कोणतेही काम करायचे झाले तर ते कामाची सुरुवात आपण चांगल्या मनाने (सकारात्मक दृष्टीकोनाने) केली तर त्या कामात आपण आनंदी राहतो व चांगली सुरुवात झाल्यामुळे काम हे लवकर पूर्ण होते. उदाहरणार्थ आज कोरोनामूळे घरात राहावे लागत आहे. मुळात घरात राहणे कोणालाच आवडत नाही. पण आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर थांबणे हा एक उत्तम पर्याय आहे.

हे मान्य करा व आनंदाने घरात राहा. घर आपलं व घरातील माणसं ही आपली. एकीकडे आपण म्हणतो घरच्यांना वेळ देता येत नाही, माझं फॅमिली लाईफ मला जगता येत नाही. मग हे पंधरा दिवस एक लोकडाऊन न मानता ती एक आपल्या परिवारासाठी काढलेली सुट्टी समजा..

असा विचार करा मग पहा तुमच्या दिवसाची सुरुवात कुठे होते व कुठे संपते. हे तुम्हाला कळणार नाही.

मुळात मानवी स्वभावाचं चित्र आहे, ज्या गोष्टी मिळत नाहीत त्याची तक्रार करतो आणि मिळाल्या तर त्याचे महत्त्व राहत नाही. मग तुम्हीच सांगा हा लोकडाऊन आहे का?

परिवारासाठी सुट्टीची एक परवणीच जणू.

म्हणून आपण रोज सकाळची सुरूवात ही प्रसन्न मनाने केली पाहिजे कारण आपण जसा विचार करतो त्या पद्धतीच्या भावना निर्माण होतात व त्याच पद्धतीने आपण कृती देखील करतो व केलेल्या कृती प्रमाणे तसे परिणाम होतात. सकारात्मक दृष्टीकोनाचा परिणाम
आशावाद – जीवनाला नवीन दिशा देतो.

उत्साह – नव चैतन्यची निर्मिती.
विधायक उर्मी – जीवन जगण्याची महत्वकांक्षा
स्व विकासाला चालना – व्यक्तीच्या सुप्त क्षमतांची निर्मिती.
सतत कार्यमग्न – संपादन क्षमताचा विकास.
समस्या निवारण क्षमता – पूर्व अनुभव पुरेपूर उपयोग.
आंतरिक नियंत्रण – मन आणि बुद्धी एकाच पद्धतीने कार्यरत असते परिणामी स्वावलंबी असतात.

२) विध्वंसक उर्मी / मृत्यू उर्मी (Death Instincts): यालाच नकारात्मक दृष्टिकोन असे म्हणतात. यात व्यक्ती नेहमी वास्तव परिस्थिती न स्वीकारता आपल्याच कल्पना विश्‍वात रममाण होते व मूळ समस्येपासून व्यक्ती भरकटत जातो. परिणामी माझ्याकडुन हे शक्य नाही, मला जमणार नाही, माझी ही परिस्थिती नाही, माझे नशीब हे बलवान नाही. अशा संरक्षण यंत्रणा सादर करून स्वतःच्या चुकांचे नेहमी स्पष्टीकरण करुन समर्थन करीत असतो. परंतु चुका दुरुस्त करत नाही व व्यक्तीच्या जीवनात अधिक समस्या वाढत जातात व अशा व्यक्ती स्वतःसोबत इतरांनाही देखील त्रासदायक ठरतात.

एवढेच नाही तर इतरांना त्रास देण्यामध्येही त्यांना अघोरी आनंद येत असतो. उदा.प्रशासन यंत्रणेला जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणे. पोलीस डॉक्टरांना मारहाण करणे ,वैद्यकीय उपचारासाठी सहकार्य न करणे, असे विकृत कृत्य करताना आपल्याला समाजातील काही विनाशकारी विपरीत बुद्धी प्रवृत्तीचे लोक दिसतात आणि त्याला जात-धर्म पंथाची किनार लावली जाते.

नकारात्मक दृष्टीकोनाचा परिणाम

निराशावाद – जीवनाला नवीन दिशा मिळते.
निरउत्साह – नव चैतन्याची निर्मिती नाही
विध्वंसक उर्मी – जीवन जगण्याची महत्वकांक्षा नाही.
स्व विकासाला धोका – व्यक्तीच्या सुप्त क्षमतांची विकास होत नाही.
सतत कार्यहीन – बौध्दीक क्षमतांचा ऱ्हास.
समस्या निवारण क्षमता नाही – पूर्व अनुभवाचा अभाव
बाह्य नियंत्रण – स्वबुद्धीचा उपयोग नाही परिणामी व्यक्तीमध्ये परालंबत्व येते.
मानसिक विकृतीची निर्मिती – अपसामान्य वर्तनाला चालना परिणामी स्व अस्तिव धोक्यात.

निसर्गनियमानुसार जसं पेरणार तसं उगवणार. त्याच पद्धतीने आपण जसा विचार करणार तसा परिणाम आपल्या जीवनावर होणार व अध्यात्मिक भाषेनुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये दोन प्रवृत्ती असतात एक देव प्रवृत्ती तिलाच आपण सकारात्मक दृष्टिकोन असे म्हणतो. जी स्वतःसोबत इतरांचाही कल्याणाचा विचार करते व दुसरी प्रवृत्ती दानव प्रवृत्ती सोबत नेहमी इतरांचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न करते.

म्हणून संत तुकाराम म्हणतात तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी म्हणून आपणच आपल्या जागा शोधायच्या आहेत. आपणच ठरवा घरात राहून स्वतःच, कुटुंबाच, समाजाचं, देशाचं संरक्षण करायचं. का विनाकारण घरा बाहेर पडुन स्वतःसोबत सर्वांना अडचणीत आणायचं……..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “कोरोनाशी लढण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन समजून घेऊया!!”

  1. खूपच छान लेख आहे…खरं तर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी मानसशास्त्र च उपयुक्त ठरते….आणि कितीही संकट आलीत तर त्यावरील मानसिक ताण कमी करण्यासाठी हे असले लिखाण उपयोगी ठरतात…अप्रतिम लेख आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!